पुस्तक परीक्षण - Bhujbal Vaibhavi Mohan, BALLB 4th Year, Pune District Education Associations Law College, Hadapsar, Pune-28. सूतो वा सूतपुत्रो वा यो वा को वा
Read More
पुस्तक परीक्षण – Bhujbal Vaibhavi Mohan, BALLB 4th Year, Pune District Education Associations Law College, Hadapsar, Pune-28.
सूतो वा सूतपुत्रो वा यो वा को वा भवाम्यहम्। दैवायल कुले जन्म मदायलं तु पौरुषम्। म्हणजेच मी सूत असो वा सूतपुत्र किंवा इतर कोणी कोणत्या कुळात जन्म घ्यावा हे नशिवाने ठरवले आहे तरी पराक्रम आणि यश मी स्वतःच्या सामर्थ्यावर निर्माण केले आहे ठणकावून सांगणारा, निस्पूय क्षत्रिय धर्माचे पालन करणारा, भारतभूमीला वीरता ‘दानशूरता देणारा’, परशुराम शिष्य, सूर्यपुत्र आणि मृत्यूवरंही विजय मिळवणारे कर्ण या पात्राच्या जीवनकथेवर आधारित ‘मृत्युंजय’ कादंबरी आहे. विलक्षण ऊर्जा देणाऱ्या या कादंबरीची सुरुवात कर्णाच्या बालपणापासून होते. पुढे त्यांची कवचकुंडले, धनुर्विद्याचे कौशल्य, दानशूरता आणि जीवनातील संघर्ष शेवटपर्यंत आपली उत्कंठता वाढवतात. यासाठी ज्येष्ठ लेखक शिवाजी सावंत यांनी मध्य भारत , उत्तर भारत, पंजाब, हरियाणा अशा प्रदेशांमध्ये जाऊन स्वतः संदर्भ जमा केले आणि ७४४ पानांची सर्वाधिक लोकप्रिय ठरणारी मराठी कादंबरी लिहिली. ही कादंबरी इतर भाषांमध्ये देखील प्रकाशित झाली आहे. तसेच मूर्तिदेवी पुरस्कारांसारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी ही कादंबरी सन्मानित झाली आहे. कर्णाचे व्यक्तिमत्व स्पष्ट करताना त्यांनी विविध पात्रांची स्वगतं मांडली आहेत.
पुस्तकांचे मुखपृष्ठ दानवीर तसेच धैर्यवीर कर्णाचे चित्र स्वर्गीय ज्ञानन दलाल यांनी रेखाटले आहे, हे कर्णाच्या अस्सीम जीवन संघर्षाच प्रतिबिंब आहे हे जानवते. जीवंतभासनिर्माण करणाऱ्या चित्रांमुळे बरीच वाचक याला देखणी कादंबरी म्हणतात. पुस्तकाची भाषा कठीण वाटत असली तरी ती समजायला सोपी आहे. तसेच शब्दरचना व वाक्यरचना सखोल, ठाशिव अभ्यासपूर्ण आणि अर्थपूर्ण आहे.
पात्रांच्या त्यांच्या शरिररचनेचा पोशाखांचा, ठिकाणांचा, स्वभावांचा , निर्जिव वस्तूंचा परिचय आपल्याला द्वापरयुगाच्या काळात असल्याचा भास निर्माण करतात. लहानपणापासूनच शुल्लक वागणूक मिळालेल्या कर्णाचे चांगले गुण निखळतेने मांडताना लेखक लिहितात मित्र असावा कर्णासारखा ज्याने मैत्री तोडण्यापेक्षा मरण स्विकारले, वचनबद्ध असावा तर कर्णासारखे वचन म्हणून कुंतीमातेला पांडवांचे जीवन दिले, दानवीर असावे तर कर्णासारखे ज्याने जे दान मागितले त्याला ते दान दिले अगदी कवचकुंडले सुद्धा, आणि मृत्यूमुखी पडत असताना याचकाला दिलेले सोनेरी दातांचे दानदेखील विसरता येणार नाही. त्यानंतरच त्यांचे गुरु म्हणाले होते कि कर्णासारखा दानशूर कोणी नव्हता कोणी नाही आणि कोणी होणार ही नाही. मला वाटतें की कर्णासारखे दानशूर आपल्याला होता येणार नाही. पण महापूर, त्सुनामी, भूकंप तसेच कोरोना सारख्या नैसर्गिक आपत्ती ज्यापुढे आपण काहीच करू शकत नाही अशा आपत्तीमुळे ग्रस्त लोकांना, मानसिक आरोग्य खात्यविलेल्या लोकांना आपण आपल्याकडे जेवढे आहे त्यातून मदत केली पाहिजे, फक्त पैशानेच नाही तर बऱ्याच वेळा शाब्दिक आधार देऊन देखील आपल्याला माणूसकी आणि सामाजिक बांधलकी जपता येईल.
मृत्यूंजय कादंबरी आपल्याला बरेच काही शिकवते. एक निर्णय कसे जीवन बदलू शकतो, संगतीचा होणारा परिणाम, संघर्षातून घडलेले जीवन, ध्येयनिश्चिती, दृढ आत्मविश्वास अजून खूप काही. अनेकांना पुस्तकांची आवड निर्माण करण्यात या कादंबरीचा मोठा हात आहे. दानवीर कर्णाची ही कहाणी आयुष्यातील अनेक रिकाम्या जागा भरून काढेल अनेकांच्या विचारांना कलाटणी मिळेल. कितीही सांगितले तरी कमीच आहे पण थोडक्यात माझ्या मते आयुष्यातील समस्यांवर मात करून सकारात्मक बदल घडून नवे दृष्टिकोन शोधण्यास ही कादंबरी सर्वांत उपयुक्त मार्गदर्शक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली शब्दसंपदा समृद्ध हावी आणि ध्येय निश्चितीची प्रेरणा मिळावी यासाठी मराठी साहित्यातील ही उत्कृष्ट कादंबरी आपण आवर्जुन वाचावी असे मला वाटते.
Show Less