कियोसाकी यांनी आर्थिक साक्षरता आणि संपत्ती निर्मितीचे महत्व सांगताना आपल्या आयुष्यातील अशा दोन
Read More
कियोसाकी यांनी आर्थिक साक्षरता आणि संपत्ती निर्मितीचे महत्व सांगताना आपल्या आयुष्यातील अशा दोन व्यक्तींचे दाखले दिले आहेत ,एक त्यांचे जैविक पिता ‘राफ कियोसाकी’ ज्यांना ‘पुअर डॅड’ म्हणून संबोधलं गेलं आहे आणि दुसरे आपल्या वर्गमित्राचे वडील जे पुस्तकात ‘रिच डॅड’ म्हणून आपल्या समोर येतात, ज्यांनी रॉबर्टला ‘पैशाची गोष्ट’ उलगडून सांगितली.
कियोसाकी कुटुंब मागील चार पिढ्यांपासून अमेरिकेत आहेत.अमरिकेतील हवाई राज्यातील हिलो नामक शहर वजा बेटावर त्यांचे वास्तव्य. रॉबर्टचे वडील राफ कियोसाकी पेशाने शिक्षक, तल्लख बुद्धिमत्ता असलेल्या राफ यांनी रॉबर्टला उच्च आर्थिक वर्गातील व्यक्तींची मुले जाणार्या उत्तम शाळेत घातलं ज्यामुळे रॉबर्टला श्रीमंत वर्ग मित्र लाभले.आणि पुढे त्यातूनच एका वर्ग मित्राचे वडील त्याचे मार्गदर्शक बनले ज्यांना इथे ‘रिच डॅड’ असे ओळखतो.लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे रॉबर्टचे वडील राफ कियोसाकी पेशाने शिक्षक असले तरी ते पुढे ते त्या राज्यातील शिक्षण खात्याचे प्रमुक बनले तर मग त्यांना अगदीच ‘पुअर डॅड’ म्हणून पाहताना त्यांचा हा हुद्दा, रॉबर्टला उत्तम अशा शाळेत शिक्षण देणे वगैरे या बाबीसुद्धा लक्षात घ्या.
पण असाही एक समज होता कि पुस्तकात सांगितल्याप्रमाणे ‘रिच डॅड’ हि एक काल्पनिक व्यक्तिमत्व आहे कारण आजपर्यंत कियोसाकी यांनी त्यांची कधी ओळख जाहीर केलेली नव्हती वगैरे किंबहुना मागे एका मुलाखती मध्ये ‘रिच डॅड’ या आपल्या पुस्तकामधील व्यक्तीस तुम्ही ‘Harry Potter’ प्रमाणे का नाही समजत असे सांगितले होते.परंतु २०१६ मध्ये आपल्याच एका शो मध्ये मात्र त्यांनी जाहीर केलं कि रिच डॅड’ दुसरं तिसरं कोणीच नसून आपला वर्गमित्र एलेन किमी ( ज्यास पुस्तकात माईक असे नाव दिले आहे ) याचे वडील रिचर्ड किमी हे आहेत.
एकंदरीत काय तर या व्यक्तीरेखा खऱ्या असोत वा खोट्या पण यामध्ये कियोसाकी यांनी सांगितलेले गुंतवणूक आणि संपत्ती निर्मितीचे मंत्र मात्र आपल्या आयुष्यात फारच उपयोगी आहेत.या पुस्तकाचा सारांश जर दहा महत्वाच्या नियमांमध्ये काढायचा झाला तर आमच्या मते तो खाली दिल्याप्रमाणे असेल.
तर पाहूया आपल्याला नक्की काय सांगतं “रिच डॅड,पुअर डॅड”
1.श्रीमंत लोक मालमत्ता वाढवतात जबाबदाऱ्या नाही
2.अर्थसाक्षर व्हाच पण अर्थसाक्षरता थिअरीपेक्षा अनुभवातून जास्त कळते.
3.विक्री कौशल्य शिका
4.भीती, भीड आणि आत्मविश्वासाचा अभाव हे सर्वात मोठे अडथळे.
5.संधीची वाट नका पाहू तर संधी शोधा किंबहुना निर्माण करा.
6.ध्येय निश्चित करा, धेय्यापासून ढळू नका. स्वतःचा विचार करा, स्वार्थी व्हा.
7.पैसे मिळविण्यापेक्षा पैशाचा शोध घ्या , पैसे निर्माण करा.
8.भावनांवर नियंत्रण ठेवा. रागाच्या भरात कोणताही निर्णय नाही आणि आनंदाच्या भरात कोणतेही वचन नाही.
9.मूळ उद्दिष्ट आयुष्य भरभरून , रसरसुन जगणे , नवनवीन कौशल्ये आत्मसात करणे असावे , फक्त पैसे कमावणे नाही . आयुष्य कमवा पैसे नाही.
10.तुमच्या समस्यांसाठी इतरांना दोषी धरू नका.
तर मित्रांनो हे होते दहा सल्ले जे आपल्याला “रिच डॅड,पुअर डॅड” आपल्या स्वतःच्या आयुष्यात वापरायला सांगतं.
Show Less