Original Title
श्यामची आई
Subject & College
Series
Publish Date
2023-01-01
Published Year
2023
Publisher, Place
Total Pages
220
ISBN
978-8196132002
Format
Paperback
Country
India
Language
मराठी
Readers Feedback
Wale Apeksha Ramesh
संगमनेर नगरपालिका कला, दा.ज. मालपाणी वाणिज्य आणि ब. ना. सारडा विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त), संगमनेर जि. अहमदनगर विद्यार्थी – वाळे अपेक्षा रमेश वर्ग – एफ.वाय .बी.सी.ए....Read More
Vishal Jadhav
Wale Apeksha Ramesh
संगमनेर नगरपालिका कला, दा.ज. मालपाणी वाणिज्य आणि ब. ना. सारडा विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त), संगमनेर जि. अहमदनगर
विद्यार्थी – वाळे अपेक्षा रमेश
वर्ग – एफ.वाय .बी.सी.ए. (सी.ए.)
पुस्तकाचे नाव – सोनसाखळी
लेखकाचे नाव – साने गुरुजी
पुस्तक परीक्षण / पुस्तक अभिप्राय
‘सोनसाखळी’ ही साने गुरुजींची एका सुंदर कथासंग्रहाची रचना आहे. जिथे स्नेहा, माणूसकी, आणि संवेदनशीलता यांचे दर्शन घडते या कथांमधून साने गुरुजींनी साब्या पण ह्दयस्पर्शी प्रसंगांद्वारे जीवनातील महत्त्वाचा मूल्यावर प्रकाश टाकला आहे. सोनसाखळी कथेत एका लहान मुलीचा आणी तिच्या वडिलांच्या गोड संवाद आहे. या कथेचा मुख्य गाभा हणजे माणसातील निसर्गाशी असलेले नाते. कथेतील मुलगी अत्यंत निरागस असून तिला एका फळाचे आकर्षण आहे. फळाची तुलना लेखकाने सोन्यासारखी केली आहे. तिचे वडील तिला तिच्या इच्छांचे महत्त्व समजावतात तसेच तिला प्रेम, तत्वज्ञान आठी सहदयता शिकवतात, या कथेतून वाचकाला कुंटुबातील नातेसंबंधची महत्त्वाची जाणीव येते. साने गुरुजींनी आपल्या साध्या भाषेतून या मुलीच्या भावना आणि तिच्या वडिलांची काळजी ह्दयस्पर्शीपणे मांडली आहे. मुलगी आहे मुलगा आपल्या आजूबाजूच्या गोष्टीकडे निरागसतेने पाहते. त्यातून माणसाच्या स्वच्छ मनाचा संदेश दिला.
श्यामची आई
हर्षदा हनुमंत मुथे, लेट जी एन सपकाळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, अंजनेरी, नाशिक आई..... प्रेमाची, रागाची, त्यागाची, हसण्याची, अन सोसण्याची एकमेव जागा. हक्काने कोणतीही गोष्ट आपण...Read More
हर्षदा हनुमंत मुथे, कॉम्पुटर इंजिनीरिंग, लेट जी एन सपकाळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, अंजनेरी, नाशिक
श्यामची आई
हर्षदा हनुमंत मुथे, लेट जी एन सपकाळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, अंजनेरी, नाशिक
आई….. प्रेमाची, रागाची, त्यागाची, हसण्याची, अन सोसण्याची एकमेव जागा. हक्काने कोणतीही गोष्ट आपण बोलू शकतो तिच्याशी. त्यामुळे आपल्या सगळ्यांचीच आईशी एक वेगळी नाळ जोडलेली असते. जगाला माहित होण्याआधी ९ महिने आपली तिच्याशी ओळख होते….. आपली इवली बाळमुठ हातात घेऊन आपल्यासाठी कितीतरी सहन करण्यासाठी आईचच काळीज हवं.
अशाच एका आई- मुलाच्या निर्मळ नात्याच हे पुस्तक. लहानपणात कठोर आणि प्रेमळ या दोन्ही पद्धतीने केलेल्या संस्काराची ही एक छोटीशी गोष्ट आहे. यातील प्रत्येक पाठातून नक्कीच उत्तम बोध मिळतो आणि तो बोध कसा घ्यावा याचीही शिकवण अगदी सुंदर मांडलेली आहे. साने गुरुजींनी म्हणटल्याप्रमाणे हे पुस्तक आईच्या प्रेममय थोर शिकवणूकीचे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे एक करूण व गोड कथात्मक चित्र आहे हे पुस्तक पवित्र आहे, जिव्हाळ्याने ओतप्रोत आहे आणि आचार्य अत्रे असे म्हणतात तसे हे पुस्तक म्हणजे महामंगल स्त्रोत आहे. याबद्दल जितकं लिहावं तितक कमीच आहे. गुरुजींनी तुरुंगात लिहलेल्या या सर्वच रात्री तुम्हाला गहीवरून आणतील……
साने गुरुजी लिखित “श्यामची आई” हे मराठी साहित्यविश्वातील एक अमूल्य रत्न आहे
Aishwarya Navnath Nanekar Class - S.Y.B.Com Shri Padmamani Jain College,Pabal,Pune साने गुरुजी लिखित "श्यामची आई" हे मराठी साहित्यविश्वातील एक अमूल्य रत्न आहे. हे पुस्तक मातृप्रेम,...Read More
Aishwarya Navnath Nanekar
साने गुरुजी लिखित “श्यामची आई” हे मराठी साहित्यविश्वातील एक अमूल्य रत्न आहे
Aishwarya Navnath Nanekar
Class – S.Y.B.Com
Shri Padmamani Jain College,Pabal,Pune
साने गुरुजी लिखित “श्यामची आई” हे मराठी साहित्यविश्वातील एक अमूल्य रत्न आहे. हे पुस्तक मातृप्रेम, त्याग, कष्ट, आणि संस्कार यांचे उत्कृष्ट दर्शन घडवते. शालेय अभ्यासक्रमात हे पुस्तक हमखास वाचले जाते आणि प्रत्येक वाचकाच्या मनावर खोल ठसा उमटवते.
पुस्तकाचा विषय:
साने गुरुजींनी त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातील अनुभवांवर आधारित हे आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहिले आहे. या कथेत श्याम नावाच्या मुलाच्या जीवनकहाणीला केंद्रस्थानी ठेवले आहे, जो आपल्या आईच्या शिकवणीने आणि प्रेमाने घडत जातो. या पुस्तकात आईचा मुलावर असलेला अमर्याद स्नेह आणि तिचा त्याग ओघवत्या शैलीत मांडला आहे.
पात्रे आणि भाषा:
श्यामची आई ही कथानकातील प्रमुख व्यक्ती आहे. तिच्या प्रत्येक कृतीतून तिचे निस्वार्थ प्रेम, कठोर मेहनत, आणि मुलाला चांगला माणूस बनवण्याची आस दिसते. श्याम हा साधासरळ मुलगा, जो आईच्या शिकवणीतून जीवनाचे धडे शिकतो. पुस्तकातील भाषा अतिशय साधी, ओघवती आणि भावनिक आहे. वाचकाला प्रत्येक वाक्यातून प्रेम, त्याग, आणि निस्वार्थपणाची अनुभूती येते.
शिक्षण आणि संस्कार:
“श्यामची आई” हे केवळ एक कथा नव्हे, तर ते एक जीवनशिक्षक पुस्तक आहे. या पुस्तकातून आपल्याला मातृप्रेमाचे महत्व, कर्तव्यपरायणता, आणि सत्यनिष्ठा शिकायला मिळते. गरीब परिस्थितीत राहूनही आपल्या मुलाला चांगले संस्कार देण्याचा आईचा ध्यास आणि त्यासाठी केलेला त्याग हृदयाला भिडतो.
प्रभाव:
या पुस्तकाचे वाचन केल्यानंतर वाचकाच्या मनावर भावनिक परिणाम होतो. आईच्या त्यागाची जाणीव होते आणि तिच्या प्रेमाचे महत्त्व अधोरेखित होते. श्यामच्या जीवनातील प्रसंगांमधून समाजासाठी प्रेरणादायी विचारांचा जागर होतो.
निष्कर्ष:
“श्यामची आई” हे पुस्तक प्रत्येकाने एकदा तरी वाचलेच पाहिजे. आईच्या निस्वार्थ प्रेमाची आणि त्यागाची सजीव कहाणी म्हणून हे पुस्तक अमर आहे. साने गुरुजींच्या साहित्यकौशल्याने ते अजूनच भावस्पर्शी झाले आहे. ही कथा आपल्या मनाला एक वेगळे समाधान देते आणि जीवनात चांगले माणूस होण्याची प्रेरणा देते.
श्यामची आई
Book Reviewed by. Mr. Sanjay A. Mali, Library Staff, RMD Sinhgad Technical Institutes Campus, Warje, Pune-58. श्यामची आई: एक हृदयस्पर्शी मातृप्रेमाची आत्मकथा पांडुरंग सदाशिव साने...Read More
Mr. Sanjay A. Mali
श्यामची आई
Book Reviewed by. Mr. Sanjay A. Mali, Library Staff, RMD Sinhgad Technical Institutes Campus, Warje, Pune-58.
श्यामची आई: एक हृदयस्पर्शी मातृप्रेमाची आत्मकथा
पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली ‘श्यामची आई’ ही मराठी साहित्यातील एक अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावशाली आत्मकथा आहे. नाशिकच्या कारागृहात असताना लिहिलेली ही आत्मकथा असून यामध्ये आईबद्दलच्या प्रेमाचे अतिशय साध्या भाषेत केलेले वर्णन आहे ती खालील काही मुद्द्यावरून तुमच्या लक्षात येईल.
बलस्थाने:
मातेचा महिमा: या पुस्तकात साने गुरुजींनी आपल्या आईच्या व्यक्तिमत्वाचे अत्यंत सुंदर चित्रण केले आहे. एक सामान्य ग्रामिण महिला असूनही, त्यांच्या आईने आपल्या मुलांच्या संगोपनासाठी किती कष्ट घेतले, त्यांच्या शिक्षणाची किती काळजी घेतली, याचे मार्मिक वर्णन आहे.
साधा, सरळ आणि भावुक अंदाज: साने गुरुजींनी अतिशय साध्या आणि सरळ भाषेत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक प्रत्येक वाचकाच्या हृदयाला स्पर्श करते.
एक सत्यकथा: ही आत्मकथा असल्याने, प्रत्येक वाक्य खरे आणि प्रामाणिक वाटते. यामुळे वाचक गुरुजींच्या भावनांमध्ये सहज रमून जातात.
समाज आणि संस्कृतीचे दर्शन: या पुस्तकातून त्या काळातील ग्रामीण समाजाची आणि संस्कृतीची झलक मिळते त्यामुळे आजच्या या आधुनिक युगात सुद्धा हे पुस्तक वाचकासाठी अविस्मरणीय असे आहे.
अनाथ मुलांसाठी प्रेरणा: या पुस्तकाच्या विक्रीतून मिळालेला निधी गुरुजींनी अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी दिला.
त्यामुळे हे पुस्तक प्रत्येक प्रत्येक वयोगटातील वाचकासाठी, ज्यांना मराठी साहित्य लिहायला, बोलायला, वाचायला आवडते त्या सर्वासाठी तसेच ज्यांना आईबद्दल आदर, प्रेम, आहे त्याचबरोबर जो आपल्या जीवनात प्रेरणा शोधत आहे अशा प्रत्येकासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.
निष्कर्ष:
‘श्यामची आई’ हे केवळ एक पुस्तक नसून, तर एक भावना आहे. श्यामच्या आईचे संस्कार हे अनंत काळासाठी नेहमीच पुरून उरणार आहेत किंबहुना येणाऱ्या काळात त्याची गरज अधिकाधिक भासणार आहे. हे पुस्तक वाचून आपल्या हृदयात आईबद्दलचे प्रेम, जिव्हाळा अधिकच प्रखर व घट्ट होईल, त्याचबरोबर आई या शब्दाबद्दल ममत्व, भक्ति व कृतज्ञता अशा अपार भावना प्रकट होतील यात तिळमात्र शंका नाही.
