By पांडुरंग सदाशिव साने
श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेले आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे कारागृहात असताना फेब्रुवारी इ.स. १९३३ रोजी त्यांनी या पुस्तकाच्या लिखाणास प्रारंभ केला आणि १३ फेब्रुवारी, इ. स. १९३३ रोजी पहाटे त्या संपविल्या. आईच्या प्रेममय थोर शिकवणीमुळे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे एक करून व गोड कथात्मक चित्र म्हणजे “श्यामची आई ” असे म्हणता येईल. ‘श्यामची आई ‘ हे पुस्तक मराठी भाषेतील अक्षरधाम ठरले आहे. माय – लेकरातील व संस्काराच्या हृदयस्पर्शी आठवणी या पुस्तकात आहे. श्यामच्या बालपणावर जे माणुसकीचे संस्कार त्यांच्या आईकडून झाले आहे त्या घटना या अजरामर कलाकृतीतून कथन केले आहे. साने गुरुजींनी १९३३ साली नाशिकच्या तुरुंगात अवघ्या पाच रात्रीत ही कादंबरी लिहिले. या कादंबरीच्या तीन लाखांपेक्षा अधिक प्रती खपल्या आहेत. इ. स. १९५३ साली या कादंबरीच्या असलेल्या ‘श्यामची आई ‘ याच नावाचा चित्रपट देखील झळकला आहे. प्रल्हाद केशव अत्रे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक केले होते.

Subject & College
Total Pages
270
ISBN 13
978-1974690558
Format
paper back
Language
Marathi
Readers Feedback
श्यामची आई
पुस्तकाचे नाव: श्यामची आई : लेखक:- पांडुरंग सदाशिव साने श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेले आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे कारागृहात असताना फेब्रुवारी इ.स. १९३३...Read More
Dr. Varsha Junnare
श्यामची आई
पुस्तकाचे नाव: श्यामची आई : लेखक:- पांडुरंग सदाशिव साने
श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेले आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे कारागृहात असताना फेब्रुवारी इ.स. १९३३ रोजी त्यांनी या पुस्तकाच्या लिखाणास प्रारंभ केला आणि १३ फेब्रुवारी, इ. स. १९३३ रोजी पहाटे त्या संपविल्या. आईच्या प्रेममय थोर शिकवणीमुळे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे एक करून व गोड कथात्मक चित्र म्हणजे “श्यामची आई ” असे म्हणता येईल. ‘श्यामची आई ‘ हे पुस्तक मराठी भाषेतील अक्षरधाम ठरले आहे. माय – लेकरातील व संस्काराच्या हृदयस्पर्शी आठवणी या पुस्तकात आहे. श्यामच्या बालपणावर जे माणुसकीचे संस्कार त्यांच्या आईकडून झाले आहे त्या घटना या अजरामर कलाकृतीतून कथन केले आहे. साने गुरुजींनी १९३३ साली नाशिकच्या तुरुंगात अवघ्या पाच रात्रीत ही कादंबरी लिहिले. या कादंबरीच्या तीन लाखांपेक्षा अधिक प्रती खपल्या आहेत. इ. स. १९५३ साली या कादंबरीच्या असलेल्या ‘श्यामची आई ‘ याच नावाचा चित्रपट देखील झळकला आहे. प्रल्हाद केशव अत्रे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक केले होते.
साने गुरुजींचे ‘श्यामची आई ‘ ही कादंबरी पहिल्यांदा १९३५ साली प्रकाशित झाले. ‘अमृत महोत्सव’ पूर्ण करणाऱ्या ‘श्यामची आई’ ही कादंबरी मराठी वाचकांना आज 21 व्या शतकातही जीवनाच्या वाटचालीचे ‘श्यामची आई’ व ‘प्रारंभ’ ही प्रकरणे असून नंतर पहिल्या रात्रीपासून ते बेचाळीसाव्या रात्रीपर्यंत प्रकरणे आहेत.
‘श्यामची आई’ या आत्मचरित्रात्मक कादंबरी मध्ये, श्यामच्या आईने त्याच्यावर केलेले संस्कार व त्या संस्कारामुळे श्यामचे घडलेले जीवन याचा प्रत्यक्ष पदोपदी येतो. या कादंबरीमुळे नकळतपणे वाचकाच्या मनावर संस्काराचा ठसा उमटताना दिसतो. श्यामच्या जीवनात मिळालेले संस्कार जीवनात किती परिवर्तन करतात, आणि त्यामुळे जीवन किती सुंदर बनते हे या कादंबरी मधून दिसून येते.
‘श्यामची आई’ या कादंबरीची भाषाशैली अतिशय सोपी आहे सर्व सामान्यांना समजणारी ओघवती अशी आहे. पुस्तकाची किंमत १६० रु. असून ती सर्वसामान्यांना परवडणारी आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ अतिशय समर्पक असे आहे. ‘श्यामची आई ‘ तुळशीवृंदावनावर बसलेली आहे. आणि श्याम व त्याचे मित्र आई साठी परडीत फुले देत आहेत. एकूणच मराठी साहित्य विश्वात ही कादंबरी मैलाचा दगड ठरली आहे. म्हणून मला ही कादंबरी खूप आवडली आहे.
नाव :- इंदू देवनाथ खोटरे
प्रथम वर्ष,कला, त्र्यंबकेश्वर
“श्यामची आई”
नाव : चारुशीला रणदिवे ( बी. एड. प्रथम वर्ष ) महाविद्यालय : कमला शिक्षण संस्थेचे , प्रतिभा शिक्षणशास्र महाविद्यालय , चिंचवड पुणे-१९. "श्यामची आई" हि...Read More
Mahesh Dushing
“श्यामची आई”
नाव : चारुशीला रणदिवे ( बी. एड. प्रथम वर्ष )
महाविद्यालय : कमला शिक्षण संस्थेचे , प्रतिभा शिक्षणशास्र महाविद्यालय , चिंचवड पुणे-१९.
“श्यामची आई” हि कादंबरी साने गुरुजी व त्यांची आई यांच्यावर आधारित आहे. हि कादंबरी आई च्या कष्टावर आधारित असून तिच्या अपर कष्टांची व त्यागाची कथा सांगते . हि कादंबरी मुख्य पात्र श्याम यांच्या जीवनातील संघर्ष , अडचणी आणि आईची ममता यांचा भावपूर्ण आणि वास्तवदृष्ट्या विचार केला आहे . श्यामच्या आई चे पत्र हे अत्यंत प्रेरणादायक आहे . श्याम आणि त्याच्या आई चे भावनिक संबंध या कादंबरी मध्ये अतिशय उत्तमरीत्या मांडले आहे . श्यामच्या आई चे चरित्र हे त्याग , कष्ट , प्रेम आणि समर्पणाचे प्रतिक आहे . या कादंबरीच्या माध्यमातून लेखकाने समाजातील शोषण , विषमता आणि संघर्ष यांची मांडणी केली आहे .
“श्यामची आई” हि अत्यंत उत्कृष्ट आणि प्रेरेना दायक कादंबरी आहे जी प्रत्येक वाचकाने वाचलीच पाहिजे.
श्यामची आई
पुस्तकाचे परिक्षण - कु,हिंगे अंजली ज्ञानेश्वर प्रथम वर्ष कला , अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर मी श्यामची आई हे पुस्तक हे पुस्तक वाचले.. या पुस्तकात एकूण...Read More
कु.हिंगे अंजली ज्ञानेश्वर
श्यामची आई
पुस्तकाचे परिक्षण – कु,हिंगे अंजली ज्ञानेश्वर प्रथम वर्ष कला , अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर
मी श्यामची आई हे पुस्तक हे पुस्तक वाचले.. या पुस्तकात एकूण ४२ रात्री आहेत. प्रत्येक रात्र आपल्याला नवा संदेश देते. श्यामची आई हे साने गुरुजी यांची आत्मकथा आहे. या पुस्तकातून आपल्याला घरची परिस्थिती गरीबीची असूनही आई, आपल्या मुलावर चांगले संस्कार करते. है समजते. एक आदर्श, होतकरू आणि प्रेमळ आई येथे सापडते. श्यामची आई हे लोकप्रिय पुस्तक असून ते आपल्याला खूप प्रेरणा देते असून त्यांच्या आईच्या महान त्यागाचे आणि सुसंस्कारांचे प्रभावी चित्रण करते. साने गुरुजींच्या लेखणीतून आईच्या निस्सीम प्रेमाची, त्यागाची आणि कर्तव्य भावनेची अप्रतिम कहानी उलगडते.
कथा ही श्याम या मुलाच्या भोवती फिरते. श्यामचे बालपण गरीब पण संस्कारक्षम कुटुंबात घडते. श्यामच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण असते. वडील फारसे शिकलेले नसल्याने त्यांना रोजगार योग्य मिळत नाही. या परिस्थितीत श्यामची आई कुटुंबाची सर्व जबाबदारी सांभाळते. ती कष्टाळू, संयमी आणि त्यागशील, स्वभावाची आहे. तिने आयुष्यातील सर्व दु:ख आणि त्रास सहन करूनही आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले. श्यामची आई हे पुस्तक केवळ आईच्या ममतेची गोष्ट नाही. तर तिच्या नैतिकता, समाज सेवा आणि कर्तव्यपालनाचेही उत्कृष्ट उदाहरण आहे. ती आपल्या मुलांना कष्ट करण्याचे महत्त्व शिकवते, आणि त्यांना कधीच निराश होऊ देत नाही. श्यामच्या आईने त्याला सत्य, अहिंसा, आणि प्रामाणिकपणाचे धडे दिले. ती श्यामला नेहमी इतरांची मदत करण्यास प्रेरित करते. श्यामची आई नेहमी देवावर श्रद्धा ठेवून, कष्ट आणि त्यागाची शिकवण देते. पुस्तकात अनेक प्रसंगांमध्ये आईच्या कर्तुत्वाचा उल्लेख आहे. श्यामला शाळेत पाठवण्यासाठी ती कष्टाने पैसे साठवते. आणि त्याच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी उचलते. श्यामच्या आईचे ध्येय स्पष्ट असते. की, आपल्या मुलांना चांगले संस्कार देणे आणि त्यांना उत्तम व्यक्क्ती बनवणे. आईच्या त्यागामुळे श्यामच्या मनात तिच्याविषयी अपार प्रेम निर्माण होते. ती श्यामच्या प्रत्येक निर्णयांमध्ये त्याला योग्य मार्गदर्शन करते. आणि त्याला सदाचरणाचे धडे देते. श्यामच्या आईने तिच्या आयुष्यात अनेक संकटे सहन केली, पण तिच्या मुलांच्या शिक्षणात आणि विकासात तिने कधीच कमीपणा येऊ दिला नाही.
पुस्तकाचा शेवट अत्यंत भावनिक आहे. श्यामची आई आजारी पडते. आणी अखेरीस तिचे निधन होते. तिच्या निधनानंतर श्यामच्या जीवनात एक मोठी पोकळी निर्माण होते, पण तो आपले जीवन सत्कारणी लावतो.
” श्यामची आई” हे पुस्तक एक आदर्श आईचे चित्रण करते. या पुस्तकातून साने गुरुजींनी त्यांच्या आईवर असलेले अपार प्रेम, आदर, आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे. भारतीय समाजातील आईच्या भूमिकेचा गौरव करताना, गुरुजींनी तिला नवी ओळख दिली आहे. “श्यामची आई” हे पुस्तक केवळ साहित्यिक दृष्टिकोनातून नव्हे, तर नैतिक मूल्ये, संस्कार, आणि समाजसेवेच्या दृष्टिकोनातूनही महत्वाचे आहे. त्यामुळे हे पुस्तक भारतीय साहित्यातील एक अमूल्य रत्न मानले जाते. ते करायला शिकवते. या पुस्तकातील एक प्रसंग मला खुप. आवडला, श्यामला पाण्याची भिती वाटते. म्हणून तो पाण्यात पोहणे टाळतो. श्यामला त्याचे मित्र भकड म्हणून चिडवतात. आई कशी सहन करेल श्यामची आई त्याला विहिरीपाशी नेते जिथे तो शेवटी पोहायला शिकतो.
“श्यामची आई” पुस्तकाच्या मुखपृष्ठावर श्यामची आई श्याम व त्याच्या मित्रांचे रंगीत आकर्षक व सुंदर चित्र आहे. पुस्तकाची भाषा सोपी आहे. अक्षरांचा आकार योग्य आहे. कथा ही श्याम या मुलाच्या भोवती फिरते. श्यामचे बालपण गरीब होते. श्यामची आई पुस्तक हे खूप छान व मनमोहक आहे मनाला निभावणारे आहे.