Share

पुस्तकाचे परिक्षण – कु,हिंगे अंजली ज्ञानेश्वर प्रथम वर्ष कला , अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर
मी श्यामची आई हे पुस्तक हे पुस्तक वाचले.. या पुस्तकात एकूण ४२ रात्री आहेत. प्रत्येक रात्र आपल्याला नवा संदेश देते. श्यामची आई हे साने गुरुजी यांची आत्मकथा आहे. या पुस्तकातून आपल्याला घरची परिस्थिती गरीबीची असूनही आई, आपल्या मुलावर चांगले संस्कार करते. है समजते. एक आदर्श, होतकरू आणि प्रेमळ आई येथे सापडते. श्यामची आई हे लोकप्रिय पुस्तक असून ते आपल्याला खूप प्रेरणा देते असून त्यांच्या आईच्या महान त्यागाचे आणि सुसंस्कारांचे प्रभावी चित्रण करते. साने गुरुजींच्या लेखणीतून आईच्या निस्सीम प्रेमाची, त्यागाची आणि कर्तव्य भावनेची अप्रतिम कहानी उलगडते.
कथा ही श्याम या मुलाच्या भोवती फिरते. श्यामचे बालपण गरीब पण संस्कारक्षम कुटुंबात घडते. श्यामच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण असते. वडील फारसे शिकलेले नसल्याने त्यांना रोजगार योग्य मिळत नाही. या परिस्थितीत श्यामची आई कुटुंबाची सर्व जबाबदारी सांभाळते. ती कष्टाळू, संयमी आणि त्यागशील, स्वभावाची आहे. तिने आयुष्यातील सर्व दु:ख आणि त्रास सहन करूनही आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले. श्यामची आई हे पुस्तक केवळ आईच्या ममतेची गोष्ट नाही. तर तिच्या नैतिकता, समाज सेवा आणि कर्तव्यपालनाचेही उत्कृष्ट उदाहरण आहे. ती आपल्या मुलांना कष्ट करण्याचे महत्त्व शिकवते, आणि त्यांना कधीच निराश होऊ देत नाही. श्यामच्या आईने त्याला सत्य, अहिंसा, आणि प्रामाणिकपणाचे धडे दिले. ती श्यामला नेहमी इतरांची मदत करण्यास प्रेरित करते. श्यामची आई नेहमी देवावर श्रद्धा ठेवून, कष्ट आणि त्यागाची शिकवण देते. पुस्तकात अनेक प्रसंगांमध्ये आईच्या कर्तुत्वाचा उल्लेख आहे. श्यामला शाळेत पाठवण्यासाठी ती कष्टाने पैसे साठवते. आणि त्याच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी उचलते. श्यामच्या आईचे ध्येय स्पष्ट असते. की, आपल्या मुलांना चांगले संस्कार देणे आणि त्यांना उत्तम व्यक्क्ती बनवणे. आईच्या त्यागामुळे श्यामच्या मनात तिच्याविषयी अपार प्रेम निर्माण होते. ती श्यामच्या प्रत्येक निर्णयांमध्ये त्याला योग्य मार्गदर्शन करते. आणि त्याला सदाचरणाचे धडे देते. श्यामच्या आईने तिच्या आयुष्यात अनेक संकटे सहन केली, पण तिच्या मुलांच्या शिक्षणात आणि विकासात तिने कधीच कमीपणा येऊ दिला नाही.
पुस्तकाचा शेवट अत्यंत भावनिक आहे. श्यामची आई आजारी पडते. आणी अखेरीस तिचे निधन होते. तिच्या निधनानंतर श्यामच्या जीवनात एक मोठी पोकळी निर्माण होते, पण तो आपले जीवन सत्कारणी लावतो.
” श्यामची आई” हे पुस्तक एक आदर्श आईचे चित्रण करते. या पुस्तकातून साने गुरुजींनी त्यांच्या आईवर असलेले अपार प्रेम, आदर, आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे. भारतीय समाजातील आईच्या भूमिकेचा गौरव करताना, गुरुजींनी तिला नवी ओळख दिली आहे. “श्यामची आई” हे पुस्तक केवळ साहित्यिक दृष्टिकोनातून नव्हे, तर नैतिक मूल्ये, संस्कार, आणि समाजसेवेच्या दृष्टिकोनातूनही महत्वाचे आहे. त्यामुळे हे पुस्तक भारतीय साहित्यातील एक अमूल्य रत्न मानले जाते. ते करायला शिकवते. या पुस्तकातील एक प्रसंग मला खुप. आवडला, श्यामला पाण्याची भिती वाटते. म्हणून तो पाण्यात पोहणे टाळतो. श्यामला त्याचे मित्र भकड म्हणून चिडवतात. आई कशी सहन करेल श्यामची आई त्याला विहिरीपाशी नेते जिथे तो शेवटी पोहायला शिकतो.
“श्यामची आई” पुस्तकाच्या मुखपृष्ठावर श्यामची आई श्याम व त्याच्या मित्रांचे रंगीत आकर्षक व सुंदर चित्र आहे. पुस्तकाची भाषा सोपी आहे. अक्षरांचा आकार योग्य आहे. कथा ही श्याम या मुलाच्या भोवती फिरते. श्यामचे बालपण गरीब होते. श्यामची आई पुस्तक हे खूप छान व मनमोहक आहे मनाला निभावणारे आहे.

Related Posts

अस्तित नास्तिकांच्या दर्शनीक विचाराची मांडणी

Sanjay Manohar Memane
Shareप्रा. मिलिंद बेडसे( इंग्रजी विभाग प्रमुख- श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर) *परिचय:* देव झालेला कुणी ही दीर्घ...
Read More

उपेक्षतांना संकटावर मात करण्यास भाग पाडणारा ग्रंथ

Sanjay Manohar Memane
Shareकु. आहेर वैष्णवी बाळासाहेब ( टी वाय बी एस सी )श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा जि. अहिल्यानगर परिचय: मृत्युंजय कादंबरीची...
Read More