द अल्केमिस्ट The Alchemist

By Coelho Paulo, Paulo Coelho, नांदापूरकर सुचेता

Share

Original Title

द अल्केमिस्ट

Publish Date

2015-01-01

Published Year

2015

Publisher, Place

Total Pages

172

ISBN

9788172234980

Language

English

Translator

नांदापूरकर सुचेता

Readers Feedback

द अल्केमिस्ट: आत्मचिंतन आणि परिवर्तन यासाठी उत्तम पुस्तक

सारिका आर शेलार (एम बी ए प्रथम वर्ष): इन्स्टिटयूट ऑफ इंडस्ट्रियल अँड कॉम्पुटर मानजमेंट (आयआयसीएमआर) द अल्केमिस्ट पुस्तकाचे लेखक "पाउलो कोएलो" हे पुस्तक वाचून बाजूला...Read More

सारिका आर शेलार

सारिका आर शेलार

×
द अल्केमिस्ट: आत्मचिंतन आणि परिवर्तन यासाठी उत्तम पुस्तक
Share

सारिका आर शेलार (एम बी ए प्रथम वर्ष): इन्स्टिटयूट ऑफ इंडस्ट्रियल अँड कॉम्पुटर मानजमेंट (आयआयसीएमआर)

द अल्केमिस्ट
पुस्तकाचे लेखक “पाउलो कोएलो”
हे पुस्तक वाचून बाजूला ठेवण्या सारखे नाही आपले स्वप्न पूर्ण करणे म्हणजे आपण खऱ्या अर्थाने आपले जीवन जगत असतो. स्वप्नाच्या मागे धावत असतो स्पेन मधील संथियागो हा मेंढपाळ व्यवसाय करणारा मुलगा होता. त्याला जग भर फिरण्याची वेगवेगळी ठिकाणे पाहण्याची, वेगवेगळ्या लोकांना भेटण्याची खूप आवड होती. वडिलान सारखे एकाच ठिकाणी राहायचे नव्हते म्हणून त्याने मेंढी पालन करण्याचे ठरवले त्याला पुस्तके वाचण्याचे खुप वेड होते. मेढपाळाच्या कळपा सोबत त्याच्याकडे एक पेन आणि पुस्तक नेहमी असायचे, तो नेहमी म्हणायचा की जाड पुस्तक वाचायला पाहिजे म्हणजे झोपताना त्याची उशी पण होते. संथियागोच्या वडिलांना त्याला धर्मगुरु बनवायचे होते. पण त्याला जग भर फिरण्याची आवड होती.
मेढ्यांची लोकर विकण्यासाठी तो “तरिफा” ह्या शहरात जाणार होता पण जाताना वाटेत खूप अंधार झाला तेथे एक मोडके चर्च होते. तो एक सायकामोरो नावाच्या झाडाखाली तो झोपी गेला. त्याला तेथे एक स्वप्न पडले. ते स्वप्न त्याला आगोदर ही पडले होते. स्वप्न पूर्ण होण्या आधी तो जागा झाला, तो तरिफा ह्या शहरात पोहचला तेथे त्यांने ऐकले होते की एक म्हतारी स्वप्नाचा अर्थ सांगते. तो तेथे गेला व म्हतारीला आपल्या स्वप्ना बददल सांगितले त्यामध्ये तो सांगू लागला. मी एका माळा वर माझ्या मेंढ्या सोबत आहे. व एक छोटेसे मुल येते व मला माझा हात धरुन इजिप्त च्या पिरामिड कडे घेऊन गेले व ते मूल सांगू लागते की येथे खूप मोठा खजिना झाहे. त्या म्हतारीने सांगितले लहान मुल सहसा कोणाच्या स्वप्नात येत नाही. अन तुला हे स्वप्न दोनदा पडले आहे तर तो खजिना नक्कीच शोधून काढ तू खूप श्रीमंत होशील.
संथियागो त्याच्या प्रवासा दरम्यान अनेक लोकाशी भेटतो. जसे की जादूगार, एक व्यापारी आणि एक महिला, ज्यांच्याकडून त्याला म्हत्वाचे धडे शिकता येतात. त्याचा प्रवास, त्याला आत्मज्ञान प्रेम, आणि भाग्याबदल शिकवते. कथा शेवटी या’ विचारावर येते की, खजिना त्याच्या प्रवासातच आहे. सत्य आणि त्याच्या या स्वप्नांच्या
पाठलागामध्ये असलेल्या घड्यामध्ये “आल्कमिस्ट” हे पुस्तक आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची प्रेरणा देते आणि जीवनाच्या गुढतेबदल विचार करायला लावते.
ह्या पुस्तकाचे लेखक पाउलो कोएलो हे हया पुस्तकात असे सांगतात की आपण आपल्या स्वप्नांवर लक्ष केंद्रित करा. म्हणून लेखकांनी या विषयावर पुस्तक लिहिले असावे.
या पुस्तकातील कथा गोष्टीद्वारे आपल्याला असे समजते की संथियागो हा एक मेंढपाळ असून तो आपल्या स्वप्नांसाठी इजिप्त च्या पिरॅमिड पर्यंत जाण्यासाठी कोण कोणत्या अडीअडचणी पार करून शेवटी त्याच्या लक्षा पर्यंत पोहोचतो. म्हणून आपल्या स्वप्नांसाठी आपण खूप प्रयत्न केले पाहिजेत. कारण स्वप्न हेच आपल्या स्वप्नांना स्वप्नांपर्यंत पोहोचवतात.
शब्दांचे किमयागार म्हणून जगविख्यात झालेले “पाउलो कोएलो” सर्वाधिक वाचक लाभलेल्या आधुनिक काळातल्या मोजक्या लेखकांपैकी एक आहेत.
मी हे पुस्तक सगळ्यांनी वाचावे असे सांगेन कारण जो व्यक्ति स्वप्न पाहतो व तो त्या स्वप्नांसाठी जगत असतो. जसे संथियागो खजिना संबंधी स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांने। खूप प्रयत्न केले त्याच्या मार्गात अनेक अडचणी आल्या. पण त्या सगळ्या अडचणी वार मत करून तो त्याच्या स्वप्ना पर्यंत पोहचला म्हणून स्वतःच्या स्वप्नानवर विश्वास ठेवा, आणि त्या स्वप्ना मागे धावा, ते सत्यात उतरवणन्यासाठी!

Submit Your Review