मन मै है विश्वास

By विश्वास नागरे पाटील

Share

Availability

available

Publish Date

2016-06-03

Published Year

2016

Total Pages

230

ISBN 13

9788174349620

Format

Paperback

Country

India

Language

Marathi

Dimension

20.3 x 25.4 x 4.7 cm

Weight

300g

Average Ratings

Readers Feedback

मन मे है विश्वास

विद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय विद्यानगरी बारामती नाव - सोनवणे स्नेहा अंबादास (अकरावी सायन्स) पुस्तकाचे नाव - मन मे है विश्वास लेखक- विश्वास...Read More

सोनवणे स्नेहा अंबादास

सोनवणे स्नेहा अंबादास

×
मन मे है विश्वास
Share

विद्या प्रतिष्ठानचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय विद्यानगरी बारामती
नाव – सोनवणे स्नेहा अंबादास (अकरावी सायन्स)

पुस्तकाचे नाव – मन मे है विश्वास
लेखक- विश्वास नांगरे पाटील

चारच वर्षात रौप्य महोत्सवी जनावृती
सह्याद्रीच्या कुशीत आणि वारणेच्या मशीत वसलेलं कोकरूड हे माझगाव इथे रोज भल्या पहाटे मशिदी वरील अज्ञानाच्या भोग्यांना किंवा ज्ञानेश्वरीच्या पारायण जाग येते 12 बलुतेदार 18 पगड जाती मन्या गोविंदाने येथे राहतात स्पर्धा परीक्षेचे स्वप्न उराशी बाळगून रोज असे कितीतरी विश्वास मुंबई पुण्याच्या गर्दीत घुसतात आमदार निवासात किंवा दहा बाय दहाच्या खुराड्यात चार चार जण राहतात शेतकरी आईबापांनी पोटाला चिमटा काढून किंवा असली नसलेली अर्धा एकर जमीन घाण ठेवून पोरगा मामलेदार फौजदार होणार या आशेवर पैसे पाठवायचे गल्लीबोळातल्या ट्युशन मध्ये ऍडमिशन घ्यायची आणि अभ्यासाला लागायचं शहरातील झगमगट बघून काहींचे डोळे दिपून जातात मग रस्ता चुकतात व कुठेतरी भलत्याच ठिकाणी गुरफडतात यातून बाहेर काढणारा दिशा दाखवणार योग्य मार्गदर्शन करणार कोणीच नसतं मग बाकी शून्य तरुण पण घोडच का प्रोडक्ट व संघर्ष व म्हातारपण पाश्चाताप करण्यात निघून जातं काहीजण झपाटून अभ्यासाला लागतात दिशाही मिळते पण कधी परीक्षा होत नाही कधी जागा कमी निघालेल्या असतात या तीन टप्प्याच्या परीक्षा प्रक्रियेमध्ये काहीजण पहिल्या टप्प्यात काही दुसऱ्या तर काही तिसऱ्या बाद होतात या सापशिडीच्या खेळात चार पाच वर्ष अथक परीक्षण करूनही काहीच हाती लागत नाही काही कसलेले पैलवान मैदानात न उतरता एक बार झाल्याचं बाद होतात मग सिस्टीम विषयी संताप व जगा बाबत नकारार्थी दृष्टिकोन घेऊन

साहेबांच्या ही डोळ्यात अशीच भोळीभाबडी स्वप्न होती त्यांना प्रयत्नांची कष्टांची जोड दिली जेवढा मोठा संघर्ष तेवढा मोठा यश जिद्द होती इच्छाशक्ती होती न थांबता न थकता न करता ते काठमोडे पर्यंत आणि बुडाला फोड येईपर्यंत अभ्यास केला जीव तोडून मेहनत केली व आयपीएस मध्ये निवड झाली आणि परिस्थिती पलटली विद्यार्थी दहशत व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करणाऱ्या व भावनिक जाणीव प्रकल्प करणाऱ्या समाजाच्या प्रत्येकाला उद्देशून हे आवाहन पर लेखन आहे जग एवढे विविध रंगाने नटलेला आहे एवढा सुंदर निसर्ग या भूतलावर परमेश्वराने रेखाटलेला आहे सुंदर फुल पक्षी प्राणी आकाश डोंगर पर्वत रांगा बर्फाळ प्रदेश वाळवंट मोठमोठे सुंदर मरूद्यान काय काय नाही या विश्वात सुंदर भूप्रदेशातली वेगवेगळी माणसं त्यांच्या कला क्रीडा संस्कृती परंपरा भौतिक प्रगती पुस्तकाचे अद्भुत भांड्यात महाराणावरची चिमुकली फुलं आणि या फुलांसारखी गोड मुलं आयुष्याच्या साठ-सत्तर वर्षात हे सगळं निरखायचं पार खायचा आहे खेळायचा आहे बागडायचा आहे नाचायच आहे हसायचं आहे कारण जीवन खूप सुंदर आहे एखाद दुसरा दहावी बारावीच्या झटक्यांना म्हणाला फुलवायचं एखाद्या केशराच्या बागेसारखा रंगीबेरंगी विस्तीर्ण अनुभवानी भरभरून अनुभवांना सुंदर संदर्भ लावायचे पायल चकला ठेच लागली तर प्रेमाने प्रेरणेनच मलम लावायचा जखम बरी करायचे आणि पुन्हा उभं राहायचं अजून लांब जग घेण्यासाठी मग काही झालं तरी परमेश्वरांना दिलेल्या या सुंदर आयुष्याच्या अपमान नाही करायचा आत्मघात नाही करायचा जगाबद्दल नकारार्थी दृष्टिकोन नाही ठेवायचा हीच तरुणांची खरी ओळख आहे खरंतर तुम्ही झोपल्यावर पाहता ती स्वप्न नसतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत असं म्हणतात ना येत न प्रयत्न जिद्द स्वप्न संकल्प हीच तर खरी खरी यशाची पंचसूत्री आहेत

मन मै है विश्वास

विश्वास नांगरे-पाटील हे एक तरुण. तडफदार आणि स्वच्छ प्रतिमेचे पोलिस अधिकारी म्हणून महाराष्ट्रात प्रसि‌द्ध आणि लोकप्रिय आहेत. मुंबईवरच्या २६/११ च्या हल्ल्यात त्यांनी दाखवलेल्या ६ धैर्यशाली...Read More

Dangat Arti Balu

Dangat Arti Balu

×
मन मै है विश्वास
Share

विश्वास नांगरे-पाटील हे एक तरुण. तडफदार आणि स्वच्छ प्रतिमेचे पोलिस अधिकारी म्हणून महाराष्ट्रात प्रसि‌द्ध आणि लोकप्रिय आहेत. मुंबईवरच्या २६/११ च्या हल्ल्यात त्यांनी दाखवलेल्या ६ धैर्यशाली नेतृत्वासाठी आणि प्रत्यक्ष पोलिस कारवाईतील सहभागासाठी मिळाल आहे. त्यांना राष्ट्रपती पारितोषिक समाजाला बरोबर घेऊन काम करण्याच्या त्यांच्या पद्‌धतीमुळे त्यांच्या लोकप्रियतेत सदैव भर पडत आहे. आपल्या या कर्तृत्त्वाने ते तरुणांचे आदर्श बनले नमते तरच नवल. आणि म्हणूनच विश्वासजी आपल्या या आत्मकथनातून तरुणांशी संवाद साधतायत. तरुर्णाना – विशेषत: यूपीएससी-एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या ग्रामीण तरुणांना – स्वानुभवातून मार्गदर्शन करायच्या तळमळीपोटी त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.

200 पानी पुस्तकाच्या सुरुवातीच्या प्रकरणात त्यांनी आपलं बालपण, शाळा. कॉलेजच्या वयातल्या आठवणी सांगितल्या आहेत. यशस्वी व्यक्ती म्हणजे ती लहानपणी खूप हुशार, सज्जन, एकपाठी, सर्वगुणसंपन्न असणार असाच आपला समज असतो. पण ते लहानपणीचा खोडकर मस्ती करणारा चुका करणारा विश्वास आपल्यासमोर ठेवतात तरुणपणातला टरेबाज, टुकार्या करत फिरणारा काही वेळा चुकीच्या मार्गाने जाऊ लागलेला तरुणही आपल्याला दिसतो. आणि हीच बाब आपल्याला अधिक भावते. शेकडा 90% मुलं अशीच असतात पण म्हणून ती सगळी वाया गेलेली नसतात, ज्याप्रमाणे विश्वासजींना सावरणारं, रागावणार, ओरडणार कोणीतरी घरचे असतील शिक्षक असतील किंवा मित्र भेटत गेले तसा आपल्याला भेटत गेलं तर आपणही सावरू शकतो. आपल्यातला सुप्तगुणांना वाव देऊन शकते. हा विचार आपल्या मनात रुजतो त्यांनी सांगितलेल्या एका शाळेच्या किस्य्यात, कदम बाई त्यांना म्हणाल्या अरे असाच किड्या मुंग्यांसारखा दुसऱ्यांवर अवलंबून राहशील अरे तुझी ओळख काय आहे. हा प्रश्न जर प्रत्येकालाच पडला तर सगळे कुठेतरी चांगले व्यवसायात असतील. पुढील जवळपास दीडशे पान त्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या अनुभवाबाबत आहेत. आताचे यशस्वी पोलीस अधिकारी आहेत, म्हणजे त्यांनी परीक्षा अगदी सहज डाव्या हाताचा मळा असल्यासारखे पास केली असेल असा आपला ग्रह होऊ शकतो, पण त्यांनाही यश अपयश पहावं लागलं अशा निराशेच्या झोकांड्या खाव्या लागल्या होत्या, पुन्हा पुन्हा स्वतःला प्रोत्साहित करावे लागल वाईट सवयींपासून, संगतीनपासून प्रलोभनांपासून स्वतःला जाणीवपूर्वक बाजूला काढावे लागलं. गावाकडंन आलेला मुलगा हा न्यूनगंड त्यांनाही वाटला, इंग्रजी कच्च असणारा, इंग्रजी संभाषण सफाईदार पाने न जमणारा मुलगा हा न्यूनगंड त्यानाही वाटला पन न्यूनगंडामुळे कधीही थांबले नाही तर त्यावर मात करायचे उपाय शोधले, हे सगळं तरुणांना कळावं हाच तर त्यात त्यांचा पुस्तक लिहिण्यामागचा मूळ उद्देश आहे. बहुतांश ग्रामीण विद्यार्थ्यांनी प्रमाणे त्यांनाही तयारीसाठी कोल्हापूर, मुंबई, पुणे अशी भ्रमंती करावी लागली. गैरसोईच्या अवस्तेत राहणं खाण्यापिण्याची आबळ सोसावी लागली. स्पर्धा परीक्षांचा अभ्यासाचा अवाक मोठा त्यामुळे तयारी करता करता कंटाळा यायचा, तर कधी या पैशाच्या विचारांनी आत्मविश्वास जायचा विश्वासरावांनी स्वतःला कसा अभ्यासाला लावलं हे खरंच प्रेरणादायी आहे. फक्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठीच नाही तर कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी व धडपडणाऱ्या कष्ट करायला तयार असणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक प्रेरणादायी आहे. पुस्तकात शेवटची काही पाने 26/ 11 च्या हल्ल्याच्या वेळेच्या कारवाई बद्दल आणि राष्ट्रपती पारितोषकाबद्दल आहे, या प्रसंगाविषयी अजून खुलासेवार लिहिता आलं असतं पण हा प्रसंग एका स्वतंत्र पुस्तक लिहिण्यासारखा आहे, तसच प्रस्तुत पुस्तकाचा उद्देश वेगळा असल्यामुळे त्यांनी फार लिहिणं टाळल असेल 26/ 11 च्या या हल्ल्यात त्यांनी बजावलेली कामगिरी अफलातून होती. पुस्तकात त्यांच्या रेव्ह पार्टी वरची कारवाई दरोड्यातल्या गुन्हेगारांचा पाठलाग सामाजिक सलोखा निर्माण करून गुन्हेगारी रोखण्याचे उपक्रम इत्यादी ओळख प्रसंगोपता होते. यश हे त्यागा शिवाय व भोगा शिवाय प्राप्त होत नाही. अपयश येऊनही न डगमगता खंबीरपणे त्या परिस्थितीला सामोरे जातो तोच खरा यशस्वी होतो. भावड्या माझे डोळे मिटायच्या आधी मला तुला लाल दिव्याच्या गाडीतून आलेले पाहायचं असं म्हणणाऱ्या बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बुडाला फोड येईपर्यंत मेहनत केली व अखेरच्या लढाई मध्ये मजल मारली. आत्मकथनातील आशया बरोबरच लेखकाने पुस्तकात उत्तम उत्तम छायाचित्रही दिल्यामुळे पुस्तक वाचनीय ते बरोबरच प्रेक्षणीय झाले आहे, हे आत्मकथन मुख्यतः तरुणांसाठी असेल तरी पालकांनी वाचण्यासारखं पुस्तक आहे सतत यश अपयश नैराश्याच्या गर्दीत उसळणारी मनस्थिती तरी परत फिनिक्स पक्ष्या प्रमाणे राखेतून भरारी मारण्याची जिद्द म्हणून हा 23 वर्षांचा जीवनपट ताकदिने उभा राहिला आहे.

मन मै है विश्वास

“मन मै है विश्वास” या आत्मकथनातून विश्वास नांगरे पाटील हे वाचकांना जिद्द आत्मविश्वास, धैर्य संयम आणि कठोर अशा परिश्रमाच्या यश कसे मिळवता येते हे सांगू...Read More

Mr. Sandip Darade

Mr. Sandip Darade

×
मन मै है विश्वास
Share

“मन मै है विश्वास” या आत्मकथनातून विश्वास नांगरे पाटील हे वाचकांना जिद्द आत्मविश्वास, धैर्य संयम आणि कठोर अशा परिश्रमाच्या यश कसे मिळवता येते हे सांगू इच्छितात. हे पुस्तक म्हणजे लेखकाचा प्रवास आणि अनुभवांची शिदोरी आहे. मा.श्री विश्वास नारायण नांगरे हे आय.पी.एस अधिकारी आहेत, त्यांचे हे पुस्तक मनाला हट्ट पकडून ठेवणाऱ्या लेखनशैलीमुळे आमच्यासारख्या तरुणांना आकर्षित करते.
लेखक आपल्या जीवनातील पहिल्या काळापासून लेखनाला सुरुवात करतात. कोकरूड गावातील एका साध्या कुटुंबात जन्मलेल्या आणि कष्टाच्या दुनियेत वाढलेला, तो यशाच्या मार्गावर जात असतांना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.त्यांच्या बालपणीच्या आठवणीमध्ये ते सांगतात की त्यांच्या शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी शिक्षकांनी दिलेली शिकवण आणि वडिलांनी त्यांच्या समोर ठेवलेले स्वप्न त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी मार्ग दाखवतात. शालेय शिक्षणापासून ते मुंबई,पुणे मधील विद्यालयीन शिक्षण तसेच दिल्लीतील यू.पी.एस सी ची मुलाखत गाठण्यापर्यंत त्यांनी परिस्थितीशी दिलेली झुंज असामान्य म्हणावी लागेल.स्पर्धापारीक्षेच्या अभ्यासाला लागणारी साधनसामग्री,पुस्तके,नोट्स यांची जमवाजमव असेल किवा परिस्थितीचे चटके सारं काही सोसत; आपले ध्येय गाठण्यासाठी डिटरमाइड राहिले.त्यांचे जीवन, वाचनाच्या आणि एकाग्रतेच्या कौशल्याने शिकत राहण्याचे प्रतिक बनले आहे. पुस्तक कसे वाचावे,परीक्षेच्या तासांची योग्य नियोजनबद्ध आखणी करून उत्तर कसे लिहावे या बद्दल तंत्र त्यांनी स्वत: विकसित केले आणि ते प्रभावीपणे मांडले.
‘तरुणपण घोडचुका,प्रौढत्व संघर्ष, म्हातारपण पश्चाताप’ या वाक्यातून त्यांना समजलेला प्रामाणिकतेचा अर्थ आणि सावधपणा तुयांच्या कृतीतून साहजिकच दिसतो. ‘शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर, युद्धाच्या काळात कमी रक्त सांडाव लागत’ , त्यांच्या यशामागे असलेला संघर्ष, त्यांची घेतलेली मेहनत आणि प्रत्येक टप्प्यावर केलेलं नियोजन वाचकांना नेहमीच प्रेरणा देते. त्यांची स्वतःची चुकांचे, अविचारांचे आणि चुकीच्या निर्णयांचे तपशील देत वाचकांशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला आहे. बेभरवशाच्या स्पर्धा परीक्षेच्या मृगजळात उतरून त्यांनी १९९६-१९९७ च्या काळात सलग तीन परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केल, ते म्हणतात हे यश लक बाय चान्स नसून,वेळेच नियोजन काय करायच ? कस करायचं ? आणि कोणी करायचं ? याची पद्धतशीर मांडणी आणि मग त्यावर अंमलबजावणी म्हणजेच त्यानुसार अभ्यास आणि सराव हे, सगळ कारणीभूत होत. परिस्थिती माणसाला बनवत नाही तर त्याच्यात असणारे सामर्थ्य टी ठरवते;त्यांचे कष्ट, त्यांची प्रामाणिक मेहनत आणि कडवट उणीवा त्यांना मोठ यश मिळून देता.उतरायचं, लढायचं ,जिंकायची तयारी ठेवायची हरलो तर पुन्हा उठायचं सर्वस्वाची कसोटी लाऊन लढायचं पण रडत बसायचं नाही. हा दृढनिश्चय आपल्याला आशेचा किरण देऊन जातो. ‘ परमेश्वरा मी जे बदलू शकत नाही ते स्वीकारण्याची मला ताकद दे,जे मी बदलू शकतो ते बदलण्याच मला सामर्थ्य दे, जे बदलू शकतो व बदलू शकत नाही यातला फरक ओळखण्याचं शहाणपण दे’ , हि निर्मळ आणि प्रांजळ प्रार्थना या पुस्तकाद्वारे आपल्या मनात स्पर्श करून जाते.
अधिकारी सेवेत रुजू झाल्यानंतर परिवर्तन घडवण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वीपणे पार पाडला आहे. २६ / ११ च्या दहशतवादी हल्यात त्यांनी दाखवलेल्या पराक्रमामुळे त्यांनी राष्ट्रपती पोलीस पदक (शौर्य) प्रदान करण्यात आला आहे.या आत्मकथनाणे लेखकांच्या जीवनातील अनोख्या पैलूचा शोध लावता येतो.अवघ्या तरुणाईचे आयडॉल,मोटीवेशनल स्पीकर असून त्यांची भाषा आणि वकृत्वशैली वाखाणण्याजोगी आहे. वाचकांच्या मनात नवी उमेद, उत्साह आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या या पुस्तकातील प्रेरणादायी संदेश – ‘जिथे विश्वास आहे तिथे यश आहे’.

Submit Your Review