Original Title
विंग्स ऑफ फायर
Subject & College
Publisher, Place
Total Pages
179
ISBN 13
9788174348807
Format
Soft Cover
Country
India
Language
Marathi
Translator
प्रा. माधुरी शानभाग
Average Ratings
Readers Feedback
अग्निपंख
Book Reviewed by पुजा जनार्धन गायकवाड (११ वी वाणिज्य) अग्निपंख हे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेले पुस्तक आहे. त्यांच्या जिवनातील प्रेरणादायी अनुभव...Read More
Yogita Phapale
अग्निपंख
Book Reviewed by पुजा जनार्धन गायकवाड (११ वी वाणिज्य)
अग्निपंख हे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेले पुस्तक आहे. त्यांच्या जिवनातील प्रेरणादायी अनुभव आणि यशस्वीतेया प्रवास मांडणारे एक महत्व पूर्ण साहित्य आहे . हे पुस्तक विशेषतः तरूण पिढीला उद्देशून लिहिलेल असून त्यांना स्वप्न पाहण्याची आणि हे सत्यात उतरण्याची प्रेरणा देते. डॉ कलाम यांनी आपल्या जीवनातील संघर्ष, कठोर, परीश्रम, आणि आत्मविश्वासाने उभ्या केलेल्या यशाची कथा यात मांडली आहे.
पुस्तकाचे नावातच असलेला ‘अग्निपंख’ हा शब्द कलाम यांच्या जिद्दीचा आणि ध्येयसिद्धिचा प्रतिक आहे. त्याच्या जीवनात आलेल्या अडचणींना त्यांनी कसे तोंड दिले, हे पुस्तकात सविस्तरपणे वर्णन केले आहे. या पुस्तकातून विद्यार्थ्यांनी आणि तरूणांनी स्वप्न बाळगण्याचे महत्त्व, कठोर परिश्रम करण्याची गरज आणि सातत्याने प्रगती करण्याची वृत्ती शिकावी, असे कलाम यांनी ठामपणे मांडले आहे.
कलाम यांच्या वैज्ञानिक योगदान विशेषतः भारतीय अंतराळ आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमातील, कामगिरी यांचेही पुस्तकात वर्णन आहे . त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारताच्या प्रगतीसाठी दिलेले योगदान तरूणांना प्रेरणादायी वाटते.
“अग्निपंख ” हे पुस्तक आशावादी दृष्टीकोन, प्रामाणिकपणा आणि निस्वार्थी देशसेवा यांचे उत्तम उदाहरण आहे. डॉ. कलाम यांचे विचार आणि शिकवण वाचकांच्या मनावर कायमचा प्रभाव पाडतात आणि त्यांना जिवनात यशस्वी होण्यासाठी दिशा दाखवतात.
“अग्निपंख” हे डॉ. ए. पी. जे यांचे आत्मचारित्मक पुस्तक आहे. ज्यात त्यांनी आपल्या आयुष्यातील अनुभव, संघर्ष, यश आणि प्रेरणादायी विचार मांडले आहेत. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण वाचकाला आयमातून शिकण्यास संधी देते. कलाम यांचे शैक्षणिक प्रवास, ते वैज्ञानिक म्हणून मिळवलेली ओळख, आणि अखेर राष्ट्रपति पदापर्यंत प्रवास अत्यंत साधेपणाने, पण प्रभावीपणे मांडला आहे.
पुस्तकाचा मुख्य गाभा हा स्वप्नानांची ताकद, त्याच्या पाठलाग आणि ध्येय साध्य करण्याच्या प्रवासात येणाऱ्या अडचणींवर मात कशी करावी. यावर आधारित आहे. त्यांनी स्वप्न तेव्हा सत्यात उतरतात जेव्हा आपण त्याचा सतत पाठलाग करतो. हा संदेश दिला त्यांच बालपण, शिक्षण आणि इस्त्रो आणि डी. आर. डी.ओ मधील योगदान यांची कथा सर्वासाठी प्रेरणादायी आहे.
कलाम यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांनी भारताच्या संरक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा उल्लेख करताना, त्याग भारतीय तरूणांना देशाच्या विकासासाठी समर्पित राहण्याचा संदेश दिला आहे. तसेच त्यांनी युवकांना सर्जनशीलता , जिद्द आणि सकारात्मक विचारसरणी ठेवण्याचा आग्रह धरला आहे.
“अग्निपंख” वाचल्यानंतर वाचकाला आपल्या जीवनात आव्हानांशी कसे सामना करावा स्वप्न कधी साध्य करावी आणि आपल्या देशासाठी काहीतरी कसे करावे यांची प्रेरणा मिळते. हे पुस्तक फक्त आत्मकथा नसुन, जीवनातील मुल्य शिकवणारी आणि प्रत्येक वाचकाला त्याच्या ध्येयाचा दिशेने उभारी देणारी अद्वितीय साहित्यकृती आहे.
अग्निपंख
Book Reviewed by माहेश्वरी नंदलाल अहिरे Maratha Vidya Prasark Samaj's K.S.K.W. Arts, Science & Commerce College, Cidco, Nashik 'अग्निपंख'.त्याच्या पृष्टभागावरील फोटो म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके...Read More
Yogita Phapale
अग्निपंख
Book Reviewed by माहेश्वरी नंदलाल अहिरे
Maratha Vidya Prasark Samaj’s
K.S.K.W. Arts, Science & Commerce College, Cidco, Nashik
‘अग्निपंख’.त्याच्या पृष्टभागावरील फोटो म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके शास्त्रज्ञ डॉ कलाम त्यांच्याबदद्ल जाणून घेण्याची उत्सुकता होतीच मधुरी शानभाग यांनी अनुवाद केलेले अग्निपंख म्हणजे डॉ कलाम यांचे आत्मचरित्र होय.
प्रत्येक यशस्वी व्यक्ती मागे त्यांचा संघर्ष दडलेला असतो. त्या संघर्षाचे वर्णन या पुस्तकात वाचायला मिळते. त्यामधुन आपण आपल्या रोजच्या जीवनात कसे वागतो? व कसं वागायला पाहिजे? हा मोठा धडा मी शिकलो. डॉक्टर अब्दुल कलाम यांची एक गोष्ट मला खुप आवडली साधी राहणे व उच्च विचारसरणी तसेच स्वत: मध्ये असलेल्या अंतर्गत ज्ञानाशी एकरूप होणे म्हणजेच स्वतः शीच संवाद साधणे होय.
अशिक्षित कुटुंब व छोटेसे गाव या सर्वामधून उंच भरारी घेऊन भारतरत्न हा सन्मान मिळवणारे व विज्ञान क्षेत्रात अमूल्य कामगिरी करणारे डॉक्टर अब्दुल कलाम हे माझ्या जीवनाचे आदर्श बनले आहेत खरंच हे पुस्तक प्रत्येकानेच वाचले पाहिजे पुस्तक वाचणं म्हणजे आयुष्याला कलाटणी देणारी गोष्ट आहे. मला वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमामुळे समजले हा उपक्रम राबवल्याबदद्ल मुख्यमंत्री साहेबांचे खूप खूप धन्यवाद.
अग्निपंख
Book Reviewed by Ubale Prashant Bhimrav, SYBA, Vidya Amrut Dnyan Prathisthan’s Arts, Science, Commerce College Shirsondi, Tal. Malegaon विंग्स ऑफ फायर: अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र...Read More
Chaudhari Jagdish Devram
अग्निपंख
Book Reviewed by Ubale Prashant Bhimrav, SYBA,
Vidya Amrut Dnyan Prathisthan’s Arts, Science, Commerce College
Shirsondi, Tal. Malegaon
विंग्स ऑफ फायर: अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र हे डॉ. एपीजे अब्दुल कलाम
आणि अरुण तिवारी यांनी लिहिले आहे. हे पुस्तक भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.
एपीजे अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र आहे. ही कथा रामेश्वरममधील एका तरुण
मुलाच्या प्रख्यात शास्त्रज्ञ होण्याच्या प्रवासावर लिहिली आहे . साधी राहणी,
समर्पण, इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम यामुळे यश कसे प्राप्त झाले हे यामधून
दिसून येते आहे. पुस्तकात डॉ. एपीजे कलाम यांच्या विस्तृत आणि तपशीलवार
प्रकल्प कार्याची माहिती दिली आहे, जी मला त्यांच्या जीवनाच्या कथेपासून
विचलित करणारी वाटते. काही वाचकांना हे तपशीलवार वर्णन कंटाळवाणे वाटू
शकते. हे अग्नी आणि इतर प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीवर प्रकाश टाकत
आहे. पुस्तकात डॉ. एपीजे कलाम यांच्या विस्तृत आणि तपशीलवार प्रकल्प कार्याची
माहिती दिली आहे, जी मला त्यांच्या जीवनाच्या कथेपासून विचलित करणारी
वाटते. काही वाचकांना हे तपशीलवार वर्णन कंटाळवाणे आणि अप्रिय वाटू शकते. हे
अग्नी आणि इतर प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीवर प्रकाश टाकते. ही
अपवादात्मक प्रतिभा असलेल्या सामान्य व्यक्तीची उत्कृष्ट कथा आहे. तसेच हे पुस्तक
एका दूरदृष्टी नेत्याच्या प्रवासाचे वर्णन केले आहे ज्यांची कृती त्याच्या शब्दांपेक्षा
खूपच जोरात आहे. ते अशा देशात राहतो जिथे जातीय दंगली सामान्य आहेत आणि
भ्रष्टाचार आणि लोभाने सिस्टम अधू केली आहे . सर्व असूनही, त्याने आपले संपूर्ण
आयुष्य आपल्या राष्ट्रासाठी दिले. जरी, ते इतके देशभक्त होते की शिलॉंग इंडियन
इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या स्टेज येथे श्रोतांचे भाषण झाले त्यावेळी त्यांचे निधन
झाले.
अग्निपंख
या पुस्तकातून डॉ.अब्दुल कलामांनी खूप छान असे मार्गदर्शन केले आहे.Read More
Kharat Jyoti Prakash
DREAMS ARE FOUNDATION OF SUCCESS
Agnipankh (wings of fire) is the autobiography of Dr.A.P.J.Abdul kalam, india's 11th president and a renowed scientist. It narrates this journey from a humble background...Read More
RUTIK BHAUSAHEB PADOL
DREAMS ARE FOUNDATION OF SUCCESS
Agnipankh (wings of fire) is the autobiography of Dr.A.P.J.Abdul kalam, india’s 11th president and a renowed scientist. It narrates this journey from a humble background to becoming on of india’s most celebrated figures in science and leadership.
Dr.kalam inspires readers to dream big, work hard and contribute positively to society. His life demonstrate that with determination. The book highlights his struggle, dedication to education and pivotal role in advancing india’s space and missile programms.
Agnipank
बालपण अथक परिश्रमात व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही, राष्ट्राच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेले डॉक्टर अब्दुल कलाम हे...Read More
Phapale Monali Kiran
Agnipank
बालपण अथक परिश्रमात व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही, राष्ट्राच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेले डॉक्टर अब्दुल कलाम हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आहे. विज्ञानाचा परम भोक्ता असणाऱ्या डॉक्टर कलामांना लहान मुलांची आणि विद्यार्थ्यांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारताचे भविष्य उज्वल करण्याचे सामर्थ्य हातात असलेल्या तरुणाईला नेहमीच ते प्रोत्साहन प्रोत्साहन देत संपूर्ण आयुष्य देश सेवेसाठी कार्यरत राहिलेले डॉक्टर अब्दुल कलाम पुढील वीस वर्षात होणाऱ्या विकसित भारताचे सतत स्वप्न पाहत असत. या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूला आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारत असताना दुसऱ्या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडण फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेले आहे, हे पुस्तक केवळ डॉक्टर अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या अवकाश संशोधन आणि तंत्रज्ञान विषयक लढाईचे एक स्पंदन आहे. जगातील शस्त्र स्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे. तसेच संपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहर्षक खंड काव्यच आहे. आकाश आणि समूह या दोन्ही अमर्यादित गोष्टी देवांच्या असून छोट्याशा तळ्यातही तो आहे, या ईश्वराचे अस्तित्व सांगणाऱ्या अथर्ववेदाच्या ओळींनी या आत्मचरित्राची सुरुवात होते. तमिळनाडूमधील रामेश्वर मध्ये अशिक्षित नावाड्याच्या मोठ्या कुटुंबात त्याचा जन्म झाला हिंदू-मुस्लिम ऐक्याची भावना जपणाऱ्या वातावरणात त्यांना लहानपणीपासूनच संस्काराची शिदोरी मिळाली . अग्निपंख मधून डॉक्टर कलामान सोबतच भारतीय अवकाश संशोधन तंत्रज्ञान विकास क्षेपणास्त्र निर्मिती मध्ये मोठा वाटा असणाऱ्या लोकांचे महत्वाचेकार्य सुद्धा लक्षात घेण्यासारखे आहे. भारतीय अवकाश संशोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे डॉक्टर विक्रम साराभाई, प्रो. सतीश धवन आणि डॉ. ब्रम्हाप्रकाश यांच्यासारख्या बड्या लोकांचे योगदान यातून समजते. कोणत्याही देशाला वाढविण्यासाठी विकासासाठी आर्थिक सुबत्तेच्या बरोबरीने बलशाली संरक्षण व्यवस्थेची गरज असते. या कार्यक्रमातून विकसित देशाच्या तुल्यबळ शस्त्र बनवणे संरक्षण खात्याला शक्य होईल. भारताच्या अवकाश संशोधनाला चालना मिळण्यास यातून मदत होईल. या अनुषंगाने सर्व सहकाऱ्यांचे या कार्यात तितकेच योगदान आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने साकार झालेल्या या यशाचे अनुभव नक्कीच प्रेरणादायी आहेत, शिवाय भारताच्या अवकाश संशोधन आणि शस्त्रास्त्र सज्जतेची ही कहाणी वाचकांना उभारी देणारी आहे
