Share

बालपण अथक परिश्रमात व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही, राष्ट्राच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेले डॉक्टर अब्दुल कलाम हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आहे. विज्ञानाचा परम भोक्ता असणाऱ्या डॉक्टर कलामांना लहान मुलांची आणि विद्यार्थ्यांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारताचे भविष्य उज्वल करण्याचे सामर्थ्य हातात असलेल्या तरुणाईला नेहमीच ते प्रोत्साहन प्रोत्साहन देत संपूर्ण आयुष्य देश सेवेसाठी कार्यरत राहिलेले डॉक्टर अब्दुल कलाम पुढील वीस वर्षात होणाऱ्या विकसित भारताचे सतत स्वप्न पाहत असत. या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूला आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारत असताना दुसऱ्या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडण फार सुंदरपणे वाचकांना सांगितलेले आहे, हे पुस्तक केवळ डॉक्टर अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारताच्या अवकाश संशोधन आणि तंत्रज्ञान विषयक लढाईचे एक स्पंदन आहे. जगातील शस्त्र स्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे. तसेच संपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहर्षक खंड काव्यच आहे. आकाश आणि समूह या दोन्ही अमर्यादित गोष्टी देवांच्या असून छोट्याशा तळ्यातही तो आहे, या ईश्वराचे अस्तित्व सांगणाऱ्या अथर्ववेदाच्या ओळींनी या आत्मचरित्राची सुरुवात होते. तमिळनाडूमधील रामेश्वर मध्ये अशिक्षित नावाड्याच्या मोठ्या कुटुंबात त्याचा जन्म झाला हिंदू-मुस्लिम ऐक्याची भावना जपणाऱ्या वातावरणात त्यांना लहानपणीपासूनच संस्काराची शिदोरी मिळाली . अग्निपंख मधून डॉक्टर कलामान सोबतच भारतीय अवकाश संशोधन तंत्रज्ञान विकास क्षेपणास्त्र निर्मिती मध्ये मोठा वाटा असणाऱ्या लोकांचे महत्वाचेकार्य सुद्धा लक्षात घेण्यासारखे आहे. भारतीय अवकाश संशोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे डॉक्टर विक्रम साराभाई, प्रो. सतीश धवन आणि डॉ. ब्रम्हाप्रकाश यांच्यासारख्या बड्या लोकांचे योगदान यातून समजते. कोणत्याही देशाला वाढविण्यासाठी विकासासाठी आर्थिक सुबत्तेच्या बरोबरीने बलशाली संरक्षण व्यवस्थेची गरज असते. या कार्यक्रमातून विकसित देशाच्या तुल्यबळ शस्त्र बनवणे संरक्षण खात्याला शक्य होईल. भारताच्या अवकाश संशोधनाला चालना मिळण्यास यातून मदत होईल. या अनुषंगाने सर्व सहकाऱ्यांचे या कार्यात तितकेच योगदान आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने साकार झालेल्या या यशाचे अनुभव नक्कीच प्रेरणादायी आहेत, शिवाय भारताच्या अवकाश संशोधन आणि शस्त्रास्त्र सज्जतेची ही कहाणी वाचकांना उभारी देणारी आहे

Related Posts