पुस्तक परीक्षण :- कु. संस्कृती रोहिदास गोडे, तृतीय वर्ष वाणिज्य , अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर एक
Read More
पुस्तक परीक्षण :- कु. संस्कृती रोहिदास गोडे, तृतीय वर्ष वाणिज्य , अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर
एक भाकरी तीन चुली या कादंबरीत खर्या अर्थाने ग्रामीण भागाचे चित्रण केलेलं आहे . दिवस भर काबाड कष्ट करून जीवन जगणाऱ्या महिलांच्या संघर्षाची कहाणी.
ग्रामीण भागातील खेडोपाडी वसलेल्या, शेतीमातीत राबणाऱ्या समाजातील महिलांच्या वाट्याला आलेलं अतोनात कष्ट, रूढी, परंपरा,जातपात यांचे ओझे, भावकी व त्यातून निर्माण झालेला संघर्ष लेखकांनी या कादंबरीत मांडलेला आहे. लेखकांनी अन्यायाविरोधात आवाज उठवनारी स्त्री उभी केली आहे. मायेचे एकही माणूस जवळ नसताना डोळ्यात पाणी न आनता आयुष्याची दीर्घाकालीन लढाई न थकता कशी लढावी ही या कादंबरीतील मुख्य नाईका पारू कडून शिकायला मिळते.
या कादंबरीतील नाईका “पारू ” यांचा संघर्ष जगण्याची, लढण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची नवी प्रेरणा निर्माण करतो आहे. अनेक संकटावर मात करत आयुष्यात पुढे कसं जायचं ही गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे. सरांची ही भावस्पर्शी कादंबरी वाचताना मी सलगपणे न वाचता माझ्या सोयीने वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करत असताना ही संवेदनशील कादंबरी वाचताना या कादंबरीतील एकही पान असे राहत नाही की, डोळ्याच्या कडा ओल्या होतं नाही. जस की
“बबू ” च्या लहानपणी न कळत्या वयापासून जो संघर्ष वाट्याला आला आहे तो आपलाच संघर्ष आहे असे वाटते. जस की, वही,पुस्तक, घेण्यासाठी पैसे नसतात तेव्हा दुसऱ्याच्या शेतात खत टाकायच काम आणि काम करत असताना पायला चावलेला विंचू आणि त्यातून आईने दिलेला धीर काळजात घर करून जातो. आईच आपल्या मुलावर असणार आभाळा एवढ्या प्रेमाचं दर्शन हा प्रसंग घडवून देतो.
त्याच प्रमाणे पुरुषप्रधान पद्धती, प्रचंड गरिबी उपासमार, व्यसनाधिनता, भोहतालच जगाचं वर्णन लेखकांनी केलेलं आहे.
बालपनीच्या आठवणी खूपच रोमांचक अश्या आहेत. त्यातुन प्रेरणा घेऊन आयुष्याचा कठीण प्रसंगाना सामोरं जाता येईल. काहीही झालं तरी पोटात शिरून राहता यायला हवं, हा संदेश लेखकांनी दिलेला आहे.
Show Less