Availability
available
Original Title
नॉट विदाऊट माय डॉटर
Subject & College
Series
Publish Date
2021-01-01
Published Year
2021
Publisher, Place
Total Pages
306
ISBN 13
9788171616732
Format
Paperback
Country
India
Language
मराठी
Translator
सोहोनी लीना
Average Ratings
Readers Feedback
नॉट विदाऊट माय डॉटर
Book Reviewd by : वाघ दीक्षा चंदू Class : T.Y.B.A. College : GMD Arts, BW`` Commerce & Science College, Sinnar Dist. Nashik एका आईच्या शौर्याची...Read More
Dr.Subhash Ahire
नॉट विदाऊट माय डॉटर
Book Reviewd by : वाघ दीक्षा चंदू
Class : T.Y.B.A.
College : GMD Arts, BW“ Commerce & Science College, Sinnar Dist. Nashik
एका आईच्या शौर्याची ही गाथा. स्वतःला आणि आपल्या मुलीला पर प्रांतातून मुक्त करण्यासाठी संघर्षपूर्ण प्रवासाची ही धरारक कहाणी आहे. या प्रवासात अनेक भावना वेचले आहेत, सुख, दुःख, दारिद्र्य, प्रेम, वात्सल्य, अन्याय, बलिदान, संघर्ष, देशप्रेम अशा कितीतरी भावना या प्रवासात गुंफल्या आहेत.
“Not Without My Daoughet” बेट्टी महमूदी यांनी स्वतःच्या जीवनावर विल्यम हॉकर यांच्यासोबत लिहिलेली वाचणीय कादंबरी. पुस्तकातील नाईका ही स्वतः लेखिकाच आहे. नाईकेचा नवरा हा इराणी असतो. अमेरिकेत वैद्यकीय शिक्षण घेऊन तो डॉक्टर होतो आणि नाइकेचा उपचार करताना तिच्या प्रेमात पडून ते दोघेही लग्न करतात. त्यांना मुलगी होते आणि तिचे नाव महातोब असेल ठेवतात.
आयतुल्लाह खोमेनीची इराणमध्येच राजवट येतात डॉक्टर बायकोला फसवून चार वर्षीय मुलीसह इराण मध्ये येतो. त्यांना घेऊन येतो तो पुन्हा अमेरिकेत न जाण्यासाठीच आणि मायलेकीला परत न पाठवण्यासाठीच. विमानतळावर उतरताच दोघींचे अमेरिकन पासपोर्ट काढून घेणे, जवळ असलेले पैसे काढून घेणे, यामागचा उद्देश मात्र नायिकेला समजला नाही. पुढे इस्लामिक रिवाजानुसार पूर्ण अंगभर गोशा /चादर ओढून सर्व शरीर इस्लामी रिवाजानुसार पूर्ण झाकून घेणे. इत्यादी बाबींची सक्ती तिथूनच सुरू झाली. पुरुषी वर्चस्वाच्या कैदखाण्यात मायलेकिंची त्वरित रवानगी झाली. ठरल्याप्रमाणे १५ दिवसानंतर अमेरिकेत जाण्यासाठी कोणतीही हालचाल होत नसल्याने नाईका समजून चुकली की तिची फसवणूक झाली आहे.
यानंतर तिच्यावर अनेक प्रकारचे अत्याचार झाले, आणि शेवटी अमेरिकेतील प्रॉपर्टी विकून तिचे पैसे घेऊन परत इराणमध्ये यावे म्हणून मुली शिवाय अमेरिकेत जाण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जाऊ लागला. परंतु ह्यावेळी नाईकेने नवऱ्याचा कुटील हेतू लक्षात घेऊन त्यास ठाम नकार दिला. शेवटी तिचा नवरा तिला एकटीला अमेरिकेला जाण्याची परवानगी देतो पण तिचा निर्धार “Not Without My Daoughet” माझ्या मुलीला इराणी महिलांचे शोषित आयुष्य जगण्यासाठी इथे सोडून जाणार नाही. मी परत जाईन आणि तेही मुलीला घेऊनच. मध्यंतरीच्या काळात या कैदेतून सुटके करिता अनंत शारीरिक, मानसिक, हालअपेष्टा सोसत गुप्तपणे प्रयत्न केले. इराणच्या स्वीसू वकिलाच्या युएस इंटरेस्ट सेक्शनशी संपर्क साधून अमेरिकेतील नातेवाईकांमार्फत, ओळखीच्या लोकांच्यामार्फत, मित्र-मैत्रिणीच्या मार्फत प्रयत्न केले. परंतु ती त्यातून फक्त तिचा आणि मुलीचा नवीन पासपोर्ट मिळवू शकली. इराणी कायदे हे पुरुष धार्जिणी असल्याने तिच्या प्रयत्नांना मोठीच खीळ बसत होती. हे सर्व प्रयत्न हे नवऱ्याला न कळत करताना तिला मोठी तारेवरची कसरत करावी लागत होती.
हे करताना अनेक वेळा मरेपर्यंत मारपीट, बंदीवास आणि इतर शारीरिक यातनाही सहन कराव्या लागल्या. हे सर्व होत असताना तिचा परमेश्वररावरील विश्वास, सहनशीलता आणि कोणत्याही वाईट प्रसंगाकडे सकारात्मक दृष्टीने पाहून स्वतःच्या ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करण्याची वृत्ती आणि पुन्हा मायदेशी मुलीसहित अमेरिकेत जाण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती पदोपदी दिसत होती. तिची इच्छाशक्ती इतकी प्रचंड होती की त्या बळावर तिने वैद्य मार्ग आणि अवैध मार्गांचा अवलंब करावा लागला. त्याचा अवलंब करण्याची तयारी ठेवली आणि तसे अथक प्रयत्न व गुप्तता बाळगून केले. आपल्यावर खूप प्रेम करणारा नवरा इथे आल्यावर किती बदलून गेला आहे, आपला त्याने विश्वासघात केला आहे हे तिने स्वीकारले. आता आपण काय करायचं, पुढच्या परिस्थितीला कसं सामोरे जायचं याचा त्या विचार करतात, अशा परिस्थितीत चार वर्षाच्या मुलीमध्ये आलेला समजूतदारपणा वाचताना आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
माणूसपण विसरलेला मनुष्य किती खालच्या थराला जाऊ शकतो याचे हे एक विशुद्ध वर्णन आहे. पुस्तक वाचताना एक-एक दृश्य डोळ्यासमोर जसे आहे तसे येत जाते. तसेच वाचकांच्या मनात सुद्धा विविध भावनांचा खेळ सुरू होतो. या मायलेकीचे दुःख पाहून एक पाषाण ही अश्रू पघळेल मग त्या नराधमाला का करुनेचा पाझर फुटू नये? हा प्रश्न अस्वस्थ करतो.
नवऱ्याचा कुटील डाव लक्षात येताच तिने अवैध मार्गाने ६ वर्षाच्या मुलीसह तुर्कस्थान मार्गे अमेरिका गाठण्याचा हिम्मतबाज निर्णय घेतला आणि अमलात आणला. असे करताना तिचा प्रवास अनेक मोटारी बदलून, दऱ्या-खोऱ्यातून, पर्वतरांगातून, बर्फवृष्टीतून, बर्फातून, पायी चालून इराणी बॉर्डरवरील टेहळणी नाके चुकवून तसेच तुर्की बॉर्डरवरील चेक पोस्ट चुकवून तुर्कस्तानात प्रवेश केला. तुर्कस्तानात गेल्यानंतर मात्र अमेरिकन वकिलातील तिच्याबद्दलची माहिती वॉशिंग्टन ऑफिस मधून आधीच मिळाल्याने अंकाराहून अमेरिकेत मायलेकी सुखरूप पोहोचल्या.
इराणमध्ये गेल्यावर तिला आलेले वाईट अनुभव, पतीने केलेले फसवणूक, तिचा आणि तिच्या मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ, युद्धजन्य वातावरण, तेथील लोकांचे राहणीमान, पुरुषी वर्चस्व आणि तेथील चालीरीती आणि परंपरा यामुळे महिलांना पुरुषी वर्चस्वाखाली आपले जीवन कसे जगावे लागते हे सर्व पुस्तकांमध्ये लेखिकेने मांडले आहे. हे सर्व झाले ते दुर्दम्य ‘इच्छाशक्ती’ आणि अथक परिश्रम, सहनशीलता आणि कोणत्याही वाईट बाबतीत सकारात्मक पाहण्याच्या दृष्टीमुळेच! या सर्व परिस्थितीतून ती तिच्या मुलीला घेऊन आपल्या स्वातंत्र्यासाठी इराण मधून पळून अमेरिकेला जाण्यासाठी तिने कशाप्रकारे प्रयत्न व अडचणीवर मात करून अमेरिकेला कशी पोहोचली या सर्व घडामोडींचे सर्व प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभे केले आहेत. लेखिकेचे या सहाशी वृत्तीचे कौतुक म्हणून जर्मनीने तिला ‘Courageous Lady of the Year’ म्हणून गौरविले. याचबरोबर ती अशा अनेक स्त्रियांच्या संघटनांसाठी कामही करत आहे, आणि काही स्त्री विषयक संघटनांची अध्यक्ष पदेही भूषवित आहे.
एका आईचा संघर्ष अतिशय उत्कृष्टरित्या दर्शविला आहे. त्यासोबतच इराणी महिलावर होणाऱ्या अन्यायांच्या, त्यांच्या अस्तित्वहीन जगण्याचे अंगावर काटा आणणारे वर्णन वाचून आपण किती नशीबवान आहोत की भारतीय स्त्री म्हणून जन्माला आलो असा विचार क्षणोक्षणी मनात येतो. अशा प्रसंगांना तोंड देऊन आपली सुटका करून घेणाऱ्या जिद्दी महिलेची गोष्ट आहे. वाचताना आपणही सगळं अनुभवतो आहे असे वाटते.
अप्रतिम असे हे पुस्तक सर्वांनी एकदा तरी वाचावे. स्त्रियांना तर नक्की विनंती करेन की आपल्याला आपल्या देशात मिळणाऱ्या स्वातंत्र्य आणि समानतेची, न्यायालयात न्याय मागू शकणाऱ्या व्यवस्थेची जाणीव करून घेण्यासाठी हे पुस्तक एकदा जरूर वाचा.
धन्यवाद!
“Not without my daughter” is one of the best books I have read. The book is about real life story of Betty Mahmoody
Survase Asmita Gunvant (Student-SY BBA, MES Senior College Pune) नॉट विदाऊट माय डॉटर यामध्ये महत्वाची पात्रे मुडी , माहतोब आणि बेटी आहेत. बेटी आणि मूडी...Read More
Survase Asmita Gunvant
“Not without my daughter” is one of the best books I have read. The book is about real life story of Betty Mahmoody
Survase Asmita Gunvant (Student-SY BBA, MES Senior College Pune) नॉट विदाऊट माय डॉटर यामध्ये महत्वाची पात्रे मुडी , माहतोब आणि बेटी आहेत. बेटी आणि मूडी हे नवरा बायको आहेत त्यांना माहतोब नावाची मुलगी असते. बेटी ही मुडीच्या प्रेमात पडते व मूडी हा इराणचा असतो व तो हॉस्पिटल साठी अमेरिकेमध्ये स्थायिक झालेला असतो थोडक्यात सांगायचे झाले तर पूर्वीच्या काळी स्त्रियांचे कशाप्रकारे छळ , अत्याचार केला जायचे त्यांना कशी वागणूक दिली जात असे हे या पुस्तकातून मांडलेले आहे . मूडीने फसवून बेटीला इराणला घेऊन गेला व नंतर तिला त्याच्याकडे येऊ दिले नाही तिचा खूप छळ केला. यावर खूप अत्याचार सहन करून ती कशीबशी खूप दिवस साधारणपणे ३ ते ४ महिने प्रयत्न करून अखेर आई वडिलांकडे आली व तिच्या प्रयत्नाला यश आले.
