Availability
upcoming
Original Title
फिनोलेक्सपर्व There's No Such Thing As A Self-Made Man
Subject & College
Publish Date
2008-01-01
Published Year
2008
Publisher, Place
Total Pages
164
ISBN
9789383572199
Format
Paperback
Country
INDIA
Language
MARATHI
Average Ratings
Readers Feedback
फिनोलेक्सपर्व : There’s No Such Thing As A Self-Made Man
शून्यातून विश्व निर्माण करणे हे वाक्य आपण व्यवहारात वापरतो. पण ह्या वाक्याचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर हे पुस्तक वाचावेच लागेल. हि एका उल्लेखनीय...Read More
SALVI ASHWINI JAYWANT
फिनोलेक्सपर्व : There’s No Such Thing As A Self-Made Man
शून्यातून विश्व निर्माण करणे हे वाक्य आपण व्यवहारात वापरतो. पण ह्या वाक्याचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर हे पुस्तक वाचावेच लागेल. हि एका उल्लेखनीय माणसाची कथा आहे. प्रल्हाद पी छाब्रिया – Chairman Finolex Group यांचे हे आत्मकथन आहे. पण हे आत्मकथन वाचताना लेखकाने प्रांजळपणे स्वत:च्या आयुष्याकडे बघण्याचा प्रयत्न केला आहे हे जाणवते.
पुस्तकाचे शीर्षक वाचून असे वाटते कि हे पुस्तक म्हणजे त्यांच्या कंपनीचा इतिहास आहे. तसा तो आहेही. पण ह्या पुस्तकाच्या कक्षा खूप रुंद आहेत. एका अर्थाने हे लेखकाचे आत्मचरित्र आहे. कंपनी हा लेखकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे कंपनीचा उल्लेख अपरिहार्यच आहे. पण हे पुस्तक म्हणजे एका जिद्दी तरुणाची गोष्ट आहे, जी सर्वांसाठी स्फूर्तीदायक आहे. निवेदनाच्या ओघात लेखक तरुणांसाठी काही मोलाचे सल्लेहि देतो. पुस्तकात नातेसंबंध या विषयावर चांगले भाष्य केले आहे. लेखक हे आत्मकथन खूप अलिप्तपणे करतो.
१२ मार्च ,१९३० रोजी लेखकाचा जन्म पाकिस्तानात एका श्रीमंत कुटुंबात झाला. वयाच्या १२ व्या वर्षी लेखकाचे वडील वारले. श्रीमंती अनुभवल्यानंतर कुटुंबाला गरिबीत दिवस काढावे लागतात कारण वडिलांची संपत्ती भाऊ धंद्यातील कर्ज फेडण्यासाठी वापरतात . मग लेखकाची रवानगी आत्याकडे पुण्याला होते. नोकर म्हणून काम करावे लागते. लेखक नेहमी विचारात पडतो कि असे कसे झाले? पण तो प्रामाणिक प्रयत्न सोडत नाही. नेमून दिलेले काम चोख पार पडतो व मनात प्रत्येक दिवसाचे निरीक्षणहि टिपत जातो. १९४७ साली फाळणी होते. मिळेल त्या सामनासकट त्याच्या कुटुंबाला पाकिस्तान सोडावे लागते. आपल्यापैकी बरेच जण स्वातंत्र्यानंतर जन्माला आले . फाळणीच्या कथा आपण नाटकात – सिनेमातच पाहिल्या आहेत किवा कथा – कादंबर्यात वाचल्या आहेत. पण लेखक ह्या भीषण परिस्थितीचे शांतपणे वर्णन करतो व वाचताना आपण अवाक होतो. लेखकाचे कुटुंब खूप मोठे असते. ४ भाऊ आणि ५ बहिणी. हे सर्व जण फाळणी नंतर पुण्यात स्थाईक होतात.
सर्व भाऊ व्यवसाय सुरु करतात. लेखकाचा व्यवसाय वाढीत मोलाचा वाट असतो पण सर्व मोठे भाऊ त्याला लहानच समजतात व त्याच्या शब्दाला किंमत देत नाहीत . लेखक आपले काम सुरूच ठेवतो. कालांतराने तो धाकट्या भावा बरोबर स्वतंत्र व्यवसाय सुरु करतो. भाऊ खांद्याला खांदा लाऊन त्याच्या बरोबर व्यवसायात झोकून देतो. व्यवसाय वाढवताना येणाऱ्या अडचणी, सरकारचे कडक नियम, बदलणाऱ्या Govt . Policy व त्यामुळे उद्योगांना होणारा त्रास कथन करतो. ह्या सर्व प्रवासात लेखक माणुसकी विसरत नाही. कामगारांची काळजी घेतो व Staff welfare चे धडे इतरांना घालून देतो. प्रत्येक कठीण प्रसंगात त्याला अचानक मदत मिळते. ह्या अदृश्य शक्तीचे ऋण कायम मनात बाळगतो. लेखकाला गुरुचे आशीर्वादहि लाभतात. लेखक सामाजिक बांधिलकी जपतो. पाय नेहमी जमिनीवर राहतील ह्याची काळजी घेतो. लेखक एकत्र कुटुंब पद्धतीबद्दल अधून मधून भाष्य करतो. हे कथन करतानाच Principles of Management हि आपल्याला शिकवून जातो. खरेतर लेखकाचे शालेय शिक्षणहि पूर्ण झालेले नसते पण अनुभवातून आणि निरीक्षणातून लेखक हे विश्व उभारतो. यश न मिळालेल्या Projects बद्दलही लेखक मोकळेपणी बोलतो. हा सच्चेपणा आपल्याला नक्कीच भावतो. व्यवसायामुळे कुटूंबासाठी पुरेसा वेळ देता आला नाही म्हणून खंतहि व्यक्त करतो. आयुष्यात नियमितपणा पाहिजे हे आग्रहाने नमूद करतो. त्याचवेळी कामात आणि मौज मजेत बुडालेल्या आजच्या तरुणांना वडिलकीचा सल्लाहि देऊन जातो. हे सर्व कथन मृदू शब्दात करून कोणी दुखावला जाणार नाही ह्याचीहि काळजी घेतो.
सिंधी समाज सुफी परंपरा मानतो. सुफी परंपरा असे मानते कि माणूस जन्माला येतो ते मोकळ्या हातानी आणि जातो ते मोकळ्या हातानी. मागे उरते ती या जन्मात केलेली कृती. लेखक ह्या शिकवणी प्रमाणे आयुष्यभर कृतीच करत राहतो व बघता बघता एक साम्राज्य उभे राहते.
पुस्तकाचा Font मोठा आहे त्यामुळे पुस्तक वाचताना अजिबात त्रास होत नाही. मी कधीहि एका दमात कोणतेही पुस्तक वाचत नाही. पण हे पुस्तक वाचताना झपाटल्या सारखी अवस्था झाली. ओघवत्या कथनात पुस्तक वाचून कधी संपले ते कळलेच नाही.
हे पुस्तक वाचताना प्रत्येकाला काहीतरी शिकायला मिळेल. कारण वर नमूद केल्या प्रमाणे हे पुस्तक म्हणजे आत्मकथन आहे, एका प्रतिथयश कंपनीचा इतिहास आहे, व्यवस्थापनावरील पुस्तक आहे, एकत्र कुटुंब व त्याचे फायदे सांगणारे आहे , तरुणांना मार्गदर्शक आहे , उद्योग विश्वासाठी उपयोगी, प्रतिकूल परिस्थितीवर कशी मात करता येतो ह्याच्या शिकवणीसाठी.
