Share

Publisher, Place

Total Pages

757

ISBN 13

9789357201674

Format

paper back

Language

Marathi

Readers Feedback

Gujar Chanchal Raosaheb

संगमनेर नगरपालिका कला, दा.ज. मालपाणी वाणिज्य आणि ब. ना. सारडा विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त), संगमनेर जि. अहमदनगर विद्यार्थी चंचल रावसाहेब गुजर वर्ग - एस. वाय.बी.ए. पुस्तकाचे...Read More

Vishal Jadhav

Vishal Jadhav

×
Gujar Chanchal Raosaheb
Share

संगमनेर नगरपालिका कला, दा.ज. मालपाणी वाणिज्य आणि ब. ना. सारडा विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त), संगमनेर जि. अहमदनगर
विद्यार्थी चंचल रावसाहेब गुजर
वर्ग – एस. वाय.बी.ए.
पुस्तकाचे नाव – मृत्युंजय
लेखकाचे नाव – शिवाजी सावंत
पुस्तक परीक्षण / पुस्तक अभिप्राय
‘मृत्युंजय’ ही प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांची कादंबरी आहे. जी महाभारतातील एक अत्यंत महत्वाच्या पात्र असलेल्या कर्णाच्या जीवनावर आधारित आहे. कर्णाचे जीवन अत्यंत संघर्षपूर्ण, सशकत आणि विरोधाभासाने भरलेले होते. कादंबरीच्या माध्यमातून लेखकाने कर्णाच्या जीवनाची गहनता याच्या अंतांचा नैतिकतेचा आणि त्याच्या नातेसंबंधा -चा वेगळा दृष्टिकोन दिला आहे. कर्णाची जन्मकथा आणि त्याचा संघर्ष प्रमुख आहे. कर्णाला त्याच्या जन्माची खरी माहिती नाही होती, तो एक राणीच्या गर्भातून जन्माला आलेला अपत्य असतो . जन्माने तो शुद्ध असतो, तरी त्याचा शस्त्रविद्येचा शिक्षण मिळवले आणि तो महान योद्धा बनतो कर्णाची सद्गुणे त्याचे त्याच्या धाकट्या भावांसाठी केलेले समर्पण, त्याचे कर्तृत्व आणि त्याचे शौर्य अत्यंत प्रेरणादायक आहेत. कांदबरीत कर्णाच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांची विस्तृत मांडणी केली आहे. कर्णाच्या नातेसंबंधांतील त्रास, त्यांचा अर्जुनाशी असलेला शत्रुत्व आणि त्याच्यावर झालेल्या अन्यायाच्या कथा या सर्व गोष्टींना लेखकाने तपशीलवार आणि संवेदनशीलपणे प्रकट केले आहे. कर्णाच्या जीवनातील महत्वाच्या क्षणांना न्याय देण्यात आले. आहे, आणि कर्णाच्या पात्राचा मानवी दृष्टिकोण वाचकांपर्यंत पोहोचवला आहे. ” मृत्युंजय “ही कादंबरी केवळ ऐतिहासिक कथेची मांडणी नाही, तर ती कर्णाच्या जीवनातील विविध पैलूंचा गहन अभ्यास करतात, ज्यामुळे वाचक कर्णाला त्याच्या संपूर्ण मानवी रूपात समजू शकतात. कादंबरी वाचल्यावर कर्णाच्या जीवनाची खरी आणि समजून उमजून पाहण्याची दृष्टी मिळते

मृत्युंजय

Shinde Aradhya Nandkumar : B.S.c(cs)First Year , COLLEGE OF COMPUTER SCIENCES WAKAD,PUNE मृत्युंजय ही कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहलेली आहे. सावंतानी धैर्यवीर शूरवीर मृत्युवरही वीजय...Read More

Shinde Aradhya Nandkumar

Shinde Aradhya Nandkumar

×
मृत्युंजय
Share

Shinde Aradhya Nandkumar : B.S.c(cs)First Year ,
COLLEGE OF COMPUTER SCIENCES WAKAD,PUNE
मृत्युंजय ही कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहलेली आहे. सावंतानी धैर्यवीर शूरवीर मृत्युवरही वीजय मिळवणाऱ्या कर्णाचा जीवन प्रवास त्या पुस्तकात अत्यंत सुंदर प्रकारे मांडला आहे. मग कर्णाच्या आयुष्यातील चांगला वाईट गोष्टींचे वर्णन मृत्युंजय मध्ये केलेले आहे.

मृत्युंजय या कादंबरीला १९९‌६ सालचा मूर्तीदेवी पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. पुस्तकाचे मुख पृष्ठ अत्यंत सुंदर आणि कर्ण ही व्यक्तीरेखा स्व. दिनानाथ दलाल यांनी साकारले ली दिसून येते. मृत्युंजय पुस्तकाचे आणेक वैशिष्टे आहेत त्यातील अत्यंत महत्त्वाचे म्हणजे पुस्तकातील जिवंत भास निर्माण करणारी चित्रे व तसेच पुस्तकातील भाषांतराला सुद्धा बऱ्याच ठिकाणाहून गौरवन्यात आलेले आहे.

मृत्युंजय हे पुस्तकाच नाव कर्णाच्या जीव‌नावर आधारीत आहे हे जाणवते. मृत्युवरही विजय मिळवणारा म्हणजे मृत्युंजय आणि मृत्युंजय म्हणजेच कर्ण. कर्ण हा सूर्यपुत्र म्हणून ओळखला जातो सूर्य आनी कुंती हे , कर्णाचे खरे माता पीता आहेत हे आपल्याला ह्या पुस्तकातून समजते. कर्ण आपल्या खऱ्या आईला सगळ्यात शेवटी भेटतो आणि त्याला नंतर जाणवते की तो ज्यांच्याशी भांडतोय ते दूसरे तिसरे कोणी नसून आपलेल सावत्र भाऊ आहेत (पाच पांडव )

कुंतीला सूर्यदेव म्हणाले मी तुला एक दानशूर पुत्त्र देतो, आणि कालांतरानी तिच्या पोटी एक मुलगा जन्माला आला त्याला जन्मताच कवच होते कुंतीने त्याला गंगेत बुडवले.त्यानंतर धृतराष्ट्राचा सारथी गंगेत घोड्याला पाणी पाजत आसताना त्याला हा मुलगा सापडतो त्या सारथ्याला कोणताही मुलगा-मुलगी नसते त्याने त्याला घरी नेले, आणि त्याचे नाव कर्ण ठेवले, कर्णाला लहानपणापासून वडिलांन सारखाच युध्यकलेत खूप आवड होती. त्यानंतर कर्णाची द्रोणाचार्य यांच्याशी भेट झाली द्रोणाचार्य ते त्या काली सगळ्या राजकुमारांना शिकक्षण देत आसत. द्रोणाचाऱ्यांच्या भेदभावामुळे कर्ण हा परशुरामांचा शिष्य होता एकदा हास्तनापुरात स्पर्धा घेण्यात आली दुर्योधनाला त्या स्पर्धेत कर्णाने हरवून विजय मिळवला तेव्हा दुर्योधनाने कर्णला अंगराज म्हणून घोषित केले जेने करून, पांडवांशी युद्ध करण्यात कर्णाची मदत होईल. या नंतर दुर्योधन आणि कर्ण चांगले मित्र झाले.

पुस्त‌कात फक्त कर्ण आणि दुर्योधन नव्हे तर कर्णाच छोटा भाऊ म्हणजेच शोण हा कर्णाचा लहान भाऊ आसल्याने अतिशय विलोभणीय आहे. अर्थातच शोणाला कर्णचा खूप अभिमान सतत दादा दादा करणारा हा शोण खूप सुंदर प्रकारे मांडला आहे.
फक्त शोणच नाही तर कुंती चा जीवन प्रवास ह्या पुस्तिकात पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचवला आहे. कर्ण म्हणजेच कुंतीचा आपला मुलगा आहे हे कुंतीला खुप शेवटी जाणवतं आपला सूर्यपुत्र दुसरा तिसरा कोणी नसून कर्ण हाच आहे. जो दुर्योधना सोबत राहून आपल्या पाच पूत्रांशी युद्ध खेळत आहे तो कर्ण. कानात अत्यंत सुबक आणि देखने कवचकुंडलं आसलेला कर्ण हा कुंतीचाच मुलगा आहे त्याचा उलगडा मृत्युंजय कादंबरीतून होतो.

कर्णाच्या कवचकुंडल किती सुंदर असतील हा विचार आपल्या मनात येतो हे पुस्तक वाचताना आपण फक्त कर्णला कर्णच्या दृष्टीकोनातून न पाहता, कर्णा बद्‌दल स्वार्थी भावनेने मैत्री करण्याऱ्या दुर्याधनाच्या, कुंतीच्या, आपल्या लहान भावाच्या शोणाच्या तसेच वृषालीच्या आणि महत्वाचे म्हणजे श्रीकृष्णाच्या नजरेतून सुद्‌धा पाहायला लागतो. मृत्युजय या कादंबरीतून जसे आपण कर्ण या व्यक्तीला सगळ्या दृष्टीकोनातून पाहतो तसेच रोजच्या आयुष्यात सुद्धा आपण एका घटने कडे चांगल्या वाईट दृष्टीकोनातून पाहायला शिकतो. वरकरणी पाहता पुस्तकाची भाषा जरा आवघड वाटतही आसली तरी एकदा पुस्तक वाचायला घेतल्यावर आपल्याला तंद्री लागते आणि पुस्तकाचे जाड पणाचे भूत आपसूक उतरतं.
कालांतराने आपण जे कोणी व्यक्ती आसू ती व्यक्ती पुस्तकातील पात्रास जवळून पाहते. तुम्ही ह्या पुस्तकाच्या प्रेमात नक्कीच पडाल ही माझी खात्री आहे.आपली शब्दसंपदा चांगली व्हावी आणि आपल्याला महाभारताचा उलगडा व्हावा हया साठी मृत्युंजय प्रत्येकाने नक्कीच वाचायला हवे. असे म्हणतात पुस्तकाने अशक्त मस्तक सशक्त होते आणि सशक्त मस्तक डोळे झाकून कोणापुढे नतमस्तक होत नाही”आपण प्रत्येक गोष्टीकडे पुस्तक वाचल्याने सकारात्मक दृष्टीकोनाने बघायला शिकतो जसे या पुस्तकात आपण एकाच व्यक्तीरेखेकडे अनेक दृष्टीकोनातून पाहीले. तसेच आपल्या दैनंदिन आयुष्यातही अनेक गोष्टीना अनेक दृष्टीकोन आसतात हा फक्त तो दृष्टीकोन आपल्याला वाचता यायला हवा. खरच नाण्याला दोन बाजू आसतात आणि नान्याच्या दोन्ही बाजू समजण्यासाठी वाचनाचा फार मोठा वाटा आहे.

आपल्या आयुष्यात कर्णा प्रमाणेच अनेक व्यक्तीरेखांच्या उलगड्यासाठी पुस्तक वाचायलाच हवे आणि त्याची सुरुवात “मृत्युंजय” याने झाली तर अती उत्तम.

“मृत्युंजय” हे पुस्तक केवळ एक कथा नाही, तर एक जीवनदर्शन आहे

Akashay Raju Kambale (T.Y. B. A Economics) HPT Arts & RYK Science College Nashik "मृत्युंजय" ही मराठी साहित्यातील एक अजरामर कलाकृती आहे. शिवाजी सावंत यांचे...Read More

Akashay Raju Kambale

Akashay Raju Kambale

×
“मृत्युंजय” हे पुस्तक केवळ एक कथा नाही, तर एक जीवनदर्शन आहे
Share

Akashay Raju Kambale (T.Y. B. A Economics) HPT Arts & RYK Science College Nashik
“मृत्युंजय” ही मराठी साहित्यातील एक अजरामर कलाकृती आहे. शिवाजी सावंत यांचे हे अद्वितीय साहित्य महाभारतातील कर्णाच्या जीवनकहाणीवर आधारित आहे. या पुस्तकाने कर्ण या पात्राच्या मनोभावांना, संघर्षांना आणि त्याच्या जीवनातील वेदनांना एक वेगळा आयाम दिला आहे. शिवाजी सावंत यांनी त्यांच्या सखोल चिंतनशील दृष्टिकोनातून कर्णाच्या जीवनाचा शोध घेत एक अद्वितीय कलाकृती तयार केली आहे.
पुस्तकाची कथावस्तू
“मृत्युंजय” कर्णाच्या जीवनाच्या विविध टप्प्यांवर प्रकाश टाकते. महाभारताच्या मुख्य कथेत कर्ण हा एक दुय्यम पात्र म्हणून दिसतो, पण या कथेच्या माध्यमातून तो एका मुख्य नायकाच्या रूपात उभा राहतो. कर्णाच्या जन्मापासून ते कुरुक्षेत्राच्या युद्धात त्याच्या मृत्यूपर्यंतची कहाणी पुस्तकात सखोलपणे मांडलेली आहे.
मुख्य व्यक्तिरेखा आणि त्यांचा विकास पुस्तकातील कर्ण हा एक दुहेरी व्यक्तिमत्त्वाचा नायक आहे. एकीकडे त्याच्या जीवनातील शोकांतिकांना तोंड देताना त्याचा संघर्ष दिसतो, तर दुसरीकडे त्याची कर्तव्यपरायणता आणि सच्चेपणा यामुळे तो वाचकांना प्रेरणा देतो.
कर्णाची आई कुंती, त्याचा मित्र दुर्योधन, त्याच्या आयुष्यातील गुरू आणि प्रतिस्पर्धी ही पात्रे देखील कथेला एक वेगळे आयाम देतात. कर्ण आणि दुर्योधनाच्या मैत्रीचा आधार हा कथेसाठी विशेष महत्त्वाचा आहे. दुर्योधनाच्या समर्थनासाठी कर्णाने केलेल्या बलिदानांमुळे त्याची निष्ठा अधोरेखित होते.
प्रभाव आणि संदेश
“मृत्युंजय” हे पुस्तक केवळ एक कथा नाही, तर एक जीवनदर्शन आहे. कर्णाच्या जीवनातून स्वाभिमान, संघर्ष आणि आत्मसन्मानाचे महत्त्व अधोरेखित होते. त्याची कर्तव्यनिष्ठा आणि आपल्या वचनांप्रती असलेली बांधिलकी आजच्या काळातील वाचकांसाठीही प्रेरणादायी ठरते.
पुस्तकात सामाजिक विषमता, धर्म, राजकारण, आणि व्यक्तीच्या अस्तित्वाच्या प्रश्नांवरही चर्चा होते. कर्णाच्या आयुष्याचा संघर्ष म्हणजे समाजाच्या अन्याय्य व्यवस्थेविरुद्ध एक आवाज आहे.
निष्कर्ष
“मृत्युंजय” हे पुस्तक मराठी साहित्याच्या सुवर्णयोगातील एक अमूल्य ठेवा आहे. कर्णासारख्या व्यक्तीरेखेला केंद्रस्थानी ठेवून लिहिले गेलेले हे पुस्तक वाचकांच्या मनात दीर्घकाळ घर करते. शिवाजी सावंत यांनी केलेल्या कर्णाच्या व्यक्तिमत्त्वाचे सखोल चित्रण वाचकांना वेगळा दृष्टिकोन देतं.
कर्णाच्या जीवनातील विविध भावनिक आणि सामाजिक पैलूंच्या सखोल अभ्यासासाठी “मृत्युंजय” हे पुस्तक एक आदर्श उदाहरण आहे. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी हे पुस्तक वाचले पाहिजे. हे पुस्तक आपल्याला कधीही न संपणारी प्रेरणा आणि जीवनाविषयीचे नवे आकलन देते.
भाषाशैली आणि लेखनशैली
शिवाजी सावंत यांची लेखनशैली ही साधी पण अत्यंत भावनिक आहे. त्यांनी महाभारतातील जटिल कथानकाला अधिक सुलभ, पण तरीही प्रभावीपणे मांडले आहे. त्यांच्या लेखणीत काव्यात्मकता आणि साधेपणा दोन्हींचा समतोल दिसतो. कर्णाच्या भावनांची मांडणी अतिशय प्रभावीपणे केली गेली आहे. वाचकांच्या मनात सहानुभूती निर्माण करण्याची लेखकाची हातोटी वाखाणण्याजोगी आहे.
पुस्तकातील संवाद नेमकेपणा आणि तर्कसंगतीने लिहिलेले आहेत. कथेत येणाऱ्या प्रसंगांमधील वर्णन वाचकांच्या डोळ्यांसमोर दृश्य उभे करण्याची ताकद ठेवतात. विशेषतः कर्णाचा शेवटचा क्षण आणि त्याची आतली वेदना वाचकांच्या मनाला भिडते.
प्रभाव आणि संदेश
“मृत्युंजय” हे पुस्तक केवळ एक कथा नाही, तर एक जीवनदर्शन आहे. कर्णाच्या जीवनातून स्वाभिमान, संघर्ष आणि आत्मसन्मानाचे महत्त्व अधोरेखित होते. त्याची कर्तव्यनिष्ठा आणि आपल्या वचनांप्रती असलेली बांधिलकी आजच्या काळातील वाचकांसाठीही प्रेरणादायी ठरते.
पुस्तकात सामाजिक विषमता, धर्म, राजकारण, आणि व्यक्तीच्या अस्तित्वाच्या प्रश्नांवरही चर्चा होते. कर्णाच्या आयुष्याचा संघर्ष म्हणजे समाजाच्या अन्याय्य व्यवस्थेविरुद्ध एक आवाज आहे.
निष्कर्ष
“मृत्युंजय” हे पुस्तक मराठी साहित्याच्या सुवर्णयोगातील एक अमूल्य ठेवा आहे. कर्णासारख्या व्यक्तीरेखेला केंद्रस्थानी ठेवून लिहिले गेलेले हे पुस्तक वाचकांच्या मनात दीर्घकाळ घर करते. शिवाजी सावंत यांनी केलेल्या कर्णाच्या व्यक्तिमत्त्वाचे सखोल चित्रण वाचकांना वेगळा दृष्टिकोन देतं.
कर्णाच्या जीवनातील विविध भावनिक आणि सामाजिक पैलूंच्या सखोल अभ्यासासाठी “मृत्युंजय” हे पुस्तक एक आदर्श उदाहरण आहे. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी हे पुस्तक वाचले पाहिजे. हे पुस्तक आपल्याला कधीही न संपणारी प्रेरणा आणि जीवनाविषयीचे नवे आकलन देते.

मृत्युंजय, ही केवळ एक कादंबरी नाही, तर एक अनुभव आहे

Khushabu Sonawane (Final Year) S.G.S.S.Loknete Dr. J. D. Pawar College of Pharmacy, Manur शिवाजी सावंत यांची कादंबरी, मृत्युंजय, ही केवळ एक कादंबरी नाही, तर एक...Read More

Khushabu Sonawane

Khushabu Sonawane

×
मृत्युंजय, ही केवळ एक कादंबरी नाही, तर एक अनुभव आहे
Share

Khushabu Sonawane (Final Year) S.G.S.S.Loknete Dr. J. D. Pawar College of Pharmacy, Manur
शिवाजी सावंत यांची कादंबरी, मृत्युंजय, ही केवळ एक कादंबरी नाही, तर एक अनुभव आहे. महाभारतातील कर्ण या पात्राचे एक वेगळे, अद्वितीय चित्रण या कादंबरीतून आपल्याला पाहायला मिळते.
यात वाचाण्याजोगी काही विशेष मुद्दे:
1. कर्णाचे खरे रूप: आपण सर्वांना महाभारतात कर्णाला एक खलनायक म्हणून ओळखतो. पण मृत्युंजय या कादंबरीत त्याच्या व्यक्तिमत्त्वाची अनेक नवीन पैलू आपल्यासमोर उलगडतात. त्याचे दानशूरपण, त्याचे संघर्ष, त्याचे दुःख, या सगळ्यांचा खोलवर शोध या कादंबरीत घेतला जातो.
2. सामाजिक विषमता: कर्णाच्या जीवनातून सामाजिक विषमता, जातव्यवस्था यासारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला जातो.
3. मानवी भावना: प्रेम, द्वेष, ईर्ष्या, दया, या सारख्या सर्व मानवी भावनांचे उत्कृष्ट चित्रण या कादंबरीतून आपल्याला पाहायला मिळते.
4. भाषाशैली: शिवाजी सावंत यांची भाषाशैली अत्यंत प्रभावी आहे. त्यांचे शब्दचित्र, त्यांचे वर्णन, आपल्याला कथेतूनच जणू त्या पात्रांच्या जगात घेऊन जातात.
काय शिकावे:
1. जीवनाचे खरे अर्थ: कर्णच्या जीवनातून आपल्याला जीवनाचे खरे अर्थ समजतात.
2. नवीन दृष्टिकोन: महाभारत या महाकाव्याबद्दल आपला दृष्टिकोन बदलतो.
3. आत्मचिंतन: आपल्या स्वतःच्या जीवनाबद्दल आपल्याला विचार करण्याची संधी मिळते.
कोणी वाचावी.
1. ज्यांना महाभारत आवडते त्यांच्यासाठी
2. ज्यांना सामाजिक विषयांवर आधारित कादंबऱ्या आवडतात त्यांच्यासाठी
3. ज्यांना मानवी भावनांचे खोलवर विश्लेषण आवडते त्यांच्यासाठी
4. ज्यांना एक चांगली कादंबरी वाचायची आहे त्यांच्यासाठी
अंतिम शब्द:
मृत्युंजय ही एक अशी कादंबरी आहे जी आपल्याला विचार करायला लावते, आपल्याला बदलते आणि आपल्याला जीवनाबद्दल नवीन दृष्टिकोन देते. जर तुम्ही एक चांगला वाचक असाल तर ही कादंबरी तुम्हाला नक्कीच आवडेल.

मृत्यूंजय

शिवाजी सावंत यांच्या लेखणीतुन साकारलेली भव्य दिव्य कादंबरी. लहानपणापासुनच त्यांना महाभारताविषयी असलेले आकर्षण व त्याला असलेली अभ्यास संशाेधनाच्या तपस्येची जाेड यातुन खरतरं मृत्युंजयाचा प्रवास सुरु...Read More

Dr.Rupali M. Phule

Dr.Rupali M. Phule

×
मृत्यूंजय
Share

शिवाजी सावंत यांच्या लेखणीतुन साकारलेली भव्य दिव्य कादंबरी. लहानपणापासुनच त्यांना महाभारताविषयी असलेले आकर्षण व त्याला असलेली अभ्यास संशाेधनाच्या तपस्येची जाेड यातुन खरतरं मृत्युंजयाचा प्रवास सुरु झाला. मृत्युंजयसाठी सतत सहा सात वर्ष त्यांनी अभ्यास केला. संपुर्ण हिंदुस्थानभर प्रवास करून मनन चिंतनाने हि कथा त्यांनी डाेळस बनविली 

खरतर हि सु्र्यपुत्र कर्णाची जीवणगाथा. कुंतीभाेज नगरातुन सुरु झालेली ही गाथा संपते ती कुरुक्षेञावर कितीतरी चित्तथरारक, रंजक, वादग्रस्त आणी दु:खद प्रसंगांनी भरलेलं आणी भारलेलं हाेत कर्णाचं जिवण. अंगराज कर्ण, दानशुर कर्ण, दिग्वीजयी कर्ण,जेॆष्ठ पांडवपूञ कर्ण,महारथी कर्ण,श्रे्ष्ट धनु्र्धर कर्ण अश्या ह्या कर्णावर नियतीने माञ अविरत घाव केले. त्याला सुतपुञ म्हणून जगाने हिनवले, कवच कुंडलांविना शापीत कर्ण म्हणून थाेरांनी त्याला डिवचले पण अशा सर्व प्रसंगांना निर्धारानं तोंड देत, मरणालाही हसत हसत कवटाळनारा हा मृत्युंजय म्हणुनच प्रेरणादायी ठरताे.

शिवाजी सावंतांची भाषा खरोखर अदभुत आणी रसाळ आहे. पुस्तक एकदा वाचण्यासाठी हाती घेतल्यानंतर खाली ठेवु वाटत नाही. वर्णन इतकं छाण आहे कि आपण कर्णाबरोबरच ते सारं जणु अनुभवत आहोत अस वाटतं म्हणुनच हे अनुभवण्यासाठी #मृत्युंजय सर्वांनी एकदा तरी वाचलच पाहीजे…!!

मृत्युंजय

मृत्युंजय कादंबरी हि शिवाजी सावंत यांनी भारतीय इतिहासातील सर्वात महान नायक कर्णाच्या जीवनावर लिहलेली एक सर्वउत्कृष्ठ कादंबरी आहे. यात कर्णाचे जीवन आणि काळ तसेच महाभारतातील...Read More

Dr. Reshma M Pathan , Asst, Professor , Tuljaram Chaturchand College

Dr. Reshma M Pathan , Asst, Professor , Tuljaram Chaturchand College

×
मृत्युंजय
Share

मृत्युंजय कादंबरी हि शिवाजी सावंत यांनी भारतीय इतिहासातील सर्वात महान नायक कर्णाच्या जीवनावर लिहलेली एक सर्वउत्कृष्ठ कादंबरी आहे. यात कर्णाचे जीवन आणि काळ तसेच महाभारतातील महत्वपूर्ण पत्रे तसेच त्या काळातील सामाजिक, राजकीय चौकट यावर प्रकाश टाकलेला आहे. सुरवातील कर्ण हा पांडव राणी कुंती आणि सूर्यदेव यांचा जेष्ठ पुत्र आहे. कुंती अपमान व भीतीपोटी आपल्या पुत्राला एका पेटीत टाकून दासीकडे सोडून देण्यासाठी देते. हस्तिनापुरातील अधिरथ व राधा यांना त्यांचा शोध लागून ते त्याचे पालनपोषण करतात.
मृत्युंजय हि कादंबरी कर्णाच्या जीवनावर आधारित आहे. या पुस्तकामध्ये प्रामुख्याने सहा पत्राच्या दृष्टिकोनाचा विचार केला आहे. सुरवातीला कर्ण त्याचा दृष्टीकोन लिहितो. त्यानंतर त्याची आई कुंती, दुर्योधन ,वृषाली, शोन आणि भगवान कृष्ण यांचे मनोगत व दृष्टीकोन यात पाहायला मिळतो.
लेखक शिवाजी सावंत यांनी मानवी समाजातील एक सर्वात मोठ्या वास्तवाला स्पर्श केला असून हि कादंबरी आपल्याला एक समाज म्हणून एखाद्याबद्दल आपले मत तयार करण्यासाठी त्याच्या वास्तविक वर्तनाची किवां मूल्याची पर्वा न करता त्यांच्या पार्श्वभूमीवर असामान्यपणे कसा भर देतोहे स्पष्ट केले आहे.
अस्तित्वाचा शोध घेताना समाजात किती वेगवेगळ्या गोष्टी घडून येतात याचे हे एक उत्तम उदाहरण आहे असे म्हणयला हरकत नाही. तसेच हि कादंबरी मानवी मानसिकतेचा एक उलेखनीय शोध आहे. मृत्युंजय हे सर्वात स्पष्टपणे वर्णन केलेल्या पुस्तकापैकी एक महत्त्वाचे पुस्तक आहे. विद्यार्थी तसेच वाचकांच्या वाचन संग्रहात समाविष्ठ असावे असे पुस्तक आहे.

संयम कसा ठेवावा, मैत्री कशी जोपासावी, शक्तीची घमेंड कशी मोडावी हे शिकवणारी ही कादंबरी आहे.

Dr. Patave Tarnnum R. (Asst. Prof.) S.G.S.S.Loknete Dr. J. D. Pawar College of Pharmacy, Manur . मृत्युंजय" याचा अर्थ आहे मरणानंतरही जिवंतः महाभारताच्या युद्धात अनेक...Read More

Dr. Patave Tarnnum R.

Dr. Patave Tarnnum R.

×
संयम कसा ठेवावा, मैत्री कशी जोपासावी, शक्तीची घमेंड कशी मोडावी हे शिकवणारी ही कादंबरी आहे.
Share

Dr. Patave Tarnnum R. (Asst. Prof.) S.G.S.S.Loknete Dr. J. D. Pawar College of Pharmacy, Manur .

मृत्युंजय” याचा अर्थ आहे मरणानंतरही जिवंतः महाभारताच्या युद्धात अनेक महारथी मरण पावले, परंतु मृत्युनंतरही जो मृत्युंजय ठरला तो होता कर्ण, “महादानशुर कर्ण!

कर्णाच्या च्या व्यक्तीरेखे वर ही कादं‌बरी आधारलेली आहे. यातील अनेक कथा बन्याच लोकांना माहित आहेत. खलनायक म्हणून भासणारा कर्ण हा मुळ स्वरूपात महाभारतातील सर्वात मोठा नायक आहे हे ही कादंबरी. पटवून देते. दानशूरपणा कशाला म्हणतात संयम कसा ठेवावा, मैत्री कशी जोपासावी , शक्तीची घमेंड कशी मोडावी हे शिकवणारी ही कादंबरी आहे.

या कादंबरी ला वाचताना जणू आपणही महाभारतात आहोत, त्या युगात आहोत असा भास होऊ लागतो. ही कादंबरी वाचताना वाटते कर्णाचे जीवन नव्याने उलगडू लागत. कर्ण ज्याने स्वत: च्या शब्दासाठी आपलं अस्तित्व, दान केले. आपले प्रण पूर्ण केले स्वतःचे वचन पूर्ण केले.

खारोखर, कुंतीला मिळालेले असामान्य वरदान, त्यातूनच त्यातून कर्णाचा झालेला जन्म , जगाच्या भितीने. कुतीने घेतलेला कठोर निर्णय, गुरु द्रोण व पांडवां कडून कर्णाचा झालेला अपमान, त्यातूनच दुर्योधना सोबत जन्मास आलेले मित्रप्रेम, द्रोपदी वस्त्रहरण, कुरुक्षेत्रातील युद्ध या सर्व गोष्टी प्रत्येकास माहित आहेतच. पण प्रत्येक गोष्टीत काही बारीक बारीक अश्या कितीतरी गोष्टी दडलेल्या आहेत. ते काही गोष्टी या पुस्तकातुन उलगडल्या.
आजचा तरुण व सर्वांनी वाचावी अशी ही मराठी साहित्यातील सावंत यांनी लिहिलेली अमर मृत्युंजय “कादंबरी आहे.
आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की पुस्त‌के प्रत्येक्ष हातात घेऊन वाचण्याची जी मजा आहे ती e-book बाचण्यात कधीही येणार नाही.
धन्यवाद !

Submit Your Review