Share

शिवाजी सावंत यांच्या लेखणीतुन साकारलेली भव्य दिव्य कादंबरी. लहानपणापासुनच त्यांना महाभारताविषयी असलेले आकर्षण व त्याला असलेली अभ्यास संशाेधनाच्या तपस्येची जाेड यातुन खरतरं मृत्युंजयाचा प्रवास सुरु झाला. मृत्युंजयसाठी सतत सहा सात वर्ष त्यांनी अभ्यास केला. संपुर्ण हिंदुस्थानभर प्रवास करून मनन चिंतनाने हि कथा त्यांनी डाेळस बनविली 

खरतर हि सु्र्यपुत्र कर्णाची जीवणगाथा. कुंतीभाेज नगरातुन सुरु झालेली ही गाथा संपते ती कुरुक्षेञावर कितीतरी चित्तथरारक, रंजक, वादग्रस्त आणी दु:खद प्रसंगांनी भरलेलं आणी भारलेलं हाेत कर्णाचं जिवण. अंगराज कर्ण, दानशुर कर्ण, दिग्वीजयी कर्ण,जेॆष्ठ पांडवपूञ कर्ण,महारथी कर्ण,श्रे्ष्ट धनु्र्धर कर्ण अश्या ह्या कर्णावर नियतीने माञ अविरत घाव केले. त्याला सुतपुञ म्हणून जगाने हिनवले, कवच कुंडलांविना शापीत कर्ण म्हणून थाेरांनी त्याला डिवचले पण अशा सर्व प्रसंगांना निर्धारानं तोंड देत, मरणालाही हसत हसत कवटाळनारा हा मृत्युंजय म्हणुनच प्रेरणादायी ठरताे.

शिवाजी सावंतांची भाषा खरोखर अदभुत आणी रसाळ आहे. पुस्तक एकदा वाचण्यासाठी हाती घेतल्यानंतर खाली ठेवु वाटत नाही. वर्णन इतकं छाण आहे कि आपण कर्णाबरोबरच ते सारं जणु अनुभवत आहोत अस वाटतं म्हणुनच हे अनुभवण्यासाठी #मृत्युंजय सर्वांनी एकदा तरी वाचलच पाहीजे…!!

Related Posts

बोर्डरूम

Dr. Rupali Phule
Shareव्यवस्थापनाच्या चकचकीत आणि गुंतागुंतीच्या जगाचा उलगडा करणारे, अच्युत गोडबोले यांचे “बोर्डरूम – व्यवस्थापन दुनियेची रोमहर्षक सफर” हे पुस्तक प्रत्येक वाचकाला...
Read More

राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान

Dr. Rupali Phule
Shareहमीद दलवाई यांच्या “राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान” या पुस्तकामध्ये भारतीय मुसलमान समाजाच्या प्रश्नांवर आणि राष्ट्रीय एकात्मतेवर चर्चा केली आहे...
Read More

मनकल्लोळ

Dr. Rupali Phule
Share“मनकल्लोळ” हे चपखल नाव असलेल्या या ग्रंथात मनोविकार हा गुंतागुंतीचा आव्हानात्मक विषय अच्युत गोडबोले आणि नीलांबरी जोशी यांनी निवडून त्याला...
Read More