समांतर म्हणजे एकाचा भूतकाळ तो दुसऱ्याचा भविष्यकाळ! प्रस्तुत कादंबरी मध्ये मांडलेली संकल्पना
Read More
समांतर म्हणजे एकाचा भूतकाळ तो दुसऱ्याचा भविष्यकाळ! प्रस्तुत कादंबरी मध्ये मांडलेली संकल्पना आजही जवळजवळ ४०-४५ वर्षानंतरही एकदम नवीकोरी व नावीन्यपूर्ण वाटते. या कथेचा नायक मुंबई मध्ये राहणारा एक तिशीतला मध्यमवर्गीय तरुण आहे. ज्याचे नाव आहे कुमार महाजन. त्याचे जीवन खूप संघर्षमयी आहे. तो एका छोट्याश्या कंपनी मध्ये काम करतो. घरी सोन्यासारखी बायको व मुलगा आहे पण त्यांना तो त्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे सुख देण्यास असमर्थ आहे.
एके दिवशी कुमार महाजन एका प्रसिद्ध स्वामींकडे भविष्य जाणून घ्यायाला जातो. (वास्तविक कुमार एक नास्तिक माणूस आहे पण त्याच्या एका शरद वाफगावकर नावाच्या मित्राच्या आग्रहाखातर तो स्वामींकडे जायला तयार होतो) स्वामी कुमारला सांगतात की त्याच्या हातावरच्या रेषा त्यांच्याकडे तीस वर्षांपूर्वी आलेल्या एका सुदर्शन चक्रपाणी नावाच्या व्यक्तीच्या हाताच्या रेष्यांशी तंतोतंत जुळतायेत. पण ते त्याला भविष्य सांगायला नकार देतात जे त्यांनी सुदर्शन चक्रपाणीला सुध्दा सागितलेलं नसतं. आणि इथूनच कहाणीला खरी सुरुवात होते.
त्यानंतर त्याच्या आयुष्यात एकामागोमाग एक धक्कादायक गोष्टी घडायला सुरुवात होते. मध्यंतरी तो सुदर्शन चक्रपाणीचा शोध चालू करतो. शोध घेत असताना त्याला त्याच्या आणि सुदर्शन चक्रपाणीच्या आयुष्यात घडलेल्या समान गोष्टींबद्दल कळत. पुढे तो जेव्हा सुदर्शन चक्रपाणीला प्रत्यक्ष भेटतो तेव्हाही त्याला त्याच्या आयुष्यात घडून गेलेल्या व सुदर्शन चक्रपाणीच्या आयुष्यात घडलेल्या अनेक समांतर गोष्टींचा उलगडा होतो. त्यानंतर कुमार ६० वर्षीय सुदर्शन चक्रपाणीच्या भुतकाळात घडून गेलेल्या घटना आपल्या भविष्यकाळात घडू नयेत म्हणून काळजी घ्यायला सुरुवात करतो. आता तो त्या गोष्टी टाळण्यात यशस्वी होतो की नाही हे तुम्हाला पुस्तक वाचल्यावरच समजेल. पण मध्यंतरी त्याच्या आयुष्यात एक अशी घटना घडते की त्यामुळे त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळते इथेच कथानकालापण कलाटणी मिळते. शेवटी ही कथा नायकाच्या भोवती फिरत राहते व त्याचा एक “अनपेक्षित” शेवट होतो.
कादंबरी वाचताना वाचकांना सुरवातीपासून शेवटपर्यंत कथेमध्ये गुंतवून ठेवण्यात लेखकाला प्रचंड यश मिळालंय. काही महत्वाच्या घटना कमी शब्दात पण रहस्यमयी रुपात सांगण्याची लेखकाची हातोटी प्रशंसनीय आहे.
Show Less