
हे पुस्तक बी.ए राज्यशास्राचा...
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कायदा निर्मितीच्या प्रक्रियेद्वारे मानवी हक्क स्पष्टपणे मांडले आहेत त्यांना स्थायित्व प्राप्त झालेले असून त्यापैकी जे हक्क म्हणून मान्य झाले आहेत हक्क व प्रतिष्ठा या दृष्टीने सर्व मानव समान आहेत प्रत्येक मानवाच्या ठाई नैतिकदृष्ट्या हे हक्क स्वाभाविक असतात मानवी हक्क हे मानवाच्या जीवनाचे अविभाज्य भाग आहेत प्रत्येक व्यक्तीला मनुष्यप्राणी या नात्याने हे हक्क नैसर्गिकरीत्या प्राप्त झालेले आहेत म्हणून मानवी हक्काशिवाय कोणत्याही व्यक्तीला आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करून घेणे शक्य होणार आहे इतकेच नव्हे तर हक्काशिवाय व्यक्तीला चांगल्या प्रकारचे जीवन जगणे ही शक्य होणार आहे मानवी हक्कांमध्ये अंतर्भूत होणारे हक्क म्हणजे जगण्याचा हक्क अन्न वस्त्र निवारा अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिंसेपासून मुक्तता धार्मिक स्वातंत्र्य इत्यादी हे सर्व हक्क आपल्याला जगण्याचा आपल्या जगण्याचा भाग आहेत स्वातंत्रपणे किंवा समुदायाने जगण्यासंबंधांची चर्चा या करतात हक्कांचा उगम किंवा निर्मिती यासंबंधी राजकीय विचारवंतांनी विविध प्रकारची मते व्यक्त केलेली आहेत तरी मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी हक्क आवश्यक असतात यावर सर्वांचेच एक मत आहे म्हणूनच आधुनिक काळात मानवी हक्कांचा विशेष आग्रह धरला आहे मानवी हक्क ही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग होय