भारतीय प्रशासन

हे पुस्तक बी.ए राज्यशास्राचा...

Share

भारत हा एक प्राचीन देश आहे कित्येक वर्षापर्यंत हा समाज बराचसा अराजकीय स्वरूपाचा होता अगदी अलीकडच्या काळापर्यंत हा समाज बऱ्याच प्रमाणात राजकारणापासून अलिप्त होता राजकीय घडामोडींचा फारसा परिणाम त्यावर होत नव्हता राजकारण हे अभिजन आणि परकीय नेत्या नेत्यांच्या व मर्यादित वर्गापर्यंत आबादीत होते राजकीय घडामोडींचे परिणाम बहुसंख्य जनतेवर होत होते मात्र राजकारणात सहभागी होणे जनतेला शक्य नव्हते भारतातील राजकारण सहभागाचे राजकारण नव्हते ब्रिटिश राजवटीत प्रथमच भारतातील शिक्षित समाजात राजकारणातील सहभागाविषयी वचुक्य व तळमळ निर्माण झाल्याची दिसून येते. लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच अशी घोषणा केली महात्मा गांधी यांनी 1914 मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला व अल्पावधीतच त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वमान्य नेते म्हणून स्थान मिळाले याच पक्षांनी पुढे स्वातंत्र्यासाठीच्या राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व केले भारताच्या इतिहासातील अबूतपूर्व जन संघटन महात्मा गांधींनी घडवून आणले स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय राज्यघटनेमुळे संपूर्ण समाज राजकीय घडामोडी आतापर्यंत झिरपून ढवळून निघाला प्रौढ मताधिकार्‍यावर आधारित ठराविक मुदतीनंतर होणाऱ्या निवडणुकांमुळे राजकीय प्रक्रियेतील सहभागही व्यापक बनला आहे त्याचा एकत्रित परिणाम म्हणजे राजकीय सत्तेत झालेल्या परिवर्तनात व्यक्त झालेला दिसतो.

Subject & College

Publish Date

2002-01-01

Published Year

2002

Format

Paperback

Country

India

Language

Marathi

Submit Your Review