Share

हिंदू धर्माची थोरवी जगभर समजावून सांगणारे आणि विश्वधर्म संमेलनात विश्वबंधुत्वाची भूमिका मांडणारे थोर विचारवंत म्हणजे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांना हिंदू धर्माइतकीच किंवा त्याहून काकणभर अधिक भारताच्या विकासाची तळमळ होती. त्यांना नवा भारत घडवायचा होता म्हणून त्यांनी भारतभ्रमण केले. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत फिरताना त्यांनी सामान्य माणसातील स्वाभिमान आणि ‘स्व’ जागृत करण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे लोण देशभर पसरले; कारण त्यासाठी अनुकूल मनोभूमी विवेकानंदांच्या विचारांनी आधीच तयार करून ठेवली होती. स्वामीजींना सामान्य माणसांविषयी तळमळ होती. सामान्य माणूस हाच त्यांच्या धर्म आणि विकास या संकल्पनेच्या केंद्रस्थानी होता. तरुणांना ते संदेश देतात, ‘माझ्या तरुण मित्रांनो, शक्तिशाली व्हा, ठाम निश्चयाचे, तेजस्वी असे शंभर युवक जग हादरवून टाकू शकतात.’
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर विवेकानंदांचे महत्त्व सांगताना म्हणतात, ‘तुम्हाला भारत माहीत करून घ्यायचा असेल तर विवेकानंद वाचा. सर्व विवेकानंद सकारात्मक आहेत, त्यांच्यात नकारात्मक असे काहीही नाही.’ जगण्याला आणि जीवनाला दिशा देणारे त्यांचे विचार स्फूर्तिदायक, प्रेरणादायक आहेत. निःस्वार्थ सेवा, शब्दांचे माहात्म्य, ईश्वरावर श्रद्धा, निर्भीड आणि दयाशील वृत्ती, आत्मत्याग आणि आत्मविश्वास, कर्तव्य, प्रेम, भक्ती आणि विश्वबंधुत्व इत्यादी महत्त्वपूर्ण घटक यात येतात. जीवनाच्या अनेकविध टप्प्यांवर योग्य-अयोग्यतेची जाण देऊन प्रेरणा, चैतन्य, उत्साह व यशाकडे नेण्यासाठी या पुस्तकाची मोलाची मदत होईल. हे जाणून घेण्यासाठी प्रस्तुत पुस्तक वाचायलाच हवे!
स्वामी निखिलानंद लिखित विवेकानंद जीवन चरित्र हे पुस्तक वस्तूंना खूपच आनंद झाला स्वामी विवेकानंदांच्या 150 व्या जयंती महोत्सव निमित्त पुण्याच्या रामकृष्ण मठातर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते. या पुस्तकाचे आता रामकृष्ण मठ नागपूर या द्वारे पुनर्प्रकाशन करण्यात येते.
आपण एक ‘निराकार वाणी’ आहोत असे विवेकानंद म्हणत. त्यांचा जन्म, आई-वडिलांकडून त्यांना मिळालेले बाळकडू, त्यांचा अफाट व्यासंग व विद्यार्थ्यांच्या त्यांचे कठोर सत्यवेशन श्रीरामकृष्णांच्या अलौकिक मार्गदर्शनाखाली झालेले त्यांची अध्यात्मिक जडणघडण आपल्या जीवित कार्याच्या त्यांना झालेली जाणीव त्यांचे प्रत्यक्ष कार्य व अद्भुत देह त्याग हा सारा जीवनपट सर्वांच्या चिंतनाचा विषय आहे. स्वामी विवेकानंदांचे जीवनचरित्र या पुस्तकातून आपल्याला संपूर्ण जीवनपट विषयी माहिती मिळते
महापुरुषांचे कार्य त्यांचा प्रभाव व योगदान यांची अनेक पहिली तून समीक्षा होत असते तथापि त्यांची आंतरिक प्रेरणा त्यांच्या देवी आकांक्षा व त्यासाठी त्यांनी केलेले कठोर उद्यम या गोष्टी सर्वसाधारण लोकांना अज्ञातच राहतात विवेकानंदांसारख्या अध्यात्मिक महापुरुषाच्या अंतरंगाचा असा धांडोळा घेणे व ते यथायोग्य उलगडून दाखविणे यासाठी अध्यात्मिक प्रतिभा अत्यावश्यक आहे स्वामी निखिल आनंद हे तशा अधिकाराने सुसंपन्न होते त्यांचा अल्प परिचय आणि त्यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेचा अनुवादही प्रस्तुत पुस्तकातून देण्यात आलेला आहे.
डॉ. द. दि. पुंडे यांनी या पुस्तकाचा सुरळीत भाषेत अनुवाद करून दिलेला आहे त्याचबरोबर या चरित्र ग्रंथाच्या अनुशीलनाद्वारे स्वामी विवेकानंद प्रणित मनुष्य निर्माण व अंतरनिर्मित दिव्यत्व हे दोन आदर्श आपल्या जीवनामध्ये कसे उतरवायचे याचे मार्गदर्शन वाचकांना या पुस्तकातून होत आहे.

Original Title

विवेकानंद जीवनचरित्र

Publish Date

2024-03-08

Published Year

2024

ISBN

978-93-85858-25-3

Submit Your Review