Review By Dr.Jitendra Yashwant Wadshingkar, Baburaoji Gholap College, Sangvi, Pune ‘गारंबीचा बापू ‘हि कादंबरी श्री .ना.पेंडसे यांनी साठीच्या दशकात
Read More
Review By Dr.Jitendra Yashwant Wadshingkar, Baburaoji Gholap College, Sangvi, Pune
‘गारंबीचा बापू ‘हि कादंबरी श्री .ना.पेंडसे यांनी साठीच्या दशकात प्रकाशित केली आहे.कोकणातील वातावरणात कर्तुत्ववान बापूने राधेशी केलेल्या प्रेमाची कहानी आहे.दापोली इथला रमणीय परिसर या निसर्ग आणि भावणारी माणसं. या कादंबरीतल्या सर्व व्यक्ती आणि प्रसंग काल्पनिक असले तरी जिवंतपणे प्रत्ययाला येतात. राधेसारखी प्रेयसी आपल्याला लाभावी असे चित्र मनोमन रंगवलेले आहे. हर्णेच्या परिसरातल गारंबी हे छोट गाव इथल्या गरीब यशोदा-विठोबा यांच्या दरिद्रत बापूचा जन्म झाला.विठोबा हा सरळमार्गी परिस्थितीने वाकलेला माणूस अण्णा खोताच्या घरात राबणारा आठराविश्व दारिद्र असलेला.बापू ब्राम्हण आळी पेक्षा गुरव वस्तीत उठान –बसन असलेला जेवण करणारा जे ब्राम्हणांना आवडत नव्हत .अश्यात गुरवाच्या यमीला दिवस गेले ते प्रकरण बापूवर शेकावल जाते.बापुला वेसण घालण्यासाठी रचलेले कारस्थान होत. बापूला आयुष्यातून उठवण्याचा आण्णाचा डाव असतो.बापूला दंड भरून सोडण्याच नाटक हे हि या कटाचा भाग पण बापू आण्णाला पुरेपूर ओळखून असतो.बापू हतबल होऊन दंड भरतो त्यामुळे त्याची सुटका झाली असली तरी आपल्यावरचा डाग गेलेला नाही हे बापू जाणून असतो .
गावात बारा भानगडी करूनही उजळ माथ्याने फिर्नाराचा बापूला वीट आल्याने तो रावजीच्या हॉटेलमध्ये नोकरी पत्करतो .बापूच्या ओळखीमुळे हॉटेलला चांगले दिवस येतात.रावजीच्या बायकोराधा हिला बापूच्या नितळ माणूसपणाची भुरळ पडते.
विजोड रावजीच्या संसारातआणलेल्या परिस्थितीने राधाला बापूचे पुरुषत्व साद घालते आणि बापूही आकर्षिला जातो.या दोघांच्या जवळीकतेची चर्चा होते.परस्पराबद्द्ल कितीही आकर्षण असल तरी त्यांनी मर्यादेचा भंग केलेला नसतो.बापूच्या मावशीला ही गोष्ठ कळते ती त्याला जाब विचारण्यास येते तेव्हा बापू खर काय आहे ते सांगतो पण तिला ते पटत नाही.विठोबाच्या आकस्मित मृत्र्यूने बापू हादरून जातो .कारण विठोबाला सुखात ठेवण्याचे वाचन हॉटेलमध्ये राहून पूर्ण करता येणार नाही म्हणून तो हॉटेल आणि राधेला निरोप देतो.मुसा काजीकडे व्यापाराचे तंत्र शिकून तो व्यापार सुरु करतो त्यात त्याला भरपूर पैसा मिळतो.दरम्यानच्या काळात रावजी मरण पावतो.बापू राधेला पत्नी म्हणून स्वीकारतो.बापू अडलेल्यांना मदत करतो.त्यामुळे गावाला राधा –बापूचे नाते मंजूर नसले तरी ते दुर्लक्ष करतात,पण आण्णा खोतला ते बघवत नाही.बापूला आत्ता आण्णाच्या नाकावर टिचून सरपंच व्हायचं असत.राधा बापूला समजवण्याचा प्रयत्न करते पण बापू काहीही करुन सरपंच पद काबीज कराव्याच असत .आण्णाचा सूड घेण्याचे कारण आई आणि आण्णांचे अनैतिक संबध त्याला छळत असतात.विठोबाच्या मृत्यूतही आंणांचा हात असावा असा त्याला संशय असतो. या साऱ्याचा हिशोब त्याला चुकता करावयाचा असतो.कादंबरी खूप सुंदर आणि नेटकी आहे .ग्रामिण जीवनातील विविध भावछटा खुबीने लेखकाने चितारलेल्या आहेत.कोकणातील निसर्गरम्य वातावरण कादंबरीत शब्द रुपात साकारलेले आहे. ही कादंबरी ग्रामीण जीवनाचा मागोवा घेणारी आहे.
या कादंबरीतल्या प्रमुख पात्रांवर स्वतंत्रपणे कलाकृती रचाव्यात, इतकी ही माणसं गुंतागुंतीची, गहन व गूढ आहेत. बापूचा मित्र आणि हितचिंतक दिनकर त्याच्या स्वभावगत पडखाऊ वृत्तीसह छान साकारला आहे. प्रसंगी माणुसकीच्या बाजूनं उभं राहायचं धैर्यही त्यानं राधा-बापूच्या जगावेगळ्या नात्याचा स्वीकार करून दाखवलं आहे.त्याकाळात ही बापूने केलेला विधवा राधेचा स्वीकार हि गोष्ट महत्वाची वाटते .प्रतिकूल परिस्थितीतून बापूने केलेली वाटचाल प्रेरणादायी वाटते.नियतीचा खेळ किती वाईट आहे हे लेखकाने छान चितारले आहे .वडिलांच्या मृत्युनंतर बापूच्या जीवनात बदल घडेल असा प्रसंग यायला हवा होता.‘गारंबीचा बापू’ नाटकालाही लोकांनी भरपूर वाखाणलं. म्हणूनच दोनदा पुनरुज्जीवित झालेलं हे नाटक ‘सुशीला एन्टरटेन्मेंट’ या संस्थेनं पुनश्च रंगभूमीवर आणलं आहे. ‘पीरियड प्ले’ म्हणून त्याचं महत्त्व आहेच, परंतु त्यातली हाडामासांची माणसं आणि त्यांचं जगणं हेही एका अभेद्य चक्रव्यूहाचा भेद करण्याइतकंच आव्हानात्मक आहे. आणि यासाठीच अशी नाटकं पुन: पुन्हा रंगभूमीवर यायला हवीत.ज्यांनी त्याची पारायणं केलेली आहेत त्यांनाही ते पुन:प्रत्ययाचा अपार आनंद देईल यात बिलकूल शंका नाही.
Show Less