"गोल्स!" हे ब्रायन ट्रेसी यांचे एक प्रेरणादायी आणि परिवर्तन घडवणारे पुस्तक आहे, ज्यामध्ये त्यांनी
Read More
“गोल्स!” हे ब्रायन ट्रेसी यांचे एक प्रेरणादायी आणि परिवर्तन घडवणारे पुस्तक आहे, ज्यामध्ये त्यांनी यशस्वी होण्यासाठी उद्दिष्टांची महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे. हे पुस्तक वाचकांना जीवनातील उद्दिष्टे निश्चित करण्यासाठी आणि ती यशस्वीपणे साध्य करण्यासाठी एक सखोल आणि व्यावहारिक दृष्टिकोन देते. ब्रायन ट्रेसी हे जागतिक स्तरावर प्रसिद्ध व्यक्तिमत्व असून, प्रेरणादायी व्याख्याते, लेखक आणि व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. “गोल्स!” हे त्यांच्या अनेक यशस्वी पुस्तकांपैकी एक असून, त्याचा मुख्य उद्देश वाचकांना त्यांच्या स्वप्नांना वास्तवात बदलण्यासाठी प्रभावी साधनं उपलब्ध करून देणं आहे.
जेव्हा ब्रायन १८ वर्षाचे होते, त्यावेळी त्यांनी स्कूल सोडले. कामगार वर्गाची सर्व कामे (उदा. गाडी धुणे) करू लागले, जेव्हा ती ही नोकरी गेली तेव्हा कोणतीच नोकरी मिळेना म्हणून त्यांनी एक कमिशनवर नोकरी जॉईन केली. पूर्ण दिवस एक कस्टमर मिळवण्यासाठी घालावावा लागत असे. एक दिवस त्यांनी विचार करून एक कागद घेतला आणि एक इम्पॉसिबल असा गोल लिहिला कि प्रत्येक महिन्यात १००० डॉलर रक्कम कमावणे आणि त्या कागदाला घडी घातली व तो फेकून दिला ३० दिवसानंतर त्यांचे पूर्ण जीवनच बदललेले दिसून आले. त्यांनी असे तंत्र शोधले की त्यांची कमाई तिप्पट झाली, परंतु त्याचवेळी कंपनीच्या मालकाने ती कंपनी तोपर्यंत विकली होती. त्यानंतर तीस दिवसांनी दुसऱ्या कंपनीने त्यांना कामावर घेतले पर्सनल सेलिंग पासून ते सेल्समन बनले नवीन व्यवसायात ९० लोकांची टीम बनवली. त्यांना गोल्स बद्दल माहिती दिली व सर्वांना तंत्र दिले, ब्रायन ट्रेसी यांचा विश्वास आहे की कोणत्याही गोष्टीला सुरुवात करण्याआधी आपल्याला आपले ध्येय अगदी स्पष्ट असले पाहिजे. अस्पष्ट उद्दिष्टे ठेवल्यास आपण गोंधळात सापडतो. स्पष्ट उद्दिष्टे आपल्याला ऊर्जा, प्रेरणा आणि योग्य दिशा देतात.
आपण गोल्स निश्चित केल्यानंतर फक्त त्याचाच विचार करावा, छोटे गोल्स सेट केले तर छोटे गोल्स लवकर पूर्ण होतील आणि त्यासाठी दररोज काम करावे लागते. गोल्स लिहिल्यावर दुसऱ्यांना सांगितल्यामुळे ती पूर्ण करण्यासाठीची ऊर्जा मिळते. त्यांनी एक संशोधन केले आणि त्या संशोधनाअंती फक्त टॉप ३ टक्के लोकांकडेच गोल लिखित असतात, तेव्हाच ते यशस्वी होतात. ज्यांचे गोल्स लिखित स्वरूपात होते ते इतरांच्या तुलनेत 10 पट जास्त कमवत होते. आपल्या चुकांबद्दल आपण जबाबदार आहोत, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी शेवटी आपण आपल्या जीवनाचा ताबा घेतला तरच आपण यशस्वी होऊ शकतो अशी भावना बनली. यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाला अडथळ्यांचा सामना करावा लागतो. हे अडथळे अंतर्गत (आत्मविश्वासाचा अभाव, चिंता, सवयी) किंवा बाह्य (परिस्थिती, संसाधनांची कमतरता) असू शकतात. ट्रेसी यांनी प्रत्येक अडथळ्याला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा सल्ला दिला आहे. आपल्या निगेटिव्ह इमोशन दूर कराव्या लागतील, आपण कोणालाही दोष देऊ नये व कुणालाही कारणे देऊ नये असे त्यांना वाटले. आपण जे पाहतो फक्त त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या उत्पन्नाचे गोल्स निश्चित केले पाहिजे. दुसऱ्यांच्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका, आपल्या सबकॉन्शियस माईंड मध्ये प्रोग्राम करा आणि आपण नक्कीच यशस्वी व्हाल. लीडरकडे व्हिजन असते आणि लीडर नेहमी मागील चुका दुरुस्त करून पुढील भविष्यकाळाचा विचार करतो.
उद्दिष्टे ठरवताना ती S.M.A.R.T. म्हणजे Specific (विशिष्ट), Measurable (मोजता येण्याजोगी), Achievable (साध्य करण्याजोगी), Relevant (संबंधित), आणि Time-bound (वेळेनुसार निश्चित) असावीत, असे सांगितले आहे. हे तत्त्व वाचकांना व्यावहारिक दृष्टिकोन देते. आपण स्वतःवर विश्वास ठेवल्यास कोणतीही गोष्ट अशक्य वाटत नाही. आत्मविश्वास वाढवण्यासाठी सकारात्मक विचार, कृती आणि सातत्य आवश्यक आहे.आपल्या गोल्स साठी ८० /२० पॅटर्न चेक करणे गरजेचे आहे. गोल्स साठी कोणते स्किल हवे ते स्किल आत्मसात केले पाहिजे. या पुस्तकातून ब्रायन ट्रेसी यांनी नवतरुणांना असा संदेश दिला आहे की आपण आपले लिखित गोल्स साध्य करण्यासाठी नवीन संधी व नवीन स्किल आत्मसात केले पाहिजे. “स्वप्न ही फक्त कल्पना नसून ती उद्दिष्टे ठरवून ती साध्य करण्यासाठीची कृती योजना हवी.” त्यांनी प्रत्येकाला आपापल्या जीवनातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्वतःला जबाबदार धरायला सांगितले आहे.
मराठी वाचकांनी हे पुस्तक एकदा तरी वाचावे आणि त्यातील तत्त्वे आपल्या जीवनात लागू करावीत. “गोल्स!” हे पुस्तक केवळ वाचनासाठी नव्हे, तर जीवनात बदल घडवण्यासाठी आहे. हे पुस्तक आपल्याला अधिक शिस्तबद्ध, उद्दिष्टपूर्ण, आणि यशस्वी होण्याच्या मार्गावर घेऊन जाते. तुमच्या आयुष्यात उद्दिष्टे गाठण्याची प्रेरणा मिळवायची असेल, तर हे पुस्तक नक्की वाचा!
Show Less