Review By Dr. Vitthal Naikwadi, Librarian, Baburaoji Gholap College, Sangvi, Pune-27 निसर्ग आणि मानव या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मानवाच्या विविध
Read More
Review By Dr. Vitthal Naikwadi, Librarian, Baburaoji Gholap College, Sangvi, Pune-27
निसर्ग आणि मानव या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मानवाच्या विविध चुकीच्या कृतीमुळे निसर्गाला नेहमीच विविध संकटांना सामोरे जावे लागते. त्याचेच दुष्परिणाम आज मानव जीवन जगताना भोगत आहे. सृष्टीवरील मानव, मुके जीव, जंतू यांचे जीवन म्हणजे ईश्वराची अनमोल भेट होय. देवपण हे ईश्वरापेक्षा आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीत बघा आपले चांगले विचार, इतरांप्रती आदर्श वर्तन, सदाचार हीच खरी माणुसकी आहे. तहानलेल्याला पाणी, भुकेलेल्यांना भाकर, लाचार व्यक्तींना मदत हीच खरी भक्ती आहे. मंदिरात जाऊन लाखोंचे दान केल्यावर समाधान मिळेल की नाही माहीत नाही पण आपल्या अवती भोवतीच्या लोकांना त्यांची गरज ओळखून मदत केली, तर समाधान नक्कीच मिळेल. निःस्वार्थी प्रेम माणसासोबतच मुक्या प्राण्यांवरही कसे करावे. याचे आदर्श उदाहरण कलाकारांने आपल्या चित्र शैलीतून उत्तमपणे रेखाटले आहे.
आपल्या जीवनात आपली विचार शैली, जीवन शैली, कर्तव्य व जबाबदाऱ्या, वर्तन कसे असावे याचे काही विशेष शिष्टाचार आहेत. त्यातूनच व्यक्ती खऱ्या अर्थाने घडत जातो आणि यशस्वी जीवनाची वाटचाल करतो. आजच्या युगात याची जागा संकुचित विचारशैली, स्वार्थीपणा आणि माणुसकीला सोडून काही व्यक्तीचे वर्तन घडताना दिसून येत आहे.जे पेराल ते उगवले’ या उक्तीप्रमाणे जीवनात तुम्ही जे दुसऱ्याला देता तेच तुमच्या आयुष्यात तुम्हाला परत मिळते. मग तो राग, प्रेम, वात्सल्य, सहकार्य, धैर्य, आधार याची परतफेड त्याच रूपात तुम्हाला होत असते जीवनात इतरांना जे देतो ते चांगलेच असावे. व्यक्तीचे मन जितके प्रसन्न असते तितके त्याचे वर्तन स्वच्छंदी असते. ‘मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण या म्हणीनुसार व्यक्तीने इतरांना समजून उमजून त्याचे दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. नेहमी स्वतःच्या सुखाचा विचार न करता इतरांच्याही सुखाचा विचार करावा. आपण जसे आपली तहान-भूक याची काळजी घेतो. तसेच मुक्या प्राण्यांच्या तहान, भुकेची गरज जाणली पाहिजे. असा अर्थपूर्ण संदेश समाजाला आपल्या चित्रातून कलाकाराने दिलेला आहे.
समाजात प्रत्येक व्यक्तीला जीवनाच्या विविध पातळीवर वेगवेगळ्या स्वरूपाचा संघर्ष करावा लागतो. मग तो संघर्ष आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, मानसिक या प्रकारात विभागला जातो. या कठीण प्रसंगी स्वतःची आणि समाजाची मार्गदर्शक तत्त्वे मूल्ये कशी जपली पाहिजे आणि त्या परिस्थितीशी खंबीरपणे दोन हात कसे करावेत. याचे मार्मिक दर्शन कलाकाराने आपल्या चित्रकौशल्यातून उत्तमपणे साधले आहे.
एक चित्र हजार शब्द आणि अगणित कल्पना कशा बोलक्या करते याचे परिपूर्ण आणि सर्जनशील उदाहरण म्हणजे या चित्रातील बालकांचे भावविश्व आणि चेहऱ्यावरील समाधान यातून जाणवते. आज समाजात सर्व सुख-सोयी असताना तसेच वैभवपूर्ण जीवन जगतानाही मानसिक शांतता आणि समाधान हरवताना दिसत आहे. समाधानी आणि सुखी जीवन जगण्यासाठी आहे त्या परिस्थितीशी तडजोड करता आली पाहिजे, असा नाविन्यपूर्ण संदेश चित्राकराने यातून दिला आहे.
जीवनात काय मिळालं नाही याचा विचार करण्यापेक्षा मला काय मिळालं आहे व चांगला मार्गाने मी काय मिळू शकतो, असा उत्स्फूर्त विचार प्रत्येक व्यक्तीने करावा. जीवनात आणि समाजात सकारात्मकता आणि समाधान कसे आणले पाहिजे हे प्रत्येक व्यक्तीने आपल्या कृतीतून ठरवले पाहिजे. अत्यंत मार्गदर्शक, प्रेरणादायी आणि मनाचा मोठेपणा या विविध अंगावर कलाकाराने आपल्या चित्रशैलीतून अप्रत्यक्षरीत्या प्रकाश टाकला आहे.
भूतकाळात काय घडलं याचा विचार न करता वर्तमानातील संघर्षातून भविष्यकाळ सुखर करावा”ज्याप्रमाणे मानवाच्या शारीरिक, मानसिक गरजा आहेत. अगदी त्याचप्रमाणे भावनिक गरजा ही खूप महत्त्वपूर्ण आहेत. समाजात प्रत्येकाने जो व्यक्ती संघर्षाच्या परिस्थितीतून जात आहे. त्याला जर फक्त भावनिक आधार दिला तर तो पुन्हा नव्याने जीवनाची सुरुवात करू शकतो. माणुस आणि मुके प्राणी यांच्यातील सखोल आणि वेदनात्मक अशा भावनिक नात्यांची गुंफण कलाकाराने आपल्या चित्रशैलीतून समर्पक आणि दिशादर्शक स्वरूपात व्यक्त केली आहे.
निसर्गातून जसे काही गोष्टी अप्रत्यक्षरूपी आपल्याला मिळतात. तसेच मानवात आत्मविश्वास, संयम, सुख, समाधान, मनःशांती जीवनातील कोणत्याही चढ-उतारावर व्यक्तीने मानण्यात असतात. त्या अमृत कल्पना आहेत आणि मन व मस्तिष्क संगमातून व्यक्तीत प्रतिबिंबित होतात. याचे अतिशय बोधपूर्ण, समाजाला नवसंजीवनी देणारे, समाज व व्यक्ती विकासात्मक प्रतिरूप चित्रातून स्पष्ट होते. काही वेळा गरीब व्यक्तीही समाधानी जीवन जगताना दिसून येतात आणि श्रीमंत व्यक्ती असमाधानी जीवन जगतात याचे कारण मानवाची मानसिक स्थिती असते. परिस्थिती अनुरूप समाधान मानवाच्या विचार व मनावर अवलंबून असते.
Show Less