पुस्तक परीक्षण - गुंड मोहिनी दिलीप, द्वितीय वर्ष विज्ञान, वाईन टेक. अगस्ति कला, वाणिज्य व दादासाहेब
Read More
पुस्तक परीक्षण – गुंड मोहिनी दिलीप, द्वितीय वर्ष विज्ञान, वाईन टेक. अगस्ति कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय, अकोले
विद्यापीठाच्या वनस्पती शास्र विभागात नोकरी करणारे (प्रा. म. वी. दिवेकर) यांनी लिहीलेल १२८ पानांच “तेथे जीवाणू जगती “ ह्या पुस्तकाने आपल्याला बहुमोलाचा संदेश दिला आहे. आजकालच्या विज्ञान युगामध्ये माणसाने भरपूर शोध लावले पण आजूनही काही अश्यापन गोष्टी आहेत ज्या की आपल्याला माहितच नाही. तेथे जीवाणू जगती या पुस्तकात लेखकाने हिमकेशी वटवृक्ष व ग्रीन जीवाणू यांचे वर्णन केले आहे. जे की वाचकांचे लक्ष वेधून घेतात. हिमकेशी म्हणून लेखकाने कॅक्टस जातीच्या वनस्पती विषयी लिहिले आहे. ही वनस्पती दिसायला सुंदर व दुर्मिळ अशी पण दीड- दोन इंच लांबीचे काटे असणारी आहे.
ह्या वनस्पतीला हिमकेशी असेही म्हणतात कारण ती हिमालयात सापडलेली व केसासारखे बारीक काटे असणारी आहे. ही हिमकेशी नावाची वनस्पती रक्त शोषून घेणारी आहे म्हणूनच ह्या वनस्पतीला रक्तपिपासु व ब्लड सकर असे समजायचे. सर्वसामन्यांच्या दृष्टीने वनस्पतिंना काहीच महत्व नाही पण लेखकाने संशोधक म्हणून ह्या वनस्पतीचा शोध घेणे महत्वाचे होते. हिमालयात बर्फाखाली दडून राहिलेली ही काटेरी वनस्पती रक्तपिपासू वनस्पती नव्हतीस. अतिथंड प्रदेशात बर्फाखालीसुद्धा जगण्याची क्षमता असलेलं एक दुर्मिळ जातीचे कॅक्टस होते. हिमालयात ट्रेकिंग साठी जाणाऱ्या वैज्ञानिकांना पर्वतीय रोगाची लागण व्हायची म्हणून ते कॅक्टस ह्या वनस्पतीला ब्लडसकर समजायचे. व या वनस्पतीचा मुळापासून नाश करायला निघाले होते.
तृष्णा विषयी लिहिताना लेखकाने एका वटवृक्षाविषयी सांगितले आहे जो की पाणी नसल्यामुळे आपली तहान दुधावर भागवतो आहे. पण दुध हे वटवृक्षासाठी हानिकारक आहे कारण दुधामधले अनावश्यक घटक वटवृक्षाच्या शरीरामध्ये साचून राहतील, वाढायला लागतील व वटवृक्षाचे संतुलन बिघडवून टाकतील. मानवाने प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वतासाठी निसर्गाचा हवा तसा उपयोग करून घेतला आणि त्याचमुळे निसर्गाचं संतुलन बिघडून इतर जैविक घटक दुखावले गेले. मानवाइतकाच श्रेष्ठ असा घटक वनस्पती आहे. कारण त्या स्वयंजीवी असतात. स्वताचे अन्न स्वतः तयार करण्याची निसर्गाने त्यांना देणगी दिलेली आहे.
मानवा इतकीच वनस्पतींनाही पाण्याची आवश्यकता असते. पाणी मिळवण्यासाठी वनस्पतीची मुळे जमिनीमध्ये हालचाल करीत असतात. पाणी कमी होण्याची कारणे मानवाच्या चुकीच्या वागण्याने निर्माण झालेली आहेत कारण निसर्गाचं संतुलन एका बाजूला मानव अव्याहतपणे मोडकळीस आणतो आहे आणि त्या वेळी जमिनीतलं पाणी तो येनकेन प्रकारे काढून घेतो आहे. वटवृक्षाने घातलेल्या हैदोसामुळे व त्याची तहान भागवण्यासाठी, त्याला पाणी पुरवणे आवश्यक होते. म्हणून हजारो हातांच्या श्रम दानाने, घामाने, बायका पोरे , पुरुष, सगळ्यांच्या सहकार्याने बंधाऱ्याचे काम झाले. पावसाळ्यात पडलेल्या पावसाच्या पाण्याने बंधारा तुडूंब भरला व नवीन उमलू पाहणाऱ्या जीवांची तहान भागवता आली. जीवाणू विषयी लेखकाने आपले मत मांडताना एका अश्या जीवाणू चे वर्णन केले आहे जो जीवाणू दुधाचे दह्यात रुपांतर करणाऱ्या लाक्टोबासीलस नावाच्या बाक्टेरीयाना व मृत शरीराचे डीकंपोझीशन करणारे जीवाणू यांना मारत आहे. एवढेच नव्हे तर इतरही जीवाणू हे ‘ग्रीन नावाचे’ जीवाणू मारत आहे. ह्या जीवाणूंनी देशाचे संतुलन बिघडवले होते, म्हणूनच ह्या जीवाणूंना कंट्रोल करणे महत्वाचे होते पण त्यासाठी अगोदर हे जीवाणू आले कोठून याचा शोध घ्यावा लागणार होता.
POLIO BOTANICAL व POLIO ZOOLOGICAL INSTITUTE मध्ये अशा प्रकारचे संशोधन चालायचे. कीटकांच्या शरीररचनेचा अभ्यास करताना संशोधकांना त्यांच्या पोटाच्या भागात एक पोकळी सापडली. याच पोकळीमध्ये जीवाणू सापडले. आणि याच जीवाणूंना जिवंत केले. हेच जीवाणू म्हणजे ‘ग्रीन जीवाणू’ होते. पुढे हे जीवाणू शेकडोने वाढायला लागले. हे जीवाणू स्वतः चे अन्न स्वताच तयार करत होते. यांना फक्त सूर्यप्रकाश पुरेसा होता. यांचा रंग हिरवा होता म्हणून यांना ‘ग्रीन जीवाणू’ म्हणत होते. ह्या बक्टेरिया मुळे देशात खळबळ माजली. पण देशात तज्ञ बुद्धिमान वैज्ञानिकारांचा तोटा नाही. विज्ञानाची झपाट्याने प्रगती होत आहे. त्यामुळे या जीवाणूंना नियंत्रित ठेवण्यासाठी उत्तर सापडू शकत होते. या जीवाणूंना नियंत्रित ठेवण्यासाठी संशोधकांनी स्वतः असे ग्रीन जीवाणू बनवले जे की अगोदरच्या जीवाणूंना शक्तिहीन करून स्वतः शक्तिहीन होणार होते, आणि हे जीवाणू सुप्तावस्थेत जातील व सध्याच्या कोणत्याच प्रक्रियेमध्ये ते भाग घेणार नाहीत. अगदी सहज व सोप्या भाषेत लेखकाने आपण वनस्पतीची कशी काळजी घ्यावी, ति आपल्यासाठी किती महत्वाची आहेत हे पटवून दिले आहे. जसे माणसामध्ये जीव आहे तसे वनस्पतीमध्ये मध्ये पण जीव आहे. त्यांना पण तहान लागते, त्यांना पण भूक लागते. वनस्पती आहे म्हणूनच माणूस आहे. जे आपल्याला जगण्यासाठी प्राणवायू देतात. झाडांना जर पाणी घातले तर ते पण आपल्याला भरभरून त्यांचे सर्वकाही देतात. ते निस्वार्थी असतात. आपल्या भोवताली असलेले कुठलेही झाड आपल्यासाठी त्रासदायक नसते फरक फक्त एवढाच आहे की आपल्याला त्या झाडाची पूर्णपणे माहिती नसते, हे पुस्तक वाचून माझे काट्याच्या झाडाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला.
इतरत्र असलेले लाखो सुष्मजीव जे की आपल्यासाठी काही चांगले व काही वाईट, काही आपल्याला जीवनदान देतात. तर काही आपला जीव घेतात. सृष्टीचे कामकाज व्यवस्तीत पद्धतीने चालविणे याचा एक भाग सुश्मजीव आहे. दुधाचे दह्यात रुपांतर करण्यापासून ते माणसाचे शरीराची विल्हेवाट लावण्यापर्यंत हे सुश्मजीव काम करत असतात. सुश्मजीव नसते तर कदाचित हे जीवन जगणे कठीण असते असे मला वाटते. ह्या पुस्तकामधून मी खूप काही शिकले. सुश्मजीवा विषयी माहिती मिळाली. वडाच्या झाडाविषयी वाचताना इतरही झाडांची कशी काळजी घ्यावी हे समजले. ह्या पुस्तकामुळे मला एक नवीन प्रेरणा मिळाली.
Show Less