डॉ. वंदना पिंपळे, वाणिज्य विभागप्रमुख व उपप्राचार्या, बाबुरावजी घोलप महाविद्यालय सांगवी,
Read More
डॉ. वंदना पिंपळे, वाणिज्य विभागप्रमुख व उपप्राचार्या, बाबुरावजी घोलप महाविद्यालय सांगवी, पुणे
लहानपणापासूनच मुलांचे अति लाड न करता, त्यांना अपेक्षाभंगाचे विष पचवण्याची ताकद निर्माण करून, विवेक जागृत करून, प्रसन्न मनाने नव्या अपेक्षांच्या पूर्तीसाठी, सक्षम करण्याची ऊर्जा कशी देता येईल? यासंबंधीचे प्रोत्साहन पर विवेचन या पुस्तकात लेखकाने केले आहे.
उन्ह सोसण्याची, ती पेलण्याची पचवण्याची, प्रसंगी त्याचं स्वागत करण्याची शक्ती आपल्या मुला मुलींच्या व्यक्तीमत्वात येण्यासाठी त्यांना ऊन तसेच सावलीची जाणीव करून देण्यासाठी या पुस्तकात एकूण 29 भागात मार्गदर्शनपर विवेचन केलेले आहे. आपल्या मुला मुलींचे व्यक्तिमत्त्व घडवताना त्यांना जास्त लाडात न वाढवता त्यांना भविष्यात सक्षम होण्यासाठी काही वेळा कठोर वागणे ही आवश्यक असते. त्यांना श्रम, मेहनत, जिद्द, चिकाटी सातत्यपूर्ण कार्य, शिस्त, वेळेचे नियोजन, सारासार विचार करण्याची क्षमता, सर्जनशीलता, नाविन्यपूर्णता इत्यादी गोष्टी करण्यास प्रोत्साहन देण्याबरोबरच जर काही प्रसंगी ती ना उमेद झाली तर त्यांना त्यामधून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपली मुले ही सुगंधी फुले आहेत त्यांना हातांनी आपण चुरगाळत तर नाही ना? याची खात्री प्रत्येक पालक शिक्षकाने केली पाहिजे. जशी मोलाची आहे तशी सावली ही त्यांना करपून जाण्यापासून बचाव करत असते, त्यांना जगण्याची उर्मी देत असते. परंतु कायमच मुलांना सावलीमध्ये न ठेवता तिचा पदर सोडून बाजूला जायलाही प्रवृत्त करणे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनिवार्य असते असते. कारण योग्य वेळी सावलीच्या मोहातून बाहेर पडून ती उन्हात गेल्याने, उन्ह प्याल्याने, उन्ह पचविल्याने, लक्ख सूर्यप्रकाशात जोमाने वाढतील, मोहरून आणि बहरून जातील. असा लाख मोलाचा संदेश लेखकाने प्रत्येक पालक व शिक्षकांना दिलेला आढळतो त्यामुळे हे पुस्तक सर्वांच्या दृष्टीने उपयुक्त असे आहे.
Show Less