डॉ. विजय विठ्ठल बालघरे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालय सांगवी,
Read More
डॉ. विजय विठ्ठल बालघरे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालय सांगवी, पुणे-२७
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होऊन गेली.आपण स्वातंत्र्याचा अ0 .मृत महोत्सव देखील अत्यंत दिमाखदार पद्धतीने साजरा केला. परंतु अजूनही आपल्या देशातील जवळजवळ 50 टक्के लोकांच्या अन्न,वस्त्र,निवारा या प्राथमिक गरजाही पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत. किंबहुना त्यांना यासाठी प्रचंड संघर्ष व जीवघेण्या यातना भोगाव्या लागतात याकडे कोणाचेही लक्ष नाही. याविषयी ना कोणाला खेद वा खंत! आजही आपल्या देशात अशा असंख्य भटक्या जाती-जमाती आहेत की ज्यांना पशुपेक्षा लाजिरवाणे जीवन जगावे लागते.ते आज इथे तर उद्या कुठे असतील याची शाश्वती नाही किंवा ते या जगात असतील की नसतील याबद्दलही ते आणि आपणही सांगू शकणार नाही.एवढे जीवघेणे जीवन काही लोकांना जगावे लागत असेल तसेच या लोकांचे दुःख,दारिद्र्य दूर व्हावे व त्यांच्या अन्न,वस्त्र,निवारा या गरजा दूर व्हाव्यात यासाठी प्रयत्न करावेत,त्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून द्यावेत या दृष्टिकोनातून एड.सुपेकर यांचे ‘पालावरची माणसं’ हे पुस्तक नुकतंच वाचनात आलं. या पुस्तकाने मनात अनेक प्रश्नांची वादळे निर्माण झाली. मन अक्षरशः अस्वस्थ झाले व न राहावून यावर काहीतरी लिहावं या उद्देशाने सदर लेखनप्रपंच…
‘पालावरची माणसं’ या पुस्तकाचे लेखक भालचंद्र सुपेकर यांनी अर्पणपत्रिकेमध्येच आपला या पुस्तक लेखनामागचा हेतू स्पष्ट केला आहे. “पालावरचं किड्या-मुंग्यांचं जीवन वाटयाला आलेल्या जगभरातल्या असंख्य माणसांच्या अपरिमित वेदनांना त्यांनी हे पुस्तक अर्पण केलं आहे. पुस्तकातील प्रत्येक लेखाच्या शेवटी समारोप करताना या लोकांच्या आयुष्यामध्ये उज्ज्वल भविष्याची पहाट निर्माण होऊन त्यांचे न्याय हक्क त्यांना नक्कीच मिळो,असा सकारात्मक आशावाद मांडलेला आहे. यातून लेखकाची संवेदनशीलता प्रत्ययास येते. पुस्तकास सुप्रसिद्ध लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांची प्रस्तावना लाभली आहे.त्यांनी “ज्ञानाचा दीप आणि क्रांतीची मशाल उपेक्षितांच्या हाती देणारा ग्रंथ अशी” या पुस्तकाची पाठराखण केलेली आहे, ती अत्यंत योग्य आहे. गावगाड्यांमध्ये चतुर्थवर्ण म्हणून दलितांकडे पाहिले जाते; पण या दलितांपेक्षाही भयानक व जीवघेणे जीवन ज्यांना जगावे लागत आहे, ज्यांना राहायला निश्चित जागा नाही,आपलं म्हणून हक्काचं घर नाही, विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर असतं तसंच आपलं बिऱ्हाड घेऊन ही मंडळी जगाच्या पाठीवर मिळेल त्या मोकळ्या जागेवर पाल मांडून जगत असतात. म्हणून या माणसांना ‘पालावरची माणसं’ म्हणता येईल.या पुस्तकामध्ये भालचंद्र सुपेकर यांनी प्रमुख 25 जमातींचा लेखाजोखा मांडला आहे. यामध्ये प्रामुख्याने या जमातीची परंपरा, नावाचा इतिहास, त्यांची स्वभाववैशिष्ट्ये, त्यांचे राहणीमान, त्यांचे मूळ स्थान, त्यांची लोकसंख्या, सद्य: स्थिती, रोटीबेटी व्यवहार, त् शिक्षण,संस्कृती,व्यवसाय,अंधश्रद्धा,देवदेवता, जातपंचायत,रूढीपरंपरा इ. घटकावर वास्तव प्रकाश टाकला आहे. लेखक पत्रकार आहेत. त्यामुळे पत्रकाराच्या नजरेतून शहरालगतच्या वस्त्यांमध्ये या जमातींच्या वाट्याला जे काही शोषित जीवन येतं ते त्यांनी या पुस्तकांमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी डॉ.विजय तेंडुलकर,डॉ.अनिल अवचट यांनी अत्यंत संवेदनशीलपणे अशा माणसांचे जीवन मांडण्याचा प्रयत्न केला होता. त्याचप्रमाणे श्री.म.माटे यांनी ‘उपेक्षितांचे अंतरंग’ उलगडले होते.लेखक भालचंद्र सुपेकर यांनी देखील अत्यंत प्रामाणिकपणे व सहानुभूतीने हे पालावरचं जग आपणांसमोर मांडण्याचा या पुस्तकाच्या माध्यमातून केलेला आहे. या समाजाविषयी सहानुभूती व व्यापक समाजभान निर्माण करण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न स्तुत्य आहे. सदर पुस्तकामधील लेखांच्या शीर्षकावर प्रकाश टाकला तरी आपणास या पुस्तकाचे मोल व व्यापकता यांची प्रचिती सहजतेने येते.आत्मसन्मानी मदारी, परिवर्तनशील कंजारभट, कष्टाळू कुंचीकोरवे, कलाकार सोनजरी, शिवभक्त नंदीवाले, कष्टातून विकास साधणारा मातंग,कात टाकणारा पोतराज, वेगाने परिवर्तन स्वीकारणारा वैदू, बदल स्वीकारणारा माझी समाज उत्थानासाठी आसुसलेला पारधी, परंपरेच्या चरकात अडकलेला वासुदेव, बदलासाठी उत्सुक लकातकरी, प्रगतीच्या उंबरठ्यावरचा प्रजापती, विकासासाठी उत्सुक राजा वारली, विकासाच्या वाटेने चाललेला भिल्ल,परिस्थितीशी झगडणारा कोरकू, दुबळा समाजाची मंद वाटचाल,रूढीच्या गर्तेत अडकलेला अंध, संस्कृतीत आत्ममग्न गावीत, संभ्रमाने घेरलेला माला आणि मादिगा, वेगाने पुढे जाणारा अतिद्राविड, अस्तित्वाची लढाई लढणारा बोडो,राजवैभवासाठी झटणारा मांगेला, बोगसपणाच्या विळख्यात अडकलेला महादेव कोळी, भविष्याच्या चिंतेत चिंतातूर राजज्योतीशी ही शीर्षके या समाजाची स्थितीगती आणि लेखकाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सहजपणे व्यक्त करणारी आहेत.
आत्मसन्मानी मदारी या लेखांमध्ये मदारी समाजाचा इतिहास शब्दाचा अर्थ त्यांचे व्यवसाय पोशाख राहणीमान आणि विचारसरणीत होत गेलेला बद्दल यावर लेखकाने प्रकाश टाकला आहे हा समाज सध्या कुठे राहतो या समाजाची भाषा धर्म याबद्दल माहिती देताना इस्लामाच्या नियमानुसार मदारी लोक उपासना करतात असं ते म्हणतात याशिवाय सुरुवातीच्या काळात ते जादू करायचे तेच त्यांचं उपजीविकेचे साधन होतं नंतर मात्र बर्थडे पार्टी लग्न अशा कार्यक्रमांमध्ये किंवा सार्वजनिक उपक्रमांमध्ये जादूचे प्रयोग दाखवायचे काही लोक सापाचेही खेळ दाखवायचे परंतु नंतर वन्यजीव कायद्यामुळे साप पकडणं हा गुन्हा ठरला व आता हा समाज ही पारंपरिक व्यवसाय बंद करून फोटोग्राफी इव्हेंट मॅनेजमेंट किंवा विविध पदार्थांच्या हात गाड्या रिक्षा असे व्यवसाय करू लागलेले आहे या समाजाची स्वतःची एक परंपरा व नियमावली आहे प्रत्येक वाईट गोष्टीसाठी नियम निश्चित केलेले आहे तसेच समाजामध्ये घटस्फोट ही पद्धत नाही सध्या या समाजातील अनेक लोकांनी विविध व्यवसायात जमा बसून आपली आत्मसन्मानाची लढाई पुढे चालू ठेवले आहे.
परिवर्तनशील कंजर भट या लेखात मुळचे राजस्थानचे असलेल्या व महाराणा प्रताप यांना शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारे व नंतरच्या काळात मात्र कुंभार व इतर व्यवसाय करत अगदी पोटापाण्याला महाग झाल्यानंतर घरफोड्या करेपर्यंतचा या समाजाचा प्रवास लेखकाने अत्यंत विदारक इतिहास म्हणून मांडला आहे डाकू ज्वाला सिंग यासारखं नाव सुद्धा याच समाजातील आळंदी जवळील चिखली भागात आजही अनेक लोक येथे राहतात राजपुतांच्या सर्व प्रथा परंपरांचे ते पालन करतात समाजाच्या उज्वल भवितव्यासाठी यांच्या जातपंचायत मध्ये सुद्धा काळानुरूप बदल झाले पाहिजे व परिवर्तनासाठी शासन आहे व समाजाने काही भूमिका घेतली पाहिजे अशी अपेक्षा लेखकाने व्यक्त केली आहे.
कष्टाळू कुंचीकोरवे या समाजाबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे मूळ आंध्र प्रदेश कर्नाटक आणि तामिळनाडूच्या सीमा भागातील हा मोर्चा समाज ताडाच्या झाडापासून झाडू बनवणे हा त्यांचा प्रमुख व्यवसाय त्याच्यामुळेच कुंची कोरवे म्हणजेच उंचा बनवणारे हे त्यांना नाव पडले प्राचीन काळापासूनच अतिशूद्र म्हणून त्यांना दास करून साफसफाईची कामे देण्यात आली आणि या समाजानेही झाडू बनवण्याचं कौशल्य आत्मसात केला अस हा समाज अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये जगतो आहे देहूरोड मधल्या शिवाजीनगर भागात या लोकांची वस्ती आहे याशिवाय मुंबईमधील धारावी या भागातील यांची मोठ्या प्रमाणात वस्ती आहे काळाच्या ओघात कुंचा बनवण्याचा यांचा व्यवसाय आहे नामशेष होऊ लागला आहे मरीआई या समाजाची प्रमुख देवता समाजामध्ये अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात आढळतात बालविवाह होतात गोंदन हे समाजाचं प्रमुख वैशिष्ट्य क्षणाचं प्रमाणही जवळजवळ शून्य आहे नाही हक्कांसाठी संघर्ष करावा लागतो ही भावना आहे या लोकांमध्ये निर्माण झाले नाही या समाजाकडे आजही रहिवासी दाखला जातीचा दाखला रेशन कार्ड मतदार ओळखपत्र इत्यादी पुरावे नाहीत व परिणामी समाजाला राजकीय आश्रय नाही न्याय हक्क मिळवून देण्यासाठी काम करावे लागेल व त्यांची अस्वच्छता व्यसन अंधश्रद्धा व अज्ञानाची जळमट दूर करण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे ही लेखकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे
सोनजरी हा समाज एकेकाळी दागिने घडवण्याचं व वैभवचा आयुष्य जगत होता अत्यंत कलाकुसरीने दागिने बनवणे यांचा परंपरागत व्यवसाय परंतु आज मात्र या समाजाची पूर्णतः वाहतात झालेले आहे यांचे उपजीविकेचा पारंपारिक साधन नष्ट झालेले आहे उपजीविकेच्या शोधातच या समाजाची भटकंती सुरू आहे एकीकडे राजू वैभव नष्ट होत केलं आणि दुसरीकडे सोन्याच्या किमती आभाळाला भेटल्या मानवी हक्कांची जागा यंत्राने घेतली व या समाजाची प्रतिष्ठाही लोक पावली यांची सोनजरी भाषा देखील लोकपाबत झालेले आहे अशा या कष्टाळू समाजाची जाणीव आणखी संकुचित होऊन जाऊ नये यासाठी त्यांना मायेची खूप द्यायला हवी.
शिवभक्त नंदीवाल्यांची वस्ती महाराष्ट्र आंध्र प्रदेश यासह गोवा कर्नाटक इत्यादी राज्यांमध्ये आहे नंदीवाल्यांचा संबंध थेट भगवान शंकराचे वाहन असलेल्या नंदेशी जोडला जातो आणि ते स्वतःला शिवाच्या गडाची वंशज समजतात शेतीच्या कामात बैलाला खूप महत्त्व असायचं परंतु आत्ता यांत्रिकीकरण व औद्योगीकरणामुळे त्याचं महत्त्व कमी झालेला आहे यामधूनच नंदीबैरांच्या पूजनाची सुरुवात झाली असावी नंदी सोबत गावोगावी भटकंती करत पालावरचं जीवन जगण्याचा या समाजाचा इतिहास आहे या समाजातील प्रथा परंपरा रोटी बोटी व्यवहार त्यांची पोशाख त्यांची सण उत्सव देवता श्रद्धा अंधश्रद्धा त्यांची पारंपरिक वाद्य भगवान शंकराची असलेला ऋणानुबंध याबद्दल लेखकाने अनुभवजन्य लेखन केलेले आहे कणकया आनंदीवाला या लेखांमधून त्याच्यानंतर प्रकर्षाने नजरेत भरतो या समाजाला या कालबाह्य खेळातून बाहेर पडावं असं असतं तरी एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा म्हणून त्याच्या जपूनुकीसाठी प्रयत्नही व्हायला हवे असे लेखक नमूद करतो.
मातंग समाज हा अनुसूचित जाती समूहातला सर्वाधिक लोकसंख्या असलेला समाज आहे परंतु अज्ञान अंधश्रद्धा आणि अनास्था या तीन गोष्टीमुळे हा समाज विकसित होऊ शकला नाही आजही या समाजाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे सांस्कृतिक दृष्ट्या हा समाज प्रगत आहे ढोलकी हलगी सनई चौघडा या वाद्यांचा वारसा या समाजाने जपला आहे व परंपरागत दोरखंड बनवण्याचा व्यवसाय आहे किरसुण्या बनवण्याचा परंपरागत व्यवसाय हा समाज जपतो आहे परंतु काळ हे दोन्हीही व्यवसाय कालबाह्य झालेला आहे त्यांची विवाह पद्धती जातपंचायत त्यांचे प्रमुख अन्न व्यसना अंधश्रद्धा शिक्षण नोकऱ्या यावरही लेखकाने प्रकाश टाकला आहे चातुरवर्णी व्यवस्थेमध्ये अतिसुद्र स्तरावर स्थान देण्यात आलेल्या या समाजाने समाज उभारणे अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे लहुजी वस्ताद साळवे अण्णाभाऊ साठे इत्यादी या समाजाने कला संस्कृती शिक्षण रोजगार राजकारण या क्षेत्रामध्ये स्वतःचा ठसा उमटवला आहे परंतु त्यांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून देणे ही काळाची गरज आहे त्यासाठी या समाजाने बुरसुटलेली विचारसरणी व अंधश्रद्धा व्यसना यातून बाहेर पडलं पाहिजे लेखकाचे निरीक्षण महत्त्वाचे आहे.
आपल्या महाराष्ट्रामध्ये उघड्या अंगाने रस्त्यावर फिरणारा आणि हातातल्या लांब सडक आसूड आणि उघड्या अंगावर फटके मारणारा पोतराज हा आपल्याला गावोगावी आणि शहरांमधील रस्त्या रस्त्यावर दिसतो पोतराज हा समाजाच्या शोषण व्यवस्थेचा प्रतीक आहे इतरांना दुःख किंवा वाईट घटनांचे भूक भूगावे लागू नये यासाठी त्यांच्या दुःखाचे भोगाची चटके तो सहन करतो त्यासाठी तो आपल्या हातातल्या सुडानं स्वतःच्याच अंगावर भटके मारून घेतो किंबहुना या समाजात देव धर्म अंधश्रद्धा यातून हा पोतराज घडत जातो त्याचा पोशाख त्याची देवी समाजाचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्याची वाद्य लोकसंख्या जात पंचायत या सर्वांचाच आढावा लेखकाने या लेखांमध्ये घेतला आहे या पोतराजाच्या निर्मितीमागे आराधी काळापासून मानवी मनामध्ये असलेल्या भीतीचा वाटा मोठा आहे या पोतराजाने स्वतःच्या अंगावर मारून घेतलेले आसूडाचे फटके हे या समाजाच्या शोषणाचा परंपरेचा व पिळवणुकीचा निषेध करणारे आहेत असं म्हणायला हरकत नाही किंबहुना त्यांनी स्वतःहून हे सर्व झुगारून दिले पाहिजे पोतराज समाजाच्या भविष्याच्या खडतर वाटचालीसाठी या शोषितांच्या हाती ज्ञानाचे दीप व क्रांतीच्या मशाली देण्याची जबाबदारी हे आपणा सर्वांचे आहे हे सांगायला लेखक विसरत नाही आज हा समाज कात टाकतो आहे असेही म्हणत आहे.
वैदू समाज परिवर्तन स्वीकारणारा समाज आहे त्याला समृद्ध अशा वारसा आहे या समाजाचा संबंध वैद्यक व्यवसायाशी व प्रामुख्याने आयुर्वेदाशी जोडला जातो या समाजामध्ये बैतू झिंगाबोळी बिंदू राजवैदू बोलला चंची वाले वैतू झोळीवाली वैदू त्यांची नावे त्यांची वेशभूषा किंवा व्यवसायाच्या पद्धतीवरून पडलेली आहे त्यांची जात पंचायत लोक परंपरा देवते शैक्षणिक व सामाजिक स्थिती सण उत्सव यांचा लेखकाने आढावा घेतला आहे हा समाज बदलत्या काळासोबत आधुनिकतेची खास धरतो आहे ही विधायक गोष्ट आहे.
मच्छी समाज समुद्रावर अवलंबून असलेला समाज आहे या समाजाचा परंपरागत व्यवसाय मासेमारीचा आहे हा समाज यांत्रिक मासेमारी करत नाही या समाजाचा पोशाख मासे पकडण्याची पद्धती राहणीमान याबद्दल नाविन्यपूर्ण माहिती या लेखातून मिळते अलीकडच्या काळात शिक्षण घेऊन हसणाची बदल स्वीकारू लागला आहे समुद्र हाच या समाजाचा देव असतो समाज विकासाच्या प्रक्रियेत शेवटचा काही क्रमांकात मोडणारा आहे त्याच्या कोण आहे.
ब्रिटिशांच्या काळापासूनच गुन्हेगारी जमातीचा शिक्का असलेल्या पारधी समाजात जन्माला येणे म्हणजे आयुष्यभरासाठी करंज आणि संपूर्ण आयुष्य पालामध्येच जगावं लागतं पारद म्हणजे शिकार या यावरून शिकार करून राहणारी जमात म्हणजे फारच समाज या समाजावरील गुन्हेगारीचा शिक्का आजही कायम आहे या समाजातील जातपंचायत विवाह संस्था देवदेवता अंधश्रद्धा यांचाही धांडोळा आतम बाई भोसले या स्त्रीच्या अनुषंगाने घेतला आहे.
वासुदेव हा जो गावगाड्यातील समाज आहे आजही परंपरेच्या सरकार अडकलेला आहे पहाटे डोक्यावर मोरपिसांचा रुबाबदार टोप घालून टाळांचा मंजूर आवाज करत अभंग गात वासुदेव गावात प्रवेश करत लोकांच पहाट मंगलमय करत असे आणि संपूर्ण गावाला एक प्रकारे आशीर्वाद देत गावावर कृपा छत्र धरत असे आजही गावोगावी कोणत्याही गोष्टीचे अपेक्षा न करता जबरदस्तीने कोणाकडेही पैसे किंवा धान्यांना केवळ टाळ वाजवत गोड आवाजात अभंग गाणारे अनेक वासुदेव आपणाला दिसतील ते स्वतः श्रीकृष्णाचे वंशज म्हणून स्वतःलाच संबोधतात किंवा सांगतात आपल्या प्रथापर्यंत आजही कसोशीने पाळण्याचा प्रयत्न हा समाज करतो जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे या समाजाचा अस्तित्व धोक्यात येऊ लागलाय विकासाची चाकण गतीने फिरताना अशा परंपरा चिडल्या जाऊ नयेत एवढीच एक अपेक्षा आणि गवी गणेश पवारांसारखी या गोष्टी जतन करत आहेत पण प्रगतीच्या वाटा त्यांच्यासाठी खुल्या ठेवायला हव्यात.
कातकरी हा आपल्या समाजातील एक आदिम असा समूह आहे हा समाज म्हणजेच जंगलाचा राजा कातकरी हा शब्द कास्तकार या शब्दापासून बनला आहे या समाजाचा व्यवसाय उदरनिर्वाह उदरनिर्वाहाची पद्धती लोकसंख्या वस्ती शिक्षण संस्कृती त्यांची व्यसनाधीनता लग्नविधी देवदेवता शासकीय स्तरावर होणारी मदत आदी बाबींचा आढावा लेखकाने घेतलेला आहे कातकरी हा समाज अंधश्रद्धा व्यसन निरक्षरता यांच्या चक्रात अडकलेला आहे त्याला शासन समाजातल्या प्रतिगामी वृत्ती संधी साधू राजकारणी आणि विकासाच्या प्रवाहापासून रोखू पाहणाऱ्या विविध शक्तींशी लढावं लागत आहे आणि तो समाज अत्यंत लढतो आहे या लढाईला ज्ञानाचं नैतिकतेचं आधुनिकतेचे बळ मिळायला हवं की लढाई केवळ कातकरी समाजाची नाही तर मानवतेची लढाई आहे कारण या समाजानेच जंगल समाज सांभाळलं स्वतःला जंगलात काढून घेतलं म्हणून आज आपण खुलेपणाने श्वास घेऊ शकतो विकास साधू शकलो म्हणून आपणही या लढाई त्यांना साथ दिली पाहिजे ही लेखकाने समस्त समाजाला किल्ल्यावर खूप महत्त्वाचे आहे.
प्रजापती म्हणजेच प्रजेचा अधिपती सृष्टीचा निर्माता हा समाजही आपल्या देशात आहे या समाजाला ब्रम्हाने रचनेची व कलाकृती दुसरीची निर्मितीची विद्या दिली अशी आख्यायिका सांगितली जाते सुरुवातीच्या राजे वंशाच्या काळात समाजाच्या रचनेसाठी कलाकुसरीसाठी प्रसिद्ध असलेला हा समाज आपल्याच भविष्याच्या कला दुसरीसाठी कष्ट घेताना दिसतो परंपरा आणि आधुनिकता या दोन चाकांमध्ये अडकलेल्या व प्रगतीच्या उंबरठ्यावर असलेल्या समाजाला विकासाची वाट सापडणं आवश्यक आहे
Show Less