Review By Dr.Ghadage Vijay Hanumant, Associate Professor and Head, Department of Physics, Baburaoji Gholap College, Sangvi, Pune-411027 महात्मा ज्योतिराव फुले लिखित शेतकऱ्याचा आसूड
Read More
Review By Dr.Ghadage Vijay Hanumant, Associate Professor and Head, Department of Physics, Baburaoji Gholap College, Sangvi, Pune-411027
महात्मा ज्योतिराव फुले लिखित शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक मा.डॉ.वासुदेव मुलाटे यांनी लिहिले आहे.
महाराष्ट्रात अनेक महापुरुषांना जन्म दिला. 19 व्या शतकात महात्मा ज्योतिराव फुले, लोकहितवादी, न्यायमूर्ती रानडे ,लोकमान्य टिळक आगरकर इत्यादी.
या कालावधीमध्ये समाज सुधारक व समाजचिंतक होऊन गेले यामध्ये सर्वात महात्मा फुलेंना अग्रक्रम द्यावा लागतो. कारण त्यांनी समाज सुधारकाचे काम केले नाही तर सामाजिक क्रांती घडवून आणण्याच्या दृष्टीने सक्रिय प्रयत्न केला. धर्माधिष्ठित समाज व्यवस्थेत समाजाचे शोषण जसे राजसत्तेकडून होत आहे तसेच धर्म सत्तेकडून होत आहे. इंग्रजी राज्यसत्तेशी शिव देण्यापेक्षाही हजारो वर्षाची परंपरा असलेली धर्मसत्ता प्रथम खिळखिळी केली पाहिजे यांचा विचार त्यांनी केला.
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात पुरोहित शाही शिगेला पोचली होती. उच्चवर्णी यांची मानसिक व बौद्धिक अधोगती झाली होती. स्वार्थ धर्माच्या नावाखाली जातिवाद वाढला होता. गरीब शेतकरी अज्ञानी कष्टाळू यांचे शोषण वाढले होते. इंग्रजांचे सरकार आले होते. उच्चवर्णीय यांनी इंग्रजी शिक्षण घेऊन सरकारी खात्यामध्ये सर्व्हिस मिळवल्या होत्या. शिक्षक वकील सावकार तेच होते. शेतकऱ्याचे हाल होत होते व अन्यायाला वाचा फोडावी म्हणून महात्मा ज्योतिराव फुले लिखित शेतकऱ्याचा आसूड ही अत्यंतिक ग्रंथ निर्मिती केली आहे . सदर ग्रंथ 1883 साली वेळेला परंतु तो प्रकाशित मात्र त्यांच्या हयातीत झाला नाही.
सामाजिक जीवनाच्या विविध क्षेत्रात शेतकऱ्याच्या अज्ञानामुळे आपला धर्मभोळेपणा सोडून विद्या संपादन करावी व्यसनांधाता सोडून द्यावी न्याय हक्काची जाणीव ठेवावी या हेतूने या ग्रंथात ग्रंथाचे लिखित फुल्यांनी केले.
Show Less