Review By Dr. Manisha Changdeo Tryambake, Asst. Professor, Baburaoji Gholap College, Sangvi, Pune नॉट विदाऊट माय डॉटर ही बेस्ट सेलर ठरलेली आणि पुरस्कारासाठी
Read More
Review By Dr. Manisha Changdeo Tryambake, Asst. Professor, Baburaoji Gholap College, Sangvi, Pune
नॉट विदाऊट माय डॉटर ही बेस्ट सेलर ठरलेली आणि पुरस्कारासाठी नामांकन झालेली कादंबरी लिहिणारी व्यक्ती महमुदी एक अमेरिकन लेखिका होती त्यांच्या या कादंबरीवरच त्याच नावाने चित्रपटही प्रदर्शित झाला आहे .
बेट्टी महमुदी यांनी लिहिलेली ही कादंबरी म्हणजे ‘स्वातंत्र्य’ या मूलभूत गरजेसाठी स्वातंत्र्यप्रिय व्यक्तींना आजही द्याव्या लागणार्या कठोर लढ्याची कहाणी आहे. नॉट विदाउट माय डॉटर-१९८४ स्वत:च्या कुटुंबीयांशी भेट घडवून आणण्याच्या मिषानं बेट्टी महमुदीचा नवरा आपल्या पत्नीला आणि मुलीला इराणला घेऊन गेला. त्या तिथं सुखात असतील, अधिक सुरक्षित असतील आणि त्यांना पुन्हा हवं तेव्हा अमेरिकेला परतता येईल, असं त्यानं तिला आश्वासन दिलं होतं. पण ते सारं खोटं होतं. त्यानं फसवणूक केली होती.
प्रगतीकडे झेपावणार्या नव्या युगातही प्रत्यक्ष आपल्या नवर्याकडून फसवले जाणे हा मानवतेचा, व्यक्तीस्वातंत्र्याचा अपमानच आहे. अमेरिकेत राहणार्या बेट्टी महमूदीला तिचा नवरा काही कारणाने इराणला घेऊन जातो व तेथेच डांबून ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर तो त्याच्या पत्नीवर आणि मुलीवर भयानक अत्याचार करत असतो व त्याच वेळी बेट्ठी महमुदी आपली आणि मुलीची सुटका करून घेणे हे मनाशी ठामपणे ठरविले असते व त्यासाठी ती असंख्य अत्याचार सहन करते. यातून सुटका होणे जवळजवळ अशक्यप्रायच असते. परंतु आपल्या व आपल्या मुलीच्या सुटकेसाठी अत्यंत कठीण मार्ग अवलंबण्याचं धाडस बेट्टी करते. तिच्या या सुटकेच्या संघर्षाची, क्षणाक्षणाला हृदयाचा ठोका चुकविणारे असे हे पुस्तक मी वाचलेल्या सर्वोत्कृष्ट पुस्तकांपैकी एक, शेवटच्या प्रकरणाने मला इतके गुंतवून ठेवले की मी एक सेकंदही पुस्तक सोडले नाही. हे पुस्तक वाचत असताना अनेक वेळी नकळत डोळ्यातून अश्रू ओघळले तसेच कोणत्याही समाजाची धर्माची स्री असली तरीही तिने ठाम निश्चय केला तर ती काहीही करू शकते हे परत एकदा सिद्ध झाले .
Show Less