तीर्थरूप महाराष्ट्र

By joshi Mahadeoshastri, जोशी महादेवशास्त्री

https://www.bookganga.com/eBooks/Books/details/4868664885560117979?BookName=

Availability

available

Original Title

तीर्थरूप महाराष्ट्र

Publisher, Place

Total Pages

250

Country

India

Language

Marathi

Weight

257GM

File Format

https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=4868664885560117979&PreviewType=books

Average Ratings

Readers Feedback

मंदिर परिचयाची गाथा सांगणारे पुस्तक तीर्थरूप महाराष्ट्र

मंदिर परिचयाची गाथा सांगणारे पुस्तक- तीर्थरूप महाराष्ट्र लेखक-पं. महादेव शास्त्री जोशी पुस्तक परीक्षण- प्रा. मंगेश माधव देवडे तीर्थरूप महाराष्ट्र हे पं. महादेव शास्त्री जोशी यांचे...Read More

देवडे मंगेश माधव

देवडे मंगेश माधव

×
मंदिर परिचयाची गाथा सांगणारे पुस्तक तीर्थरूप महाराष्ट्र
Share

मंदिर परिचयाची गाथा सांगणारे पुस्तक- तीर्थरूप महाराष्ट्र
लेखक-पं. महादेव शास्त्री जोशी
पुस्तक परीक्षण- प्रा. मंगेश माधव देवडे
तीर्थरूप महाराष्ट्र हे पं. महादेव शास्त्री जोशी यांचे तीर्थक्षेत्राबद्दलची सखोल माहिती देणारे पुस्तक आहे. या पुस्तकाची भाषा केवळ ओघवतीच नाही तर यामधील एकूण 18 प्रकरणे वाचून झाल्याशिवाय हे पुस्तक खाली ठेवण्याची इच्छाच होत नाही.
मुळातच पंडित महादेव शास्त्री जोशी भारतीय संस्कृती कोशाचे व्यासंगी संपादक आणि मराठी कथा लेखक म्हणून ओळखले जातात.भारतीय संस्कृती कोशाचे दहा खंड त्यांनी प्रसिद्ध केले आहेत. भावनोत्कट भाषा आणि ओघवती आकर्षक लेखन शैली ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये वाचताना जाणवतात.
या पुस्तकात एकूण 18 पवित्र स्थळांची अर्थात तीर्थक्षेत्रांची माहिती त्यांनी दिली आहे.या पुस्तकाची प्रस्तावना ही त्यांनीच लिहिली आहे. या प्रस्तावनेत त्यांनी महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांचे तीन प्रकार केले असून ते का केले याचे ते वर्णनही करतात.यामध्ये त्यांनी देवताक्षेत्रे,अवतार क्षेत्रे आणि संत क्षेत्रे असे तीर्थक्षेत्रांचे तीन प्रकार कल्पिले आहेत.
यामध्ये पंढरपूर,करवीर,मोरगाव ही देवता क्षेत्रे तर नरसोबाची वाडी,औदुंबर व पंचवटी ही अवतारक्षेत्रे आणि सज्जनगड,देहू,पैठण,आळंदी ही संत क्षेत्रे असल्याचे नमूद केले आहे. याबरोबरच त्यांनी तीर्थांचा अजून एक चौथा प्रकार कल्पिला आहे तो म्हणजे महाराष्ट्राची धारातीर्थे होय. जिथे स्वराज्यासाठी रक्ताच्या नद्या वाहिल्या, जिथे धर्म रक्षणासाठी आणि स्वामी भक्तीसाठी रणयज्ञात पंचप्राणांची अवदाने पडली अशा क्षेत्रांचा उल्लेख ते धारातीर्थी म्हणून करतात. तीर्थक्षेत्रांच्या वेगवेगळ्या प्रकारांची माहिती आणि महती यामधून आपल्याला मिळते.
पुस्तकाचे मुखपृष्ठ अतिशय सुरेख व अभ्यासपूर्ण रेखाटले असून केशरी सूर्योदयाच्या पार्श्वभूमीवरील डोंगराच्या कुशीत वसलेल्या देवालयाचे रेखाटन डोळ्यांना आणि मनालाही विसावा देणारे आहे. मंदिराच्या पायरीवरून देवालयात जाणारे भाविक,मंदिराचे शिखर आणि त्यावर फडकणारा झेंडा आणि पाठीमागे होणारा सूर्योदय असे अतिशय मनमोहक आणि मानवी मनाची आशा जागवणारे हे रेखाटन आहे.देवालयासमोरील पादुकांचे चित्रांकन पाहताच मानवी मनात विनम्रता निर्माण होऊन डोळे मिटून तिथेच माथा टेकवावा अशी भावना सहजतेने आपोआप आपल्या मनात निर्माण होते. अतिशय देखणे मुखपृष्ठ आणि पुस्तकातील प्रत्येक प्रकरणासाठी त्या त्या तीर्थक्षेत्रासंबंधीची काढलेली रेखाटने हृदयस्पर्शी आणि मानवी मनाचा वेध घेणारी आहेत.त्यामुळे पुस्तकाच्या सौंदर्यामध्ये भरच पडली आहे.
लेखकाने या पुस्तकांमध्ये एकूण 18 तीर्थक्षेत्रांचा परिचय करून दिला आहे.ही प्रकरणे पुढील प्रमाणे. विटेवरचे परब्रम्ह यामध्ये पंढरपूर,दक्षिण काशी करवीर यामध्ये कोल्हापूर,कृष्णातीरी नरहरी यामध्ये औदुंबर आणि नरसोबाची वाडी ही दत्तप्रभूंची ठिकाणे,पंचवटीच्या परिसरात यामध्ये नाशिक,ब्रह्मगिरी चा महिमा यामध्ये त्र्यंबकेश्वर,याबरोबरच सज्जनगड,मोरगावचा मयुरेश्वर,गाणगापूर,मल्हारी मार्तंड क्षेत्र जेजुरी,परशुराम क्षेत्र पेढे परशुराम,तुळजाभवानीचे तुळजापूर,भीमाशंकर,वेरूळचा घृष्णेश्वर,गोकर्ण महाबळेश्वर,रामटेक,नाथांचे पैठण,संत तुकारामांचे देहू आणि संत ज्ञानेश्वरांची आळंदी या तीर्थक्षेत्रांची माहिती देताना आजूबाजूंची गावे,नद्या आणि भारतीय संस्कृती व परंपरांची ही माहिती दिली आहे.
या पुस्तकाच्या नावाबद्दल प्रस्तावनेमध्ये माहिती देताना त्यांना या पुस्तकाला काय नाव द्यावे असा प्रश्न पडला होता.महाराष्ट्राची तीर्थक्षेत्रे,महाराष्ट्र क्षेत्र वर्णन अशी काहीतरी वेगळी नावे त्यांच्या मनामध्ये होती.परंतु ही नावे बोजड आणि गद्य आहेत म्हणून त्यांची देण्याची इच्छा होत नव्हती.महाराष्ट्रातले प्रख्यात निसर्ग कवी आणि त्यांचे मित्र कविवर्य श्री बा. भ. बोरकर यांच्याशी चर्चा करताना ही अडचण त्यांना सांगितली.यावर बा.भ. बोरकर यांनी सहज स्फूर्तीतून तीर्थरूप महाराष्ट्र ही अक्षर नामे त्यांना सांगितली आणि लेखकाला ते सहज पसंत पडले आणि पुस्तकाचे नामकरण झाले अशी पुस्तकाच्या नावापाठीमागची रंजक कहानी वाचकांना समजते आणि मनोमन दोघांच्याही पुढे नकळत हात जोडले जातात आणि आदर देखील वाढतो. या पुस्तकाच्या नावाबद्दल लेखक म्हणतात की, यामध्ये दुहेरी अर्थ आहे आणि ते दोन्ही अर्थ मला अभिप्रेत आहेत. मी जो महाराष्ट्र पहायला निघालो आहे तो तीर्थरूप आहे.वडिलांना तीर्थरूप म्हणतात.पितृस्थान हे महान तीर्थ आहे.त्यादृष्टीने ज्या महाराष्ट्रात आपण जन्मलो आणि ज्यांच्या मांडीवर खेळलो, वाढलो तो समग्र महाराष्ट्र आपल्याला तीर्थरूप आहे.
मंगलमय पवित्र महाराष्ट्र देशाला तीर्थांची आणि मंदिरांची वैभवशाली परंपरा लाभली आहे.या देशात यादव,शिलाहार,सातवाहन,
राष्ट्रकूट अशा राजांचा राजाश्रय मिळाल्यामुळे वेगवेगळ्या शैलीतील वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे निर्माण झाली. या वेगवेगळ्या शैलीतील मंदिरामुळे महाराष्ट्र प्रदेशात राहणाऱ्या भाविकांना ,भक्तांना एक सांस्कृतिक चेहरा मिळाला. या भक्तीसाधनेतूनच संतांची वाणी फुलून आली. या ईश्वर आराधने मधूनच पाषाणास पाझर फोडणारी अभंगवाणी निर्माण झाली. हे आपणास हे पुस्तक वाचल्यानंतर समजून येते.
लेखकाने या पुस्तकामध्ये केवळ मंदिर आणि मूर्तींची माहिती दिली नाही तर या मंदिरांच्या भेटीसाठी जाताना केलेल्या प्रवासाचे वर्णनही सुंदर आणि अप्रतिम आहे. प्रत्येक तीर्थक्षेत्राचे स्थान माहात्म्य रसाळ भाषेत व सहजपणे केले आहे. पुस्तक लिहिताना त्यांनी कल्पिलेला वाचक वर्ग सश्रद्ध,रसिक,तत् जिज्ञासू आहे असे समजून भाषेचे पाल्हाळ न लावता लेखन केले आहे. एखाद्या देवतेच्या मागे केवढा इतिहास आहे, त्या दैवत संप्रदायाचा महाराष्ट्रावर कोणता प्रभाव पडला आहे, तिथले स्थापत्य आणि शिल्प कोणत्या प्रकारातले आणि काळातले आहे, कोणते दिव्य भौम उत्पात आणि विधर्मीयांचे अत्याचार त्या क्षेत्राला सोसावे लागले आहेत त्यासंबंधीची माहिती वाचकांना सहजपणे दिली आहे. तीर्थस्थळांची एवढी सुंदर आणि सखोल माहिती आपणास पुस्तक वाचताना मिळते की, या सर्व तीर्थस्थळांची यात्रा करण्याचा मोह आपणास होतो हेच या पुस्तकाचे यश आहे.

देवडे मंगेश माधव

देवडे मंगेश माधव

Submit Your Review

Item Added to Cart!

What would you like to do next?

View Cart