जीवनशैली

Share

मानवी जीवनात दैनंदिन सवयीमुळे अनेक
गोष्टी ताण-तणाव निर्माण होतात. यामुळे
ब्लडप्रेशर, (उच्च रक्तदान),हायपर टेन्शन,
मधुमेह , लठ्ठपणा, स्थूलता ,जाडी ,
हृद‌यरोग निर्माण होतात. वेगवान
जीवनात माणूस व्यसनाधिन बनत चालला
आहे.
कामाचा ताण कमी करण्यासाठी, चहा,
कॉफी, दारू, सिगरेट, विडा हि व्यसने
जडत चालली आहे. कामाचा तणाव वाढत
आहे.यामुळे शरीरात बदल जीवनशैली
बदलत आहे. परिणामी आजारपण वाढत
आहे वाढत्या वयात हृद‌याशी संबंधीत
आजार होत आहे.की जो अतिशय गंभीर
आहे .
लेखक हृद‌याचे डॉक्टर असल्याने खूप सुंदर
व सखोल लिखाण केलेले आहे .
जाणीवपूर्वक हा विषय निवडून खूप सुंदर
व सखोल लिखान केलेले आहे. जाणिवपूर्व
हा विषय निवडत समाजास गरजेचे असे
लिखाण या पुस्तकात केले आहे. त्यामध्ये
शरीर व हृदयाचा इतिहास व रचना

सांगितली आहे .हदयाचे कोण‌कोणते
आजार व हदय प्रकाराचे वर्णन केले आहे.
तसेच शरीरातील रक्तवाहीन्या व त्यात
हळूहळू होणारे बदल व त्या बदलाचे
परिणाम कारणे लिहिली आहेत. याबरोबर
आहार व व्यायाम याचे महत्व सांगितलेले
आहे. वेगवेगळे आजार – मधुमहे उच्च
रक्तदान, जाडी-स्थुलता इ. आजारा बाबत
शास्त्रीय माहिती दिली आहे. सर्वात जास्त
हृदय रोगाबद्दल लिहिले आहे. हृदयाचे
वेगवेगळ्या आजार, ह्रदयरोग कसा होतो?
त्याबद्दलचा वेगवेगळ्या तपासण्या आणि
त्यावरचे उपचार हे सर्व सविस्तर पणे या
पुस्तकात लेखन केले आहे. त्या पुस्तकाचे
वाचन स्वत: कुटुंबातील तसेच सहकारी
यांनी केल्यास जर असा आजाराचा प्रसंग
आला तर वाचक हा डॉक्टराची काही
प्रमाणात भूमिका करू शकतो हे निश्चित!