अण्णा भाऊ साठे

Share

Book Review : CHAURE NIRMALA JULAL,MGV’s Loknete Vyankatrao Hiray Arts Science and Commerce College Panchvati Nashik.

अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या स्फुटलेखनाला १९४२ साली प्रांरभ केला. सुरुवातीला त्यांनी पोवाडे, लावण्या, किसान गीते, मजुर गीते, छक्कड, गण, पदे, लोकनाट्ये लिहिली आहेत. त्या पुढील काळात त्यांनी प्रामुख्याने कथा व कादंबरी हे वाङ्मयप्रकार हाताळले. बाल अण्णा भाऊंनी १९३० साली ‘पानिपतचा पोवाडा’ नावाचा छोटा पोवाडा लिहिला होता. वयाच्या केवळ दहाव्या वर्षी त्यांनी लिहिलेला हा पोवाडा उपलब्ध नाही. अण्णा भाऊ साठे संपूर्ण आयुष्यात समोर मांडून ठेवलेल्या कोणत्याही प्रकारच्या संघर्षात ताठपणे उभे राहिले. त्यांचे व्यक्तिमत्त्व मूलतः तरल, संवेदनशील, महत्त्वाकांक्षी, जिद्दी, आणि हरहुन्नरी होते. विविध प्रकारचे मैदानी व मर्दानी खेळ खेळणे, नवनवी गीते रचून ती बालमित्रांना गाऊन दाखविणे. समाजविचार आणि वाङ्मयीन दृष्टिकोन
तमाशात विविध प्रकारच्या लहानमोठ्या भूमिका वठविणे व गाजविणे असे लाभदायक ठरले. बालपणापासून किती तरी छंद अण्णा भाऊंना होते. या प्रवृत्तींच्या विकासाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाची शिस्त, शिक्षण आणि मार्गदर्शन
१९३६ पासून अण्णा भाऊंचा साम्यवादी चळवळीशी जवळून संबंध होता. अण्णा भाऊंची विलक्षण जिज्ञासू वृत्ती व समजून घेऊन काम करण्याची शक्ती अनेकांच्या नजरेत भरली होती. शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द. न. गवाणकर या समविचारी कलावंत मित्रांनी, ‘लाल बावटा कलापथकांच्या जुन्या परंपरेला नवी वर्गीय दृष्टी देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
अण्णा भाऊंनी आपल्या विविध पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. त्या प्रास्तविक स्वरूपाच्या आहेत. त्रोटक आहेत. पण अत्यंत अन्वर्धक आहेत. अल्पसूत्री असूनही बहुमोल आहेत. कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय कसा ठासून भरावा याचा या प्रस्तावना आदर्श आहेत. या सर्वांमधून अण्णा भाऊंची जीवनदृष्टी, समाजविचार आणि वाङ्‌मयीन दृष्टिकोन यांचे प्रत्यंतर येते.
अण्णा भाऊंनी स्वीकारलेला समाजविचार आणि अंगिकारलेली जीवनदृष्टी ही जागतिक पातळीवर सिद्ध झालेली समाजपरिवर्तनाची एक मूलभूत दृष्टी आहे. “मार्क्सवादी साहित्य-विचार’ ही ती दृष्टी होय.

प्रकरण १ले- या मध्ये अण्णाभाऊ साठेंची समाज विचार आणि साहित्य दर्शन बाबत अनेक घटकांचा समावेश केलेला आहे.
प्रकरण २रे – या मध्ये मराठी कादंबरीचा विविध पद्धतीने आढावा घेण्यात आला आहे.
प्रकरण ३ रे- या भागात अण्णाभाऊंची कथा, गुजगोष्ट,लोककथा,नीतिकथा,प्रतीककथा,दीर्घकथा,लघुकथा, नवकथा इत्यादी कथेंचा समावेश करण्यात आला आहे.
प्रकरण ४ थे- आण्णाभाऊंची शाहिरी व त्यांच्या दहा पोवाड्यांचा उल्लेख केला आहे.
प्रकरण ५ वे- या भागामध्ये अण्णाभाऊ साठेंचे नाटक, प्रवासवर्णन आणि इतर साहित्यांचा आढावा घेतला आहे.

सारांश
आधुनिक मराठी साहित्यातील बहुतेक सर्व साहित्य प्रकारांचा उगम आंग्लविद्याविभूषित लेखकांकडून झाला. आधुनिक मराठी कविता, कथा, कादंबरी, नाटक, वैचारिक निबंध, समीक्षा हे सारेच लेखनप्रकार आंग्ल- वाङ्‌मयाच्या प्रकाशपरंपरेत वाढले. भारतामध्ये ब्रिटिशांनी मुंबई, कलकत्ता, मद्रास या ठिकाणी विद्यापीठे स्थापन केली. या विद्यापीठातून भारतीय बुद्धिवंतांनी जागतिक वाङ्मय, समाजवाद, साम्यवाद, औद्योगिक क्रांती, व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही इत्यादी पाश्चात्य कल्पनांचे दर्शन घेतले. त्यातून मराठी वाङ्मयात उलटसुलट विचारांचे, मतप्रवाहांचे लेखन सुरू झाले. परंतु या सबंध लेखनाचा केंद्रबिंदू नेहमीच शहरी विभागात राहिला. एकूणच आजवरचे मराठी साहित्य एकदेशीय, एकरंगीय, एकवर्णीय होते. अण्णा भाऊंनी ते बहुउद्देशीय व बहुपेडी बनविले. तेच ते विषय, तेच ते मंडनाचे प्रकार आणि त्याच त्या श्रेष्ठ कनिष्ठतेच्या कसोट्या असे सारे तेच ते सुरू होते. विषयाचा तोचतोपणा, मांडणीविषयीचे मतभेद, साहित्याच्या मांडणीवरून श्रेष्ठ कनिष्ठता मोजणारी समीक्षावृत्ती, पांढरपेशा कल्पना, चावून चोथा झालेल्या मध्यमवर्गीय कथावस्तु, जिवंत संघर्षाच्या अभावामुळे अशक्तता, त्याच त्या शब्दाळ वर्तुळातून फिरणारी तथाकथित क्रांतिकारकता, नवता, वास्तवता, वेगळेपण हरवू पाहणारी वाङ्‌मयवृत्ती ही स्थूल मानाने अलीकडच्या मराठी वाङ्मयाची वैशिष्ट्ये बनू पाहात होती.