भगवद्गीता

Share

भगवद्‌गीता हा शब्द जरी ऐकला तरी आपल्या डोळयासमोर अर्जुन, श्रीकृष्ण भगवान आणि महाभारत याचे चित्र उभे राहते! पन तुम्हाला माहीत आहे का की महाभारत है एक फक्त युद्ध नसुन या कलीयुगात आपले वर्तन एक माणुस म्हणुन कसे असावे, आपल्या ध्येयावर कसे लक्ष केंद्रीत करावे, इत्यादी गोष्टी यामध्ये श्रीकृष्ण भगवान आणि त्यांचा शिष्य अर्जुन यांच्या संभाषनामधुन सांगितल्या आहेत.
भगवद्‌गीता प्रत्येकासाठी जीवनाचा मार्गदर्शक आहे जी उद्देशपूर्न आणि स्पश्टपणे कसे जगायचे हे शिकवते यातील शिकवन ही युद्धाच्या पलीकडे जाते ती जीवनातील आव्हानांवर मात करण्याबद्दल, कठीन निर्णय घेण्याबद्दल आणि स्वतःशी प्रामानिक राहण्याबद्दल शिकवते.

विद्यार्थानी गीतेकडे का लक्ष द्यावे ?
विद्यार्थी जीवन म्हणजे तानतनावाने भरलेले जीवन असते. परिक्षा असो वा अपेक्षा लक्ष केंद्रीत करणे म्हणजे आपल्यासाठी एक मोठे आव्हाहनच असते ! भगवद्‌गीता ही आपल्याला एका कोचसारखी गाईड करते जी तुम्हाला शांत राहण्यास, हुशारीने काम करण्यास, आणि तुमचा तोल न गमावता योग्य मार्गावर राहण्यास मदत करते.

आपले कर्तव्य करा निकाल विसरा !
श्रीकृष्ण भगवान म्हणतात तुम्ही तुमच्या कामावर आणि कर्तव्यावर लक्ष केंद्रीत करा विचार करा आपण बरेच वेळा अभ्यास हा फक्त चांगले गुण मिळवण्यासाठी करतो मग ते पाठांतर असो वा बाकी काही! आपण निकालावर एवढे झपाटले जातो की शिकण्याच्या प्रकीया मधला आनंद घ्यायलाच विसरतो. भगवद्गीता आपल्याला शिकवते की तुम्ही जर तुमचे कर्तव्य १००% पार पाडले तर तुम्हाला निकालावर तान घेण्याची आवश्यकता नाही, तुम्ही जेव्हा तुमचे कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी घेता तेव्हाच तुम्ही अर्धी लढाई जिंकलेला असता !!

लक्ष केंद्रीत करा.
फोनमुळे किंवा सतत स्कोलिंगमुळे तुम्हालाही फार विचलीत झाल्यासारखे होते ना? गीता आत्मशिस्तिवर भर देते, श्रीकृष्ण भगवान यावर सल्ला देतात की तुमचे मन आणि इंद्रिये नियंत्रणात ठेवा.

शांत राहा.
समत्वं योग उच्यते संतुलन महत्त्वाचे आहे जीवन म्हणजे चढ उतारांनी भरलेली रोलरकोस्टर आहे पण गीता आपल्याला स्थिर राहण्याचे महत्त्व शिकवते. वाईट गुण मिळाले शांत राहा, सादरीकरण जिंकले नम्र राहा, हा मानसिक तोल तानतनावाचा सामना करणाऱ्या विद्यार्थासाठी सुपरपॉवर आहे.

ताणाचा गुलाम होऊ नका.
कृष्णांचा “निष्काम कर्म” हा एक खेळ बदलणारा शब्द आहे. याचाच अर्थ मेहनत करणे होय, पण यश किंवा अपयशाचा ताण आपल्या शांतीत अडथळा आणू देऊ नका. गुणांसाठी नव्हे तर शिकणाच्या आनंदासाठी अभ्यास करण्याची कल्पना करा…

मी काय शिकले ?
गीता वाचणे हे माझा जीवनात खऱ्या अर्थाने जागे होण्यासारखे होते तिने मला जास्त विचार करणे थांबवायला, ताण चांगल्या प्रकारे हाताळायला, आणि हेतुने काम करायला शिकवले. उशिरा रात्री अभ्यास सत्रे असो किंवा कठीन निर्णय घेणे असो! गीतेचे ज्ञान मला नेहमी स्थिर ठेवते. भगवद्‌गीता ही फक्त धार्मिक पुस्तक नाही ती एक जीवनाचा मार्गदर्शक आहे, विद्यार्थ्यांसाठी ती शांत, केंद्रीत आणि प्रेरीत राहण्याचा मार्गदर्शक आहे! त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही ताण किंवा आत्मसंदेहात अडकला असाल तर गीता वाचा तिचे शाश्वत सल्ले कदाचित तुमची दृष्टी बदलू शकतील.