शेतकऱ्यांचा असूड

Share

Review By Shri Kiran Kalamkar, Baburaoji Gholap College, Pune
‘शेतकऱ्यांचा असूड’ या महात्मा ज्योतिराव फुले लिखित पुस्तकाचे संपादन गंगाधर बनबरे केले आहे. जिजाई प्रकाशन ने हे पुस्तक 28 नोव्हेंबर 2006 साली महात्मा ज्योतिराव फुले स्मृतिदिनानिमित्त प्रकाशित केले असून या पुस्तकाची पृष्ठ संख्या ८८ इतकी असून पुस्तकाचे सेवा मूल्य तीस रुपये आहे. शेतकऱ्याच्या अवस्थेचे वास्तवदर्शी चित्र महात्मा फुले यांनी लिहिलेल्या शेतकऱ्यांच्या असूड (1883) या ग्रंथात केले आहे. तत्पूर्वी महात्मा फुले यांनी सन १८७५ मध्ये पुणे परिसरातील सावकार व जमीनदारांविरुद्ध केलेल्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. हे देशातील पहिले शेतकरी आंदोलन होते. 10 डिसेंबर 1882 यावर्षी मुंबईत ‘शेतकऱ्यांची स्थिती’ या विषयावर व्याख्यान दिले होते. मामा परमानंद 1878 साली ‘असुड’ लिहिणार असल्याचे महात्मा फुले यांनी सांगितले होते. या ग्रंथाच्या सुरुवातीलाच ते विद्येचे महत्त्व आधोरेखित करतांना लिहितात. ‘विद्येविना मति गेली, मती विना नीती गेली, नीती विना गति गेली, गतिविना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, इतके अनर्थ अविद्येने केले’. या ग्रंथाचा उद्देश शूद्र शेतकरी दैन्य अवस्थेला पोहोचण्यासाठी धर्म आणि राज्य कारणीभूत असल्याचे विवेचन त्यांनी केले आहे. सरकारीखात्यात ब्राह्मण कामगारांचे अधिक्य असल्याने भटभिक्षुक व सरकारी युरोपियन कामगार सुख जीवन जगत आहेत. त्यांच्यापासून बचाव करता यावा म्हणून ‘शेतकऱ्यांचा असूड’ असे नाव त्यांनी ग्रंथाला दिले. शेतकऱ्याचा असूड, हा ग्रंथ पाच प्रकरणात विभागला आहे . प्रकरण १- सरकारी खात्यातील ब्राह्मणांचे शोषण प्रकरण २- शेतकरी, ब्राह्मण व सरकार दोन्हीकडून लूटला जातो. प्रकरण ३- आर्य ब्राह्मण इराणातून आले, शेतकऱ्याचा इतिहास वर्तमानातील छळ प्रकरण ४- विदारक स्थितीचे वास्तव वर्णन प्रकरण ५- ब्राह्मणास इशारा व शेतकऱ्यांसाठी उपाय अशा पाच प्रकरणात हा ग्रंथ विभागला आहे. महात्मा फुले यांनी या ग्रंथात शेतकऱ्याच्या दयनीय स्थितीला कारणीभूत असणाऱ्या ब्राह्मण आणि युरोपियन कामगार कामगारांचे सुखवस्तू जीवन, शेतकऱ्यांचे अज्ञान, त्याच्या अज्ञानाचा फायदा उठवणारे सावकार, सावकाराच्या अन्यायाला बळी पडणारे शेतकरी, अशा या अज्ञानी व देव भोळ्या शूद्र शेतकऱ्याची स्थिती इतर देशातील शेतकऱ्यांपेक्षा निकृष्ट आहे. या विदारक स्थितीचे चित्रण या ग्रंथात केले असून शेती व शेतकरी हा साहित्याचा विषय मांडणारे पहिले लेखक महात्मा फुले होय.