Share

Review By Dr. Borawake Kranti Suhas, Associate Professor, Baburaoji Gholap College, Sangvi, Pune
‘मजेत जगावं कसं?’ या पुस्तकाचं नावच इतकं आकर्षक आहे की कुठल्याही वाचकाला पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण होते. This is one of the record breaking top best seller book! खूप जबरदस्त पुस्तक!!. ‘मजेत जगावं कसं?’ हा कानमंत्र लेखकाने या पुस्तकाद्वारे अतिशय उत्तमरित्या दिला आहे. लेखकाने आपल्या प्रसन्न, खुमासदार, हलक्याफुलक्या शैलीत या पुस्तकाची मांडणी करताना एकूण 11 प्रकरण दिली आहेत. या 11 प्रकरणात टप्प्याटप्प्याने विचार, कल्पना, भावना, सवयी, प्रतिक्रिया, संकल्पना अशा सर्व अंगांनी लेखक आपल्या मनाला आणि जीवनाला भिडला आहे. मनसोक्त, मजेत जगण्यासाठी लेखकाने एकेका प्रकरणात एक एक पायरी सोप्या सुटसुटीत शब्दात उलगडली आहे. मनासारखं जगायचं असेल तर प्रथम स्वतःची किंमत ओळखायला हवी. जुन्या संस्कारांची साफसफाई करायला हवी. विचारांना योग्य दिशा द्यायला हवी. आपल्याला आयुष्यात नेमकं काय हवंय हे ओळखायला हवं. यश, आनंद, प्रेम या संकल्पना समजून घ्यायला हव्यात. स्वास्थ्य आणि पैसा म्हणजे नेमकं काय, हेही जाणून घ्यायला हवं. योग्य दिशेने प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी आवश्यक ती तंत्र, कौशल्य आत्मसात करायला हवीत. नकारात्मक भावना कशा हाताळाव्यात, मानसिक अडथळे कसे दूर करावेत, हे शिकायला हवं. अंतर्मनाची अमर्यादित शक्ती वापरण्याची युक्ती शिकायला हवी. एकेका प्रकरणात एक एक पायरी ओलांडत मजेत जगण्याच्या ध्येयापर्यंत कसं पोहोचावं, हे अतिशय सोपं करून लेखकाने सांगितले आहे. जगणं ही एक कला आहे. संपूर्ण पारंगत कोणी नसतं. शिवाय प्रत्येकाची जीवनशैली वेगळी असते. त्यामुळे मजेत जगण्याचं ‘रोल मॉडेल’ असू शकत नाही. मात्र जगणं यशस्वी करून गेलेल्या विविध क्षेत्रातील लहान थोरांचे अनुभव, त्यांचे विचार अतिशय सोप्या शब्दात लेखकाने मांडले आहेत. खरंच, या पुस्तकांने जगण्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून टाकला. प्रत्येकाने एकदाच नाही तर पुन्हा पुन्हा वाचावे असे हे जबरदस्त पुस्तक आहे. हे पुस्तक निश्चितच वाचकाचे आयुष्य बदलू शकेल. प्रत्यक्ष व्यवहारात अंगीकृत करण्यासारखे विचार या पुस्तकात लेखकाने मांडले आहेत.

Related Posts

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास

Dr. Vitthal Naikwadi
Shareइंग्रज लोक आपल्या देशात व्यापारी म्हणून आले व कलांतराने आपल्या देशाच्चा राजकरणात प्रवेश करून ते येशील राज्यकर्ते बनले ही गोष्ट...
Read More

वाचन संस्कृती : आक्षेप आणि अपेक्षा

Dr. Vitthal Naikwadi
Shareवाचन संस्कृतीचा संबंध एकीकडे प्रत्येकाला व्यक्तिगतरीत्या संवाद- कौशल्य अवगत होऊन प्रत्येकाच्या व्यक्तिगत उन्नतीच्या वाटा मोकळ्या होण्याशी तर दुसरीकडे सभ्य समाजाच्या...
Read More