Share

Book Reviewed by AVINASH RAMESH BORSE (Clerk)
Vidya Amrut Dnyan Prathisthan’s Arts, Science, Commerce College
Shirsondi, Tal. Malegaon
श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने यांनी लिहिलेली मराठी आत्मकहाणी आहे.
नाशिकच्या कारागृहात असताना फेब्रुवारी ९, इ.स. १९३३ रोजी त्यांनी या
पुस्तकाच्या लिखाणास प्रारंभ केला आणि १३ फेब्रुवारी, इ.स. १९३३ रोजी पहाटे
त्या संपविल्या.
आईच्या प्रेममय थोर शिकवणुकीचे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे कथात्मक चित्र
म्हणजे 'श्यामची आई' असे म्हणायला हरकत नाही. आपल्या मुलांवर अपार माया
करणारी, त्यांनी सुसंस्कारी बनावे म्हणून झटणारी; पण हे संस्कार उपदेशाच्या
डोसाच्या रूपात मुलांना न पाजता स्वत च्या वागण्यातून व दैनंदिन छोट्याछोट्या
प्रसंगातून मुलांच्या मनावर ते संस्कार बिंबवणारी आणि मुलांना शिस्त लावताना
प्रसंगी कठोर बनणारी ही आदर्श 'आई' आजच्या पिढीतील उगवत्या पिढीसाठीच नव्हे
तर त्यांच्या आईबाबांसाठी प्रेरक ठरेल यामधून दिसून येते.
श्यामची आई हे पुस्तक सुंदर आणि सुरस असून, त्यात साने गुरूजींनी हृदयातील
सारा जिव्हाळा ओतलेला आहे. मातेबद्दल असणाऱ्या प्रेम, भक्ति व कृतज्ञता अशा
अपार भावना 'श्यामची आई' या पुस्तकात साने गुरुजींनी मांडलेल्या आहेत.
हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल.
आईच्या सान्निध्यात श्याम कसा घडला, आईच्या कोणकोणत्या गुणांचे त्याला
अनुभव आले, आईची थोरवी त्याला कशी प्रत्ययाला आली हे सांगत असतानाच
लेखकाने श्यामच्या मर्यादा, श्यामचे कोतेपण, क्षुदत्व सूचित केले आहे. ‘रामरक्षा
स्तोत्र’ उतरवून घेण्याची हकिगत, कळ्या तोडून आणण्याचा प्रसंग, घरातून पळून
जाऊन परत आल्याचा प्रसंग, दोन आणे दक्षिणा आणण्याचा प्रसंग, वडिलांवर
रागावण्या-रुसण्याचा प्रसंग, नोट चोरून घेण्याचा प्रसंग, श्लोक न म्हणता म्हटला असे
खोटे बोलल्याचा प्रसंग, असे कितीतरी प्रसंग. आपल्या ठिकाणचे दुर्गुण श्यामला
जसजसे जाणवतात तसतसे त्याचे व्यक्तिमत्त्व उजळत जाते, हे या पुस्तकामधून दिसून
येते.

Related Posts

गुरुजी तू मला आवडला !

गुरुजी तू मला आवडला !

Yogita Phapale
Shareडॉ.हनुमंत भवारी,सहयोगी प्राध्यापक, श्री पद्ममणी जैन महाविदयालय, पाबळ. विद्यार्थ्याला देशाचा सक्षम नागरिक किंवा मुळातच माणूस बनवायचं जर असेल तर त्याचा...
Read More