Share

Dr.Uday Jadhav, Librarian, Camp Education Society’s Dr. Arvind B. Telang Senior College, Nigdi Pune.

रिंगाण ही कृष्णात खोत यांची कादंबरी आहे जिला २०२३ चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. ही कादंबरी धरणग्रस्त आणि धरणामुळे विस्थापित झालेल्या लोकांची फरपट आणि हालअपेष्टा याचे चित्रण आपल्या डोळ्या समोर उभे करते. धरणामुळे कादंबरीचा नायक देवाप्पा आणि सर्व गावकरी यांना आपले मूळ गाव सोडून जावे लागते. पुनर्वसन झालेल्या गावात तेथील स्थानिक लोक त्यांना सामावून घेत नसतात, वेगवेगळ्या प्रकारे त्रास देणे सुरू असते. त्याला कंटाळून आणि आईच्या हट्टाखतिर देवाप्पा आपली भाकड म्हैस परत आणण्यासाठी देवाप्पा पुन्हा मूळ गावी जातो. पण मूळ गाव आता जंगल झालेल असते. त्याची म्हैस त्याला दिसते पण ती देखील जंगली, रानटी झालेली असते. ती परत नेताना देवाप्पाची संघर्षमय कहाणी पुस्तक वाचून समजु शकतो. त्यामुळे ही कादंबरी नक्की वाचावी.

Related Posts

मन मे है विश्वास

Dr. Uday Jadhav
Shareश्री.विश्वास नांगरे पाटील हे एक तरूण, तडफदार आणि स्वच्छ प्रतिमेचे पोलिस अधिकारी म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत. मुंबई वरच्या...
Read More

अग्निपंख एक आत्म विश्वासवर्धक औषध

Dr. Uday Jadhav
Share‘अग्निपंख’ हे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित एक प्रेरणादायक पुस्तक आहे. यात त्यांचे बालपण, शिक्षण, शास्त्रज्ञ...
Read More