Share

Book Reviewed by पुजा जनार्धन गायकवाड (११ वी वाणिज्य)
अग्निपंख हे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेले पुस्तक आहे. त्यांच्या जिवनातील प्रेरणादायी अनुभव आणि यशस्वीतेया प्रवास मांडणारे एक महत्व पूर्ण साहित्य आहे . हे पुस्तक विशेषतः तरूण पिढीला उद्देशून लिहिलेल असून त्यांना स्वप्न पाहण्याची आणि हे सत्यात उतरण्याची प्रेरणा देते. डॉ कलाम यांनी आपल्या जीवनातील संघर्ष, कठोर, परीश्रम, आणि आत्मविश्वासाने उभ्या केलेल्या यशाची कथा यात मांडली आहे.
पुस्तकाचे नावातच असलेला ‘अग्निपंख’ हा शब्द कलाम यांच्या जिद्दीचा आणि ध्येयसिद्धिचा प्रतिक आहे. त्याच्या जीवनात आलेल्या अडचणींना त्यांनी कसे तोंड दिले, हे पुस्तकात सविस्तरपणे वर्णन केले आहे. या पुस्तकातून विद्यार्थ्यांनी आणि तरूणांनी स्वप्न बाळगण्याचे महत्त्व, कठोर परिश्रम करण्याची गरज आणि सातत्याने प्रगती करण्याची वृत्ती शिकावी, असे कलाम यांनी ठामपणे मांडले आहे.
कलाम यांच्या वैज्ञानिक योगदान विशेषतः भारतीय अंतराळ आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमातील, कामगिरी यांचेही पुस्तकात वर्णन आहे . त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारताच्या प्रगतीसाठी दिलेले योगदान तरूणांना प्रेरणादायी वाटते.
“अग्निपंख ” हे पुस्तक आशावादी दृष्टीकोन, प्रामाणिकपणा आणि निस्वार्थी देशसेवा यांचे उत्तम उदाहरण आहे. डॉ. कलाम यांचे विचार आणि शिकवण वाचकांच्या मनावर कायमचा प्रभाव पाडतात आणि त्यांना जिवनात यशस्वी होण्यासाठी दिशा दाखवतात.
“अग्निपंख” हे डॉ. ए. पी. जे यांचे आत्मचारित्मक पुस्तक आहे. ज्यात त्यांनी आपल्या आयुष्यातील अनुभव, संघर्ष, यश आणि प्रेरणादायी विचार मांडले आहेत. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण वाचकाला आयमातून शिकण्यास संधी देते. कलाम यांचे शैक्षणिक प्रवास, ते वैज्ञानिक म्हणून मिळवलेली ओळख, आणि अखेर राष्ट्रपति पदापर्यंत प्रवास अत्यंत साधेपणाने, पण प्रभावीपणे मांडला आहे.
पुस्तकाचा मुख्य गाभा हा स्वप्नानांची ताकद, त्याच्या पाठलाग आणि ध्येय साध्य करण्याच्या प्रवासात येणाऱ्या अडचणींवर मात कशी करावी. यावर आधारित आहे. त्यांनी स्वप्न तेव्हा सत्यात उतरतात जेव्हा आपण त्याचा सतत पाठलाग करतो. हा संदेश दिला त्यांच बालपण, शिक्षण आणि इस्त्रो आणि डी. आर. डी.ओ मधील योगदान यांची कथा सर्वासाठी प्रेरणादायी आहे.
कलाम यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांनी भारताच्या संरक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा उल्लेख करताना, त्याग भारतीय तरूणांना देशाच्या विकासासाठी समर्पित राहण्याचा संदेश दिला आहे. तसेच त्यांनी युवकांना सर्जनशीलता , जिद्द आणि सकारात्मक विचारसरणी ठेवण्याचा आग्रह धरला आहे.
“अग्निपंख” वाचल्यानंतर वाचकाला आपल्या जीवनात आव्हानांशी कसे सामना करावा स्वप्न कधी साध्य करावी आणि आपल्या देशासाठी काहीतरी कसे करावे यांची प्रेरणा मिळते. हे पुस्तक फक्त आत्मकथा नसुन, जीवनातील मुल्य शिकवणारी आणि प्रत्येक वाचकाला त्याच्या ध्येयाचा दिशेने उभारी देणारी अद्वितीय साहित्यकृती आहे.

Related Posts

हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ या कादंबरीत भारतीय समाज, संस्कृती, परंपरा, ग्रामीण भागातील नाते संबंध याचे विविध पैलू तपशीलवारपणे उलगडले आहेत.

Yogita Phapale
Shareकादंबरीचा नायक खंडेराव हा ग्रामीण महाराष्ट्रातील जीवनाचे प्रतिनिधित्व करतो. त्याच्या जीवनप्रवासाच्या माध्यमातून, नेमाडे यांनी समाजातील विविध घटकांचे, त्यांच्या परस्परसंबंधांचे, आणि...
Read More

पार्टनर

Yogita Phapale
Shareवाचकाला आयुष्यातील दिपस्तं भाचेमहत्त्व सांगणारी सत्यकथा आपल्याला आयुष्य जगत असताना अनेक व्यक्ती भेटत असतात . कोण कधी भेटेल? काय अनुभव...
Read More