Share

दुष्काळी माणदेशातील गरीब, मेंढपाळ कुटुंबात जन्मलेल्या आणि अथक मेहनतीने शिक्षक झालेल्या नागु विरकर यांचे हेडाम हे आत्मकथन आहे. दुष्काळ आणि दारिद्रय कायम पाचविला पूजलेल्या धनगर/ मेंढपाळ समाज्याची कायम भटकंती चालू असते. अश्या बिकट परिस्थितीत सुद्धा शिक्षण सुरू ठेवण्याची नागुची जिद्द, योग्य वेळी भेटलेले प्राथमिक शिक्षक पोळ गुरुजी, मित्र युवराज पाटील आणि नागुच्या शिक्षणासाठी स्वतःचा दागिना विकणारी खंबीर आई या सर्वामुळे अथक संघर्षानंतर लेखक यशस्वी होतो. धनगरी, ग्रामीण बोलीभाषेत, अस्सल माणदेशी लोकभाषेत लेखक आपल्या समाज्याचे वास्तव जगणे वाचकासमोर मांडतो. पुस्तकात वाचकांना मेंढपाळ लोकांचा जीवन संघर्ष अनुभवायला मिळतो त्यामुळे वाचकही नागुच्या या प्रवासाचा साक्षीदार होऊन ते जीवन जवळून अनुभवतो. हेच या पुस्तकाचे यश आहे. सर्व वाचकांना प्रेरणा देणारी आत्मकथा आहे. अल्पावधीत हेडाम ला १७ विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यासर्व गुणांमुळे हेडाम ही झोंबी, उपरा, भुरा, देशोधडी ई. सारख्या साहित्य कृतीसारखीच निरंतर लक्षात राहील यात शंका नाही.

Related Posts

मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सुजाण पालकत्व शैली!

Dr. Uday Jadhav
Shareआजच्या स्पर्धेच्या युगात छोट्या छोट्या आणि विभक्त कुटुंब पद्धतीत आपली मुले वाढवणे संस्कारित करणे हे एक आव्हान ठरले आहे. मुलांची...
Read More