Share

प्रकाशवाटा हे पुस्तक डॉ.प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे यांच्या महाराष्ट्रातील हेमलकसा जिल्हा गडचिरोली येथील जीवनातील संकटे आणि संकटांनशी निगडीत येथील आहे. ज्यात लोकबिरादरी प्रकल्प सुरु केल्यापासून आजपर्यंतचा प्रवास दर्शिवला आहे. या भागातील “माडिया गोंड”जमातींना आघाडीवर आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या आदिवासींना आधुनिक जीवनाची ओळख नव्हती. त्यांना जगात स्वतःला सिद्ध करण्याची संधी नव्हती. त्यांच्याकडे शिक्षण आरोग्य सेवा किवा उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नव्हते. बाबा आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वादाने त्यांनी, त्याच्या पत्नी डॉ मंदा त्यांचे भाऊ डॉ विकास यांनी हे काम केले. यामध्ये त्यांचा त्यासाठी चा खडतर प्रवास व आधुनिक सुख सुविधांचा त्याग दर्शविला आहे. आणि हेमलकसा नावाच्या ठिकाणी हे स्वप्न कसे प्रत्यक्षात आले याची हि कथा आहे.

Related Posts