Share

Book Review : KHAMBAIT GITANJALI VIJAY , MGV’s Loknete Vyankatrao Hiray Arts Science and Commerce College Panchvati, Nashik.
प्रास्ताविक –

कै. श्री. गोपाल नीलकण्ठ ह्यांच्या, ‘श्री महाभारत’ ह्या रसाळ ग्रंथाची ही सहावी आवृत्ती. व्यासांच्या महाभारताचे हे संक्षिप्त रूप मराठी वाचकांना अतिशय भावले. गोनीदांची प्रतिभा, त्यांची ललितरम्य भाषा, त्यांचे महाभारतावरचे प्रेम ह्या सर्वाचे प्रत्यंतर ‘श्री महाभारत’ मधे येते.

कोणाही वाचकाचे मन गुंतावे, असे हे महाभारत प्रत्येक वाचकाला आपल्या संपत्र परंपरेचे ज्ञान व्हावे, आणि त्याचे मन महाभारतातील जीवनदर्शनाने थक्क व्हावे, असे हे दाण्डेकरांनी कथन केलेल्या महाभारताचे फलित आहे.
वाचकांना आता अशा मौल्यवान ग्रंथाची गरज आहे, हे हेरुन ‘श्री महाभारत’ सहावी आवृती बघायला मिळते. महाभारत अत्यंत प्रचंड ग्रंथ आहे.

सारांश
कृष्णदर्शन
पांडव द्यूतात हरले असून काम्यकवनांत राहूं लागले, या वेळेपर्यंत श्रीकृष्ण द्वारकेंत नव्हता. तो परत आला आणि ही वार्ता ऐकतांच व्यथित मनानें त्वरित भोजवीरांसह तो काम्यकवनांत आला.
कृष्णाला पाहतांच पांडवांचे शल्य पुनः ताजें झालें. पांचाली तर आपल्या त्या सख्याला पाहतांच धाय मोकलून रडूं लागली.
कृष्ण त्या सर्वांचे सांत्वन करीत क्रोधानें म्हणाला, “युद्धांत दुर्योधनादिकांचा वध करणें, हाच आतां आमचा प्राप्त धर्म आहे.”
सगळे जण खित्र मनानें बसले असतां पांचाली श्रीकृष्णाजवळ आली आणि आपला मुक्त केशभार त्याच्या पुढें धरून रडत म्हणाली,
“माधवा, हा माझा केशभार पाहिलास?”
सीन
“कृष्णे -”
“ऐक गोविंदा! अवभृथस्नानानें ओले झालेले हे कैंस धडपणें वाळलेही नव्हते,
तोंच दुरात्म्या दुःशासनानें हेच कैंस धरून एकवस्त्रा असलेल्या मला ओढीत राजसभेत नेलें ! माधवा, त्या वेळीं मी रजः स्वला होत्यें रे!”
शोकभार असह्य झाल्याने द्रौपदी धाय मोकलून रडू लागली. तिचें उत्तरीय आणि वक्षस्थल अश्रृंनी भिजून ओलें चिंब झालें.
ती हुंदके देत म्हणाली,
“कृष्णा! मी अत्यंत बलशाली अशा पांडवांची पत्नी ! तुझी भगिनी ! महाराज पांडूची. स्नुषा! भरतकुलाची कन्या! अशा मला कर्ण भर सभेत म्हणाला -“”काय?”
“काय? तें मी कसें सांगू? कृष्णा, तें मी कसें सांगू?”
“ऐक पांचाल
“काय ऐकूं कृष्णा!! माझ्या विपत्तिकाली एकही माझ्या साहाय्यासाठीं धांवून आला नाहीं. पतीही नाहींत. कोणीही
नाही!”
श्रीकृष्ण क्षुब्ध होऊन म्हणाला,
“प्रिय भगिनी, माझी प्रतिज्ञा ऐक. तूं ज्यांच्यावर कुद्ध झाली आहेस, त्या
उतळ 4″कृष्णो एक वेळ मी मला विसरेन पण तुझें विस्मरण होणार नाहीं. ”
धृष्टद्‌युम्नादि ही सर्व वीर आपापल्या रथांत बसून निघाल्यावर युधिष्ठिरानें आपणाभोंवतो गोळा झालेल्या सर्व नागरिकांचा निरोप घेतला आणि द्रौपदीसह ते भ्राते ‌द्वैतवनाकडे निघाले.
निष्कर्ष
अत्यंत उज्ज्वल असा इतिहास आहे. पूर्वजांचे शौर्य, धैर्य, इच्छा, वासना, लोभ, धर्मबु‌द्धि, प्रकृति आणि विकृति या सर्व प्रवृर्तीचे अत्यंत स्पष्ट चित्रण या श्रेष्ठ ग्रंथांत केलें आहे.
अनेक ग्रंथ कांहीं काळ जनमनावर आपली पदचिन्हें उमटवून हळू हळू काळाच्या उदरांत दिसेनासे झाले. आज त्या सहस्रावधि ग्रंथांचें नांवही कुणाला माहीत नाही. मात्र महाभारताचें भारताच्या मनावर चालत असलेलें अधिराज्य कोणीही नष्ट करूं शकत नाहीं.

त्या काली हा देश किती समृद्ध होता, ह्या स्वर्णमय देशांत आमचे पूर्वज राहात कसे, आश्रमव्यवस्था कशी, गुरुकुले कशी, तत्त्वज्ञान कसें, शिक्षणपद्धति कशी, ते युद्ध करीत कसे आणि सायंकाळर्की युद्ध थांबवल्यावर दूसरे दिवशर्शी तें पुन्हां सुरू होईपर्यंत ते एकमेकांच्या छावण्यांत निर्भय मनानें हिंडत कसे, परस्परांचें कुशल विचारीत कसे, या आणि दुसऱ्या अनेकानेक घटनांवर प्रकाश पाडण्याचें एवढे सामर्थ्य जगांतील फारच थोड्या ग्रंथांमध्यें आहे. आणि महाभारतांतील ललित वर्णनें? महाकवीच्या मनालाही मोह पाडतील अशी घटनांचर्ची आणि निसर्गाचर्ची वर्णनें व्यासांच्या असीम क्रांतदर्शी प्रतिभेतून उतरली आहेत. भारताच्या प्राचीन संस्कृतीचें सम्यक् दर्शन घडावें, अशी इच्छा असलेल्या प्रत्येकानें-बालानें आणि प्रौढानें-एकदां तरी महाभारत वाचलंच पाहिजे.

Recommended Posts

Ikigai

Dr. Sambhaji Vyalij
Share

ShareGaikwad Sanjay Dattatray; Bharatiya Jain Sanghatana’s Arts, Science & Commerce, Wagholi, Pune The Japanese Secret to a Long, Healthy and Happy Life, or Ikigai, is a book written by two authors, Hector Garcia and Francesc Miralles. Ikigai means the secret of life, […]

Read More

दीक्षांत

Dr. Sambhaji Vyalij
Share

Shareपुस्तक परीक्षण – प्रोफेसर डॉ . सिद्धेश्वर विठ्ठल गायकवाड,भारतीय जैन संघटनेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,वाघोली ता. हवेली जि. पुणे. पुस्तक की लेखिका डॉक्टर सूर्यबाला का जन्म 25 अक्टूबर 1944 को वाराणसी में हुआ वह कायस्थ परिवार में जन्मी है। आपने अपनी […]

Read More