Share

सुरुवातीलाच एक प्रांजळ कबुलीजबाब! या रोमांचकारी ग्रंथराजावर अभिप्राय देण्याचं अच्युतला मी कबूल केलं, पण ही एका बेसावध क्षणी माझ्याकडून घडलेली चूक होती. पदार्थविज्ञान, भूगर्भशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र वगैरेंना ज्यांनी आद्य शास्त्राचा दर्जा प्राप्त करून दिला, ती माणसं, त्यांचे विषय व विशेष यांचा तपशीलवार वृत्तांत या पुस्तकात आहे. एकाच व्यक्तीनं लिहिलेली अशी कलाकृती मराठीमध्ये फार क्वचितच असेल. वेगवेगळया विषयांतले किमान चार नावाजलेले लेखक जे लिहू शकतील, ते सर्व अच्युतनं सहजपणे एकहाती लिहिलं आहे. एखाद्या गुजगोष्टी आपण वाचाव्यात, तसं हे पुस्तक आहे. अवैज्ञानिकांसाठी विज्ञान कसं लिहावं, याचा वस्तुपाठ अच्युतच्या निर्मितीमध्ये आहे. मी त्याचं अभिनंदन करतो. पद्मविभूषण वसंत गोवारीकर विश्व व जीवसृष्टीची उत्पत्ती यांसारख्या मूलभूत प्रश्नांचा ठाव घेणारे विज्ञान म्हणजे मानवी संस्कृतीचा दिप्तीमान वारसा आहे. ही सर्वस्पर्शी क्रांती घडवून आणणारे वैज्ञानिक मात्र अनेकांना अपरिचितच असतात. उदाहरणार्थ, मोबाइलसारख्या जादुई उपकरणामागचे विज्ञान निश्चित करणाऱ्या ‘मॅक्स्वेल’ची ओळख किती जणांना असेल? विज्ञानातील अशा विस्मयकारी संकल्पनांचा, त्यांच्या निर्मितीमागच्या झगडयाचा आणि त्या घडवणाऱ्या ‘किमयागारां’चा रोमहर्षक इतिहास सांगणारे हे आगळेवेगळे पुस्तक. पुस्तकाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे निसर्गनियम शोधून काढण्यामागची ऊर्मी, संशोधनातील निर्मितीचा आनंद व या वैचारिक साहसातील थरार! तो लेखकाला स्वत:ला भिडलेला असल्यामुळे ते लेखन जिवंतपणे वाचकांपर्यंत पोचते. अतीश दाभोलकर, (भटनागर पुरस्कारविजेते, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक) पुस्तकाला मिळालेले पुरस्कार: महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 2007-08.

Related Posts

More Sayali Rajendra

Nilesh Nagare
Shareसंगमनेर नगरपालिका कला, दा.ज. मालपाणी वाणिज्य आणि ब. ना. सारडा विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त), संगमनेर जि. अहमदनगर विद्यार्थी – मोरे साईभी...
Read More