जयंत राजवाडे लिखित “आम्ही आहोत ना!” हे एक कथांचे संग्रह असलेले पुस्तक आहे. या कथांचे विषय मुख्यतः सामाजिक आहेत, अनाथ आश्रमात लहान बाळांना कसं आणल जात, तिथलं विश्व, मुलांचे पुनर्वसन , तिथ काम करणाऱ्या लोकांची मानसिकता , या मुलांमध्ये त्याचं मानसिक गुंतण हे आणि असे विषय प्रामुख्याने या कथांमध्ये हाताळले आहेत. आश्रमात मोठ्या झालेल्या एक स्वरूप सुंदर मुलीला एक मुलगा मागणी घालायला येतो, अनाथ मुलींच लग्न व्हावं, त्यांना हक्काच घर मिळावं अशी संस्था चालवणाऱ्या साऱ्यांचीच इच्छा असते. साहजिकच या मुलीला मागणी आलेली बघून तिथे आनंदाच वातावरण असत. पण अशा वेळी संस्था चालक त्या मुलीची फसवणूक होण्यापासून तिला कसं वाचवतात हे सांगणारी “भावनासक्षम” ही कथा मुली विषयीच्या संवेदन क्षमतेच दर्शन घडवते.अनाथ आश्रमातल जग , तिथली सुख, तिथली दुःख , तिथल्या कर्मचाऱ्यांचा या मुलांकडे बघण्याचा दृष्टीकोन राजवाडे आपल्याला बारकाईने दाखवतात.
एकूणच या कथांमध्ये स्त्रीच्या व्यथा वेदनांना शब्द रूप दिलेलं दिसत. अपंग मुलीकडे सुद्धा सकारात्मक दृष्टीकोनातून बघायला हव, घटस्फोट झालेल्या स्त्रीकडे लोक कितीही वाकड्या नजरेन बघत असले तरी ती त्यातून कसा मार्ग काढू शकते असे संदेश देणाऱ्या कथांमधून ही लेखकाची स्त्री कडे बघण्याची संवेदनशीलता च दिसते. स्त्रियांकडे संवेदनशिलतेने बघणे तसेच त्यांना भावनापूर्ण म्हणून ओळखणे हे आपलयाला या पुस्तकातून दिसते.
राजवाडे यांनी, अनाथ आश्रमातील मुलीचे आयुष्य आपल्या शब्दात रचले आहेत तसेच त्यांच्या भूमिका किती स्पष्ट व नाजूक असतात याच दर्शन लेखक करून देतात.
आश्रामामधील बारीक बारीक गोष्टींची पूर्ण दखल राजवाडे यांनी घेतली आहे. कथेमधील संवाद व त्यांचे हावभाव जणू आपल्यला बोलावयास भाग पाडतात. तसेच त्यांची भावना आपल्या समोर जिवंत रूप उभी करतात. यामुळे कथा अगदी जवळीक साधते. काही कारणांनी कथेमध्ये रस येतो ते काही कारणांमुळे कथेमधील रस जातो. याचे उदाहरण म्हणजे शब्दांची रचना होय.
कथेमध्ये रचलेले पात्र मूर्तिमंत जरी असले तरी समाजशील प्राणी असल्याने जास्त फरक पडत नाही. समाजात वावरताना ज्या गोष्टी दिसतात , समजतात या सर्वांचा विचार राजवाडे यांनी केलेला आहे. तसेच प्रत्येक पात्राच्या मनातील भावनांचा विचार करून समाजशील व्यक्तिमत्वाचे दर्शन त्यांनी घडवलेले आहे. मानसशास्त्रज्ञ ज्या प्रकारे समोरच्या व्यक्तीच्या मनातील गोष्ट हेरतो त्या प्रमाणेच लेखकाने आपले उत्तम प्रयत्न केले आहे.
या कथा घटना ओघवत्या शैलीत लिहले आहे, शेवटी समाजातील ज्या भागाकडे आपले लक्ष नाही त्या भागाकडे लेखकाने आपणास लक्ष द्यावयास आतुर केले आहे.
