Book Review : Sonawane Pravin Balu, MGV’s Loknete Vyankatrao Hiray Arts Science and Commerce College Panchvati, Nashik.
माती पण मिटता मिटत नाही
आकाश पण हटता हटत नाही
आकाश मातीच्या या संघर्षात
माझा जखमाचं देण
फिटता फिटत नाही.
नाही विचारले प्रश्न नाही बोध खेद केला फक्त चांदण्यात किंवा दिले मिसळून मला.
कुसुमाग्रज रात्रीच्या आकाशाच्या बहुत जाऊन मुक्त मनाने असा दुःखभार हलका करतात.
कुसुमाग्रज आपल्या संयमशील वृत्तीमुळे दुःखाला गोजारात बसले नाहीत. कारण त्यांनी आपले वैयक्तिक दुःख समाज दुःखात विलीन करून टाकले आहे. अवघ्या अभाग्याचे अश्रू उभे आमच्या डोळ्यात अशी त्यांची स्थिती होती. मुक्तायनातील खाजगी ही कविता त्यांचे मनोगत अत्यंत उत्कटतेने व्यक्त करते. त्याच आकाशाने मला जन्म दिला आहे मी नाकारत नाही. पण माझे हे आकाश अगदीच खाजगी. त्या विशाल आकाशात माझे हे छोटे आकाश फिल्म होणार आहे, हे मला माहित आहे, पण शेवटी ते म्हणतात.
पण तेव्हा देखील आणि त्यानंतर कधीही त्याला कळणार नाही माझ्या आकाशाने काय भोगले काय सोसले काय अनुभवले!
या कवितेत कवीचे ही मौन व आकाशाचे मौन. येथे दोन मौनांचा न बोलता संवाद झाला आहे. आकाशाने कवीचे मनोगत जाणले, तसे कवीने मी शब्द तेथून आकाशाकडून सांत्वन मिळवले.