Share

Kamal v Thube, Librarian, SITS, Narhe
टेलिकॉम क्रांतीच महास्वप्न माझा प्रवास………..
सॅम पित्रोदा
मी हाती घेतलेलं पुस्तके अत्यंत साहसी जिद्दी अनिष्ट असणारे देशाला जागतिक पातळीवर नेऊन ठेवणारे टेलिकॉम क्षेत्रातील एक संशोधक विचारवंत ,धोरण करते , ध्येयनिष्ठ असे सॅम पित्रोदा यांचे आत्मचरित्र. ओडीसा मधल्या एका आदिवासी खेड्यातून सुरुवात करून ते शिकागो पर्यंत कसे पोहोचले त्यांचा बोटीमधला प्रवास कसा झाला त्यांना जागोजागी कुठले देश लागले, कुठले स्टॉप लागले याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. तिथून कुठल्या कुठल्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून ते परत दिल्लीला पोहोचले ते स्वतः दूरध्वनी, तंत्रज्ञान, माहिती घेऊनच . पन्नास वर्षांपूर्वी त्यांनी केलेला आंतरजातीय विवाह. त्यांचे त्यावेळचे असणारे पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध , अनेक पुरस्कारांचे मानकरी असणारे, जागतिक स्तरावर त्यांचे १०० पेटंट त्यांच्या नावावर असलेले असे हे सॅम पित्रोदा . त्यांच्या आत्मचरित्राबद्दल जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे . भारतातील पहिला महासंघणक” परम “ हा त्यांनी स्वतः तयार केलेला आहे. असे त्यांचे जीवन चरित्र सगळ्यांनी वाचावं आणि एक खेडेगावातला विद्यार्थी किती उंच भरारी घेऊन स्वतःचे आयुष्य किती मोठ्या लोकांसोबत घालू शकतो याचं जिवंत उदाहरण आपल्याला या आत्मचरित्रातून पाहायला मिळते.

Related Posts

डॉलर बहू

Kamal Thube
Shareडॉलर बहू मूल रूप से कन्नड़ में लिखी गई थी जिसका बाद में अंग्रेजी सहित अन्य भाषाओं में अनुवाद किया...
Read More

अति परिणामकारक लोकांच्या 7 सवयी-स्वतःवर नियंत्रण मिळवण्याच्या सवयी

Kamal Thube
Shareस्टीफन आर. कोवी लिखित “The 7 Habits of Highly Effective People” हे पुस्तक वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासासाठी एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शक...
Read More