Share

‘झेलझपाट’ ही कादंबरी आदिवासींच्या जीवनाची परवड सांगणारी असून आजच्या व्यवहारी जगात सरकारी उपक्रमातून चालवलेल्या सोसायटयामधून वाकडया मार्गाने आपआपल्या तुमडया भरणारे षेठ लोक व निरक्षर आदिवासींना आर्थिक व्यवहारात फसवून व्याज बट्टा करणारे, त्यांच्या मालावर झडप घालणारे व्यापारीही येथे दिसतात. त्यामुळे सर्वत्र विरोधी अषा परिस्थितीत अक्षरओळख झालेला आणि आपली लुबाडणूक होते आहे हे समजणारा एकटा केरु या सर्वांचा षत्रू बनणे स्वाभाविकच आहे. लाचार मोपाला दारु आणि लालपरिची चटक लावणारा आणि फुलयसारखी कोवळी काकडी गिळू पाहणारा कामांध कासम तर अषा वातावरणात असणारच ! कोरकूंवर बाहय मूल्ये चढविलेली नाहीत. माणसातला माणूसच त्याला जाणवलेल्या मूल्यांची जपवणूक करतो, प्रसंगी त्याची त्यागाचीही तयारी असते. केरु आणि फुलय यांच्या प्रेमाची ही भावकथा.

Related Posts

फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्यासाठी प्रेरणा देणारे अग्निपंख पुस्तक

Vishnu Rathod
Shareश्री मस्के रामकृष्ण नेमीचंद्र (टी वाय बीसीएस- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर) परिचय मला आवडलेले पुस्तक अग्निपंख आहे....
Read More