कथा, कादंबरी, समीक्षा लेखन असे विपुल लेखन केलेले प्रसिद्ध साहित्यिक आणि समीक्षक ग्रामीण कथाकार म्हणून अधिक परिचित आहेत त्यांचे पूर्ण नाव दशरथ तायाप्पा भोसले. ‘जन्म’ हा द. ता. भोसले यांचा १४ जानेवारी २००३ मध्ये प्रसिद्ध झालेला ग्रामीण कथा संग्रह आहे. खेडेगावातील हृदयस्पर्शी वास्तव कथा यात आहेत. द. ता. भोसले यांच्या ग्रामीण कथाकार म्हणून असलेल्या लौकिकाला साजेसा असा हा कथा संग्रह आहे. प्रा. नागनाथ कोतापल्ले आणि प्रा.भास्कर चंदनशिव यांच्याशी प्रदीर्घ स्नेहबंधनातून निर्माण झालेल्या मधुर नात्यास हा कथा संग्रह लेखकाने अर्पण केला आहे. मुखपृष्ठ धनंजय गोवर्धने यांचे आहे.
‘जन्म’, ‘हिऱ्याची अंगठी’, ‘वावटळ’, ‘पीळ’, ‘मरणकळा’, ‘आधार’, ‘, ‘मरणकळा’, ‘आधार’, ‘शोध’, ‘भूक ‘नाथा बामण’, ‘वळू’ आणि ‘बिनफळाचे झाड’ अशा एकूण ११ कथा वाचकांच्या भेटीला येतात. कथासंग्रहाचे शीर्षक असलेली पहिलीच कथा’ जन्म’ य कथेत प्रत्येक हाताला सहा बोटे असलेला पवारांचा नामा मूल गमावल्याव मानसिकता हरवून बसलेला असतो. चिंधीलाच मूल समजून छातीश कवटाळतो. नामा अनेक स्त्रियांना घाबरवतो. त्यातीलच एक साकरा बाईच गरोदर सून कस्तुरा असते. पाण्याच्या भोवऱ्यात अडकून अंत झालेल् भानाच्या जाण्याने अनेक स्त्रियांना आनंदच होतो. कस्तुराच्या बाळाच् हाताला मूळ अंगठ्याला एकेक अंगठा फुटल्यासारखा दिसलेला पाहू साकराबाईची अवस्था कसनुशी होते. नामाने कस्तुराच्या पोटी पुनर्जन्म चेतला नाही ना अशी तिला शंका येते. जनसामान्यांच्या श्रद्धा, धारणा कथेतून प्रत्ययाला येतात.
‘पीळ’ ही कथा शहरीकरण झाल्याने गावाशी तुटलेली नाळ व नातेसंबंध डोणारे परिणाम दाखवतात. नोकरीच्या निमित्ताने शहरात स्थायिक झान संपतराव कर्तव्य म्हणून आजारी वडिलांना भेटायला गावी येतात. पण त्य ऊ केलेली मदत नात्यात तुटकपणा असल्याने तात्या नाकारतात
माणसांचा स्वाभिमान यात दिसतो पण त्याच वेळी नातवांना एकदा तरी भेटायला घेऊन ये बाबा असे म्हणणारी आई लेकरांविषयी असणारा प्रेमळपणा सहजी सोडत नाही ‘बिन फळाचे झाड’ ही कथा देखील अशाच दुरावलेल्या नातेसंबंधांवर भाष्य करते.
‘वळू’ या कथेतून प्रथम देवाला सोडलेल्या वळूला श्रद्धेपोटी जीव लावणारे गावकरी वळूचा त्रास अति झाल्यावर वळूला जेरबंद करतात, पौरुषत्व नष्ट करून वेसण घालतात. हा वळू म्हणजे मस्तवाल आणि इतरांना त्रास देणाऱ्या माणसाचे प्रतिक वाटते ‘भूक’ ही कथा देखील अंतर्मुख करणारी आहे फासे पारध्याचा परशा भूक शमविण्यासाठी होल्या पक्षाची शिकार करतो त्यावेळी • घरट्यातून पक्षाचे पिलू पडून जखमी होते परशा सोबत असणारा शिंगऱ्या कुत्रा मात्र पिलाला भक्ष्य न बनवता जीवदान देतो. माणसापेक्षा मुक्या प्राण्यांमध्ये भूत दया अधिक असते हे या वरून स्पष्ट होते.
सर्व कथांना ग्रामीण जीवनाचा संदर्भ असून त्याच्या ठळक वैशिष्ट्यांसह या कथा लक्षणीय व यशस्वी ठरल्या आहेत. सर्व कथा लघुकथा असून वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या आहेत. कथांमधून येणारे अर्थपूर्ण तपशील या कथांची गुणवत्ता वाढवतात. कमालीचे दारिद्रय, भूक, शोषण, सामाजिक विषमता यांच्या विळख्यात सापडलेल्या माणसांचे विस्कटलेले आयुष्य यांचे दर्शन घडते. ग्रामीण जीवनाशी असलेले सारे संबंध तोडून सुखवस्तू जीवन जगणाऱ्या मानसिकतेचेही दर्शन घडते.
कसदार आणि समृद्ध ग्रामीण अनुभवविश्व, कथांची प्रवाही भाषा, प्रत्ययकारी जिवंत व्यक्ती चित्रण याचा या कथा एकाच वेळी आनंदही देतात आणि अस्वस्थही करतात. हेच या कथा संग्रहाचे सामर्थ्य आहे. काही वेळा तपशील देण्याच्या अतिरेकामुळे कथेची बांधणी सैलसर होणे, कथा दीर्घ होणे असे काही दोष या कथांमध्ये आढळतात. तरीही एकूण पाहता द. ता. भोसले यांचा हा कथासंग्रह ग्रामीण संस्कृती गावातील माणूसपण व ग्रामीण समाज जीवनाचे वास्तव चित्रण करणाऱ्या मूल्ययुक्त आणि वाचकांचे सुसंस्कृतपणाचे भान जागवणाऱ्या आहेत असेच म्हणणे योग्य ठरेल.
