पुस्तक परीक्षण मुग्धा वाघ तृतीय वर्ष वाणिज्य श्रीमंती दुर्गाबाई मुकुंददास लोहिया महिला वाणिज्य महाविद्यालय
रतन टाटा यांचं पुस्तक वाचून खूप छान वाटलं. एक उत्तम उद्योगपती म्हणून व एक बिजनेसमॅन म्हणून त्यांनी मोठे नाव कमावलं आहे. प्रचंड आत्मविश्वास, एकमेकांना सहकार्य व सांघिक ताळमेळ जपत टाटा ग्रुप ऑफ इंडस्ट्री यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्याचे काम रतन टाटा यांनी केले आहे.
आजच्या जगात तरुण मंडळींनी रतन टाटांचा आदर्श घेतला पाहिजे. एक माणूस म्हणून आपण कस असायला हवं हे रतन टाटांकडे बघून कळतं. मला त्यांचं एक वाक्य खूप आवडतं कि “उद्योगामध्ये यशस्वी होण्यासाठी आणि प्रसंगी आवश्यक असे निर्णय घेण्यासाठी प्रचंड आत्मविश्वासाची गरज असते”.
मला एक त्यांची गोष्ट आवडली ती म्हणजे ज्या गोष्टी आपल्या सहकाऱ्यांना माहित नाही त्या शिकवून, त्यांच्याकडून कशा करून घ्यायच्या, त्यात त्यांना पारंगत कसे करायचे आणि हे करत असताना त्यांना शिस्त देखील लावायची. त्यामुळे सहकाऱ्यांमध्ये बांधिलकी वाढली, एकमेकांमध्ये विश्वास वाढला.
अपयशाने खचून न जात पुन्हा खंबीरपणे व कणखरपणे उभारून व्यवसायात यश मिळवले पाहिजे असे रतन टाटा म्हणतात व त्यासाठी आपल्यामध्ये कणखरपणा,खंबीरपणा पाहिजे. रतन टाटांसारखे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आजच्या युगातील तरुणांना नक्कीच उपयोगी पडेल.