Share

हे पुस्तक वाचताना मला असे अनुभवायला मिळले की आजची तरुण पिढीबेरोजगार राहू शकणार नाही.स्वतःचा मालक स्वतःहून आपला उद्योग वाढवू शकतो.व स्वतःचा आर्थिक विकास करू शकतो.या पुस्तकांमध्ये उद्योजकीय मार्गदर्शनाबरोबरचउद्योजकीय मुलेही जोपासण्याचाप्रयत्न त्यनी केला आहे.उद्योगाचा ट्रेंड आणि ग्लॅमर महाराष्ट्रभर पसरावे असे त्यांना वाटते. उद्योगाचा जन्म होतो तो उद्योगासंबंधीची संधी शोधण्यापासूनच. आपल्या आसपास घडत असलेल्या अनेक गोष्टींमध्ये बऱ्याचदा आपल्याला काही समस्या जाणवत असतात. एखादी सेवा ग्राहकाला अतिशय गरजेची असते, पण ती देणारी व्यवस्था नसते. अशा ठिकाणी आपण आपल्या व्यवसायाची संधी शोधू शकतो. असंच उद्योग जगतेची संधी शोधण्याचा हा एक प्रयास.
उद्योजकता म्हणजे आर्थिक संधीचा विकास करणे. स्वयंरोजगारासाठी आर्थिक संधी शोधणारा उद्योजक अथक प्रयत्न आणि कल्पकता यामुळे यशस्वी उद्योजक होऊ शकतो.
स्वयंरोजगार म्हणजे स्वतःचा रोजगार स्वतः शोधणे. तसे पाहिले तर नोकरीही आपली आपल्यालाच मिळवावी लागते. मग स्वयंरोजगारात आणि नोकरीत नेमका फरक काय? स्वयंरोजगार म्हणजे स्वतःमधील प्रेरणा (अंतःप्रेरणा) जागृत करून स्वतःच एखाद्या छोट्या किंवा मोठ्या उद्योगाची संधी शोधणे, त्यासाठी नवनवीन कल्पना विकसित करणे, स्वतःबरोबरच इतरांनाही बरोबर घेऊन उद्योगाचे नेतृत्व करणे, त्यातील आर्थिक व्यवहार हाताळणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या ‘उद्योगधंद्याची मालकी मिळवणे!’ म्हणजेच स्वतःमधील उद्योजकतेची प्रेरणा जागृत ठेवणे.
उद्योगाचा जन्म होतो तो उद्योगासंबंधीची संधी शोधण्यापासून. आपल्या आसपास घडत असलेल्या अनेक गोष्टींमध्ये बऱ्याचदा आपल्याला काही समस्या जाणवत असतात. एखादी सेवा ग्राहकाला अतिशय गरजेची असते, पण ती देणारी व्यवस्था नसते. अशा ठिकाणी आपण आपल्या व्यवसायाची संधी शोधू शकतो.
असाच उद्योजकतेची संधी शोधण्याचा हा एक प्रयास… मिटकॉनबरोबर !

Related Posts

confidence about the future

Dr. Bhausaheb Shelke
Share“झिरो टू वन” हे पुस्तक स्टार्टअप्स आणि उद्योजकतेवर आधारित आहे. लेखक पीटर थिएल हा सिलिकॉन व्हॅलीमधील प्रसिद्ध उद्योजक आणि गुंतवणूकदार...
Read More