Share

प्रा.जयश्री बगाटे , श्री पद्ममणी जैन महाविदयालय, पाबळ.

नदिष्ट ही मनोज बोरगावकर यांची केवळ कादंबरी नसून त्यांच्या जीवन विश्वातील प्रत्यक्षदर्शी असलेले अनुभव कथन केले आहे. मनोज बोरगावकर यांनी नदी आणि आईचा गर्भ डोह यांच्यातील साम्य अधोरेखित केले आहे. म्हणजेच नदीच्या उगमाची नाळ माणसाच्या बालपणाशी जोडली जाते. नदी उगमापाशी ओढ्यासारखीच लहान खळखळती असते, अगदी गर्भाशयातून निघालेल्या बाळाप्रमाणे म्हणजेच नदी देखील परत उगमाकडे जात नाही आणि बाळाचा परत गर्भाशयात जाण्याचा प्रयत्न निरर्थक असतो. नदी माय ही नदीवर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक जणाच्या सुखदुःखाची सोबती असते. मग ती तृतीयपंथी सगुना असेल किंवा कालू भैय्या , मंदिरातील पुजारी, बामनवाड अशा अनेक लोकांच्या कथा ती आपल्या पोटात घेते. माणूस वाळू उपसताना नदीच्या गर्भाशयाला होणारी इजा ही स्त्रीच्या होणाऱ्या गर्भपाताशी केली जाते. जीवन जगण्याची जबरदस्त कला म्हणजे प्रवाहाला अजिबात विरोध न करता जगण्याची पद्धती होय. माणसाच्या जीवनातील प्रभावी व्यक्तिमत्त्वाची ओळख म्हणजे दोन पावलातील न बदलणारे अंतर.जशी प्रत्येक पावसाच्या थेंबाची नाळ पाण्याशी जोडली जाते तशीच ती प्रत्येक माणसाशी जोडली गेलेली असते. निसर्ग भरभरून देतो पण माणसाची तहान कधीच भागत नाही धरती हे सृजनासाठीच आसुसलेली आहे तसेच,माणूसही सृजनशील आहे. लेखक नदीतील व्हर्जिन जागा शोधून तेथील नदीचा तळ गाठून वाळू घेऊन येतो . म्हणजेच मेहनत सातत्य व ध्येयाचा ध्यास घेऊन तसे प्रयत्न केले तर नक्कीच यश मिळू शकते. नियती म्हणजे एखादी घटना घडण्याच्या अगोदर दोन वाट्या उपलब्ध होतात त्यातील कोंडीत जीवन जगणे म्हणजे नियती चाकोरीबद्ध जीवन. सगुनाचा तृतीय पंथात सामील होण्याचा प्रवास, बामणवाड्याची कहाणी, कालु भैय्या ची कथा यांसारख्या अनेक घटना नदीमय आपल्या पोटात घेऊन अविरत प्रवास करत असते. मनोज बोरगावकरांनी नदी आणि माणसाच्या व्यथा. माणसाची नदीशी असलेली नाळ असे अनेक जीवनातील प्रत्यक्षदर्शी अनुभव मांडले आहेत. यातून जीवनाचे अंतिम सत्य चित्रीत केले म्हणजेच माणसाचे किंवा लेखकाचे निसर्गाशी असणारे नाते.

Recommended Posts

Ikigai

Yogesh Daphal
Share

ShareGaikwad Sanjay Dattatray; Bharatiya Jain Sanghatana’s Arts, Science & Commerce, Wagholi, Pune The Japanese Secret to a Long, Healthy and Happy Life, or Ikigai, is a book written by two authors, Hector Garcia and Francesc Miralles. Ikigai means the secret of life, […]

Read More

दीक्षांत

Yogesh Daphal
Share

Shareपुस्तक परीक्षण – प्रोफेसर डॉ . सिद्धेश्वर विठ्ठल गायकवाड,भारतीय जैन संघटनेचे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,वाघोली ता. हवेली जि. पुणे. पुस्तक की लेखिका डॉक्टर सूर्यबाला का जन्म 25 अक्टूबर 1944 को वाराणसी में हुआ वह कायस्थ परिवार में जन्मी है। आपने अपनी […]

Read More