नाव : चैताली गणपत चौकेकर( M.A.-I,Psychology Department)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे .
राजहंस प्रकाशनाचं ‘ पत्र आणि मैत्र’ नावाचं पुस्तक वाचलं. हल्लीच्या नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रकाशित झालेलं हे दिलीप माजगावकरांच पुस्तक. पत्रलेखनाची जादू दिगमानांना ज्यांच्यामुळे कळली त्या निर्मला पुरंदरेंना अर्पण केलेला हा संग्रह. राजहंस प्रकाशनाचं ससुकाणू चाळीस वर्षे सांभाळणारे कप्तान दिलीप माजगावकर उर्फ दिगमा. दिगमांनी सुहृदांना लिहिलेले पत्रं, त्यांच्या मुलाखती, दिगमांवर मान्यवरांनी लिहिलेले लेख या सर्वांचा संग्रह म्हणजे ‘पत्र आणि मैत्र’. या पुस्तकाची निर्मिती अतिशय दिखणी आहे. ३१४ पानांचं, हार्डकव्हर, जाड, शुभ कागदावर छापलेलं, पत्रच वाचतोय असं वाटायला लावणारं हे पुस्तक. नजर पडली कि चाळून तरी पाहावं असं वाटयला लागतं आणि पुस्तक केवळ निर्मितीच्या आंगानं देखणं नाही, मजकुराच्या दृष्टीनेही आशयसंपन्न आहे ही महत्वाची गोष्ट.
बरीच पुस्तकं लिहिले जत्त, प्रकाशित होतात, काहींना वाचकांची दाद मिळते, काही म्हणावी तितकी वाचली जात नाहीत. वाचनाव्यावहार सुरु ठेवायला तर जसे वाचक आणि लेखक महत्वाचे तसाच प्रक्षनही तेवढाच महत्वाचा. दिगमांनी सुरु केलेलं ‘माणूस’ हे नियतकालिक आणि पुढे ‘राजहंसची’ जबाबदारी हे सगळं पाहताना प्रकाशकाचं महत्व जास्त अधोरेखित होतं. उत्तम प्रकाशक कस असावा हे दिगमांच्या या लेखातुंज जाणवतंच शिवाय ‘राजहंस’ यशाची चढती कमान गाठत असतानाच्या चाळीस वर्षाच्या काळातल्या मराठीतल्या साहित्यव्यवहाराशी ओळख होते. पुस्तकाचे तीन भाग- पहिला भाग म्हणजे दिगमांनी सुहृदांना लिहिलेली पत्रं , दुसरा दिगमानांच्या मुलाखतीचा भाग आणि तिसरा भाग म्हणजे मान्यवरांच्या नजरेतून दिग्म. प्रकाशक, म्हणून दिग्म उलगडत जातात. दिगमा स्वतःला लेखक म्हणवत नसले तरीही त्यांच्यातला लेखक या पत्रांच्या निमित्ताने आपल्याला भेटतो. मुलाखतींमधून मिश्कील, चिंतनशील दिमाग आपल्याला दिसत राहतात. ते प्रकाशक म्हणून अधिक जास्त काळात जातात तसंच वैयक्तिक गोष्टीही आपल्यासमोर येत राहतात. मुलाखती, दिगमांनबद्दल मान्यवरांनी लिहिलेले लेख सगळाच मजकूर वाचवा असच आहे.
वाचकाला काय हवंय हे नजरेसमोर ठेवून विषय निवडणं, त्या विषयाला न्याय देईल अस लेकाक शोधणं आणि नंतर पुस्तक तयार होणं दिगमांची वाचकाला खऱ्या अर्थाने लेखक-प्रकाशकांचा बाप समजण्यासाठी वृत्ती महत्वाची वाटते. रुपया-पैशाच्या हिशेबापलीकडे काही निर्मितीमुल्य असणारं, सळसळतं, विचारला प्रेरणा देणार, दिशा दाखवणारं काही आपल्याला वाचकापर्यंत पोचोवता यावं ही तळमळ जागोजागी दिसते. दिगमा लेखकाचं मनमोकळं कौतुक करतात तसंच लेखनात काय सुधारणा करता येतील हे अगदी शांतपणे समजावून सांगतात. आपला एखादा जवळचा मित्र आपल्या शेजारी बसून आपल्याला चार गोष्टी सांगतोय असं या पुस्तकातली पत्रं ज्यांच्यासाठी लिहिली गेलीत त्यांना वात असणार. लेखकांना लिहितं ठेवण्याचं, त्यांना लेखप्रवासात सोबत करण्याचं, वेळप्रसंगी उणीवा सांगत त्या भरून काढायला प्रोत्साहन देणारे दिगमांनसारखे आली तेव्हाच ऐतिहासिक कादंबरी वाचकप्रिय होत जाण्याचा काळ ते आताचं वाचानसंस्कृतीच धोक्यात येईल अशी धास्ती वाटायला लावणारं तंत्रज्ञानाचं युग, हा चाळीस वर्षाचा प्रचंड बदलत गेलेला काळ. पत्रसंस्कृती हळूहळू नष्ट होऊ लागलीय कि काय असं वाटण्याच्या काळात असं एखादं पुस्तक आपल्या समोर येतं. अशी जिव्हाळा असणारी सुंदर वाचनीय पत्रं आपल्याला वाचायला मिळतात ही छान गोष्ट आहे.
पुस्तकाचं निर्मितीमूल्य, आशयसंपन्नता अशा जमेच्या बाजू आहेतच पण एक छोटीशी गोष्ट कमी वाटली. या संग्रहात दिगमांनी इतरांना लिहिलेली पत्रं आहेत पण त्यांची आलेली उत्तरं नाहीत. मूळ पत्रांसोबत पत्रोत्तरंही दिली असती तर संवाद पूर्ण वाचता आल्याचं समाधान मिळालं असतं. अर्थात वाचता वाचता दिगमांच लेखन ते स्वतः म्हणतात तसं वाचकाला सळसळतं काहीतरी देऊन जाणारं आहे. ते तेवढही पुरेसं आहे.
दिलीप माजगावकरांसारखा प्रकाशक जेव्हा ‘पत्र आणि मैत्र’ सारखा काहीसा खाजगी संग्रह प्रकाशित करतो तेव्हा त्यातील संदर्भ, घटना फक्त वैयक्तिक नसतात. सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रातील गोष्टी सांगणारा महत्वाचा एवज असतो. मराठी साहित्य, वाचक, लेखक, प्रकाशक या सगळ्या संदर्भात कितीतरी महत्वाची निरीक्षणं या पुस्तकाच्या निमित्ताने समोर येतात. दिगमांचा प्रक्षण क्षेत्रातील दीर्घ अनुभव, त्यांची ‘राजहंस’च्या माध्यमातुन केलेलं मौलिक काम, वाचन ,चिंतन,या सगळ्यातून त्यांची स्वतःची अशी दृष्टी तयार झालीय. वाचता वाचता आपण त्यांच्या नजरेतून त्यांनी सांगितलेल्या गोष्टी विचारात घ्यायला लागतो. कितीतरी नव्या गोष्टी आपल्याला कळतात. माहित असलेल्या जुन्या गोष्टीकडे पाहायची दृष्टी व्यापक होत जाते. दिगमांशी ओळख होते, अगदी मैत्र जुळतं, ते आणखी मोठे वाटायला लागतात. दिगमांची पत्रं, मुलाखती लिहिणाऱ्या, वाचकांसाठी उपयोगी आहेतच शिवाय कुठलीशी ओळ आयुष्यभर पुरेल असं काहीतरी देऊन जाईल अशी जादू दिगमांच्या लिहिण्यात आहे. मला हे पुस्तक खूप जास्त आवडलंय. राजहंस प्रकाशनाची पुस्तक कायमच त्यांचं वेगळंपण जपत आली आहेत. हेही असंच एक वेगळं पुस्तक. वाचनाऱ्यांनी, लिहिनाऱ्यांनी तर आवर्जून वाचायला हवं असं आहे.
