Vaibhavi Dattatray Botre (T.Y.BCS)
CES’s Dr. Arvind B. Telang senior College of ACS, Nigdi Pune.
अग्निपंथ्व हे भारताचे माजी राष्ट्रपती भाणि शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच आत्मकथन आहे. या पुस्तकात त्यांनी आपल्या बालपणापासून ते वैज्ञानिक म्हणून देशासाठी केलेल्या कामापर्यंतचा प्रवास मांडला आहे. पुस्तकाच्या सुरुवातीला डॉ कलाम त्यांच्या बालपणाचे आणि लहान गावातील जीवनाचे वर्णन करतात. ते एका साध्या कुटुंबात जन्मले होते. त्यांचा जीवनप्रवास अतिशय साधा आणि कष्टपूर्ण होता. डॉ. कलाम शालेय जीवनात आणि कॉलेजमधील शिक्षणात अत्यंत उत्साही व्यक्तिमत्व होते. आपल्या शिक्षणासाठी त्यांनी अनेकदा कर्ज घेतले. या पुस्तकात त्यांनी इस्त्रो आणि डीआरडीओ सारख्या संस्थांमधील कामाचा अनुभव सांगितला आहे. त्यांनी ‘अग्नी’ आणि ‘पृथ्वी’ सारखी क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठी घेतलेली मेहनत वाचकाला प्रेरना देते. डॉ. कलाम यांनी भारताच्या राष्ट्रपती पदावर २00२ ते २००७ दरम्यान सेवा केली. त्यांच्या अध्यक्षतेत भारताने महत्त्वपूर्ण प्रगती केली. डॉ. कलाम यांच्या नेतृत्वाखाली भारताने आश्विक चाचन्यांचा निर्णय घेतला. जो अत्यंत ऐतिहासिक ठरला. राष्ट्रपती असताना त्यांनी लोकांशी संवाद साधन्या साठी, त्यांनी देशाच्या विविध भागात जाऊन आपल्या विचारांची देवाणघेवाण करण्याऱ्या प्रयत्न केला.
डॉ. कलाम यांनी प्रत्येक वाचकाला विशेषतः तरूण पिढीला स्वतःच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि त्या स्वप्नांच्या दृष्टीने कठोर परिश्रम करण्यासाठी प्रेरित केले. आहे. पुस्तकात त्यांनी जीवनाच्या अडचणींवर मार्ग सांगितला आहे. आणि यशाच्या दिशेने चालताना कोणत्याही अपयशाच स्वागत करायला शिकवल.
अग्निपंख हे एक प्रेरणादायक पुस्तक आहे. डॉ. कलाम यांच्या जीवनाच्या संघर्षाची , यशाची आणि वैज्ञानिक योगदानाची कथा वाचकांना धैर्य आणि आशा देणारी आहे. हे पुस्तक मुख्यतः तरुण पिढीला स्वप्न पाहण्यासाठी, ध्येय ठरवण्यासाठी आणि ती साध्य करण्यासाठी प्रोत्साहित करते.