कुणाल रामेश्वर इंगळे, लेट जी एन सपकाळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, अंजनेरी, नाशिक
हे पुस्तक डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या जीवन प्रवासावर लिहले आहे. यात त्यांनी त्यांच्या जन्मापासून ते यशस्वी होण्यापर्यत त्यांना किती संघर्ष करावे लागले. हे त्यांनी जन्म घेतल्यापासुनच पैशाच्या कमतरतेमुळेअनेक समस्या सोसल्या. त्यांनी रामेश्वरमच्या रेल्वेस्टेशनवर वृतपत्रे वाटली, त्यांच्या वडिलाचे नाव जैनूलबदीन होते. ते एका बोटेचे मालक होते. ते त्यांची बोट ही मासेमारीसाठी मासेकयांना देत असत व त्यावर त्यांचे घर चालयचे. त्यांची परिस्थिती ही फार गरिबीची होती. त्यांचे वडील व त्यांचे दोघे भाऊ हे एका छोट्याश्या घरात त्यांच्या पाच पाच मुलांना घेऊन राहत होते. त्यांच्या जीवनावर त्यांच्या वडिलांचा फार मोठा प्रभाव होता. डॉ. अब्दुल कलाम ज्यावेळी बाहेर शिकण्यासाठी जात होते, त्यावेळी त्याचे वडील म्हणाले होते की अब्दुल तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे. सीगल पक्षी घरटे सोडून एकटे दूरवर उडत जातात आणि नवे प्रदेश शोधतात तसेच या मातीसाठी आणि इथल्या स्मृतीचा मोह सोडून तुझ्या इच्छा आकांक्षा जिथे पूर्ण होतील तिथे तुला जायला हवे. आम्ही तुला आमच्या प्रेमाने बांधून ठेवणार नाही. आमच्या गरजा तुझा रस्ता अडवणार नाहीत. त्यानंतर त्यांनी तिरुचिरापल्ली येथून भौतिकशास्त्र पदवी प्राप्त केली. नंतर ते अभियांत्रिकी शिक्षणासाठी मद्रासला गेले. पदवी मिळाल्यानंतर त्यांनी संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थामध्ये जाण्याचा पर्याय निवडला, नंतर त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि हळूहळू प्रगती करत ते प्रकल्प संचालक झाले. त्यांच्याच कारकीर्दीमध्ये भारत निर्मित पहिले उपग्रह रोहिणी हे SIV-III ने पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत यशस्वीपणे सोडले.
अब्दुल कलाम यांनी अग्नी क्षेपणास्त्र बनवले. पृथ्वी हे रणनीतिक क्षेपणास्त्र बनवले. १९९२ ते १९९९ ते भारताच्या संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार होते आणि नंतर त्यांनी कॅबिनेट मंत्री पदासह सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम केले. ते १९९८ च्या पोखरण अणुचाचण्याच्या मालिकेतील मुख्य समन्वयकापैकी एक होते. त्यांनी अणुशक्ती मजबूत केली. ते मुस्लीम असूनपण हिंदुराष्ट्रवादी होते. त्यांना उमेदवारी प्रस्तावित केली. त्यांनी माजी क्रांतिकारी नेत्या सहगत यांचा पराभव करून कलाम यांनी इलेक्ट्रोरोल कॉलेजचे मत सहज जिंकले. जुलै २००२ मध्ये त्यांनी भारताचे ११ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. त्यांना गरिबीची जाण होती. आपल्या पैशाने जर कोणाचे भले होत असेल तर ते करावे. या प्रवृत्तीचे ते असल्यामुळे त्यांनी निवृत्त झाल्यावर त्याचे सर्व हे दान करून स्वतः पेक्षा इतरांचा विचार केला.
त्याच्या मते आजच्या तरुणाने स्वतःचा पराभव करणाऱ्या मार्गापासून दुर रहावे. भौतिक सुखांसाठी संपत्तीसाठी काम करणे हे ध्येय असू नये. कलाम सांगतात की मी कित्येक श्रीमंत सताधारी सुशिक्षित माणसांना आंतरिक शांतीसाठी तडफताना पाहिले आहे आणि स्वतः जवळ काहीही नसताना सुखी आनंदी माणसेही पाहिली आहेत. आपल्या मध्ये असलेली आंतरिक शक्ती कौशल्ये आपले आयुष्य घडवण्यात गुंतवून टाकावी. विशेषत कल्पना शक्तीचा विकास आपण करू शकलो तर यश मिळेल आणि आपण माणूस बनणे शक्य होईल. जीवन हा एक कठीण संग्राम आहे. आपल्या स्वतःची जाणीव ठेवल्या शिवाय तो जिंकणे शक्य नाही. दुसऱ्यांनी सांगितलेल्या मार्गावरून ण जाण्यासाठी धैर्य लागते. आपल्या अंतर्मनाचा कौल घेत कार्य करत राहिले. तर जीवनाचा खेळ रंगवता येतो जिंकता येतो.
अब्दुल कलामाच्या वडिलांनी जे सीगल पक्षबद्दल सांगितले होते. तसे त्यांनी केले सुद्धा ते विमानात बसणारे रामेश्वरम मधले पहिले व्यक्ती होते. जर का मानवाच्या मनात जिद्द असेल तर तो कोठूनही कोणत्याही परिस्थितीतून विश्वविजेता होऊ शकतो. फक्त जिद्द मनी व स्वतावर विश्वास या दोन्ही गोष्टी असायला हव्यात तरच तो जग जिंकू शकतो व स्वताला सुद्धा जिंकू शकतो.